अद्भुत (भाग 2)

Submitted by Mandar Katre on 5 February, 2013 - 12:33

2

सकाळी चहा घेवून रोहन बस-स्टँडवर पोचला. तिथे लडाखला जाणारी बस पकडून संध्याकाळी लेहला उतरला आणि तिथे त्याने इथे कुणी साधूबाबा आहे का? म्हणून चौकशी केली . तर तिथल्या एका गाईडने त्याला जवळच असणार्या बुद्ध मठाची वाट दाखवली. त्या रात्री लॉजवर थांबून त्याने दुसर्या् दिवशी निघण्याचा निर्णय घेतला. जवळचे पैसेही संपले होते,म्हणून एटीएम मधून पाच हजार काढून घेतले. बॅग अन काही कपडेही खरेदी केले .

तीन दिवसांनंतर तो आज शांत झोपला होता .रात्री तीनच्या सुमारास त्याला एक स्वप्न पडले,त्यात त्याला एक तेज:पुंज साधूंचा घोळका दिसला. त्या सर्वांनी शुभ्र वस्त्रे धारण केलेली होती. त्या सर्वांनी त्याला आशीर्वाद दिले ,आणि त्यातील एक प्रमुक साधू पुढे होवून म्हणाला…………. बेटा, तू पूर्वजन्मात पुण्यवान होतास म्हणूनच तुला इथे यावेसे वाटले. आतापर्यंत आयुष्यात काय घडले,त्याचा विचार अजिबात करू नकोस. उद्या तू जिथे जाणार आहेस, तिथून तुझ्या आयुष्याची एक नवीन दिशा सुरू होते बेटा. आमचे आशीर्वाद आहेत तुला...............
स्वप्न संपले आणि रोहन जागा झाला, तो कितीतरी वेळ त्या स्वप्नाचा अर्थ लावण्यात गुंग होता. पण काहीतरी चांगले घडले आहे, आता उद्या काय होते ते पाहू,असे मनाशी ठरवून तो पुन्हा झोपी गेला ।

जाग आली तेव्हा सूर्य चांगलाच वर आलेला होता. रोहनने लगेच उठून सगळे आवरले आणि घाईघाईने लॉजचे बिल चुकते करून तो निघाला. गाईडने सांगितलेल्या मार्गावरची बस पकडून तो त्या गावात उतरला . गावात चौकशी करताच कळले की तो मठ पर्वत-शिखरावर आहे आणि तिथे चालतच चढून जावे लागणार आहे. चढायला किमान 6-7 तास तरी लागतील. मग एका गावकर्यानला 500 रुपये देवून वाट दाखवायला बरोबर घेतले,आणि तिथे जे मिळाले ते खावून रोहन त्या गावकर्याखबरोबर पर्वत चढू लागला. चढताना खूप दम लागत होता.

(क्रमश:)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users