हॅरी पॉटर ट्रिविया क्विज

Submitted by वैद्यबुवा on 1 February, 2013 - 11:31

हॅरी पॉटर नीलम-गेम खेळत असताना ही कल्पना सुचली. नीलम गेम मध्ये पुढचं कनेक्शन जोडताना पुष्कळ स्वातंत्र्य आहे त्यामुळे गेम आविरत सुरु राहतो खरं पण मला वाटतं हॅरी पॉटर ट्रिवियाची खरी मजा पुस्तकातल्या बारिक बारिक डिटेल्सची उजळणी करण्यात आहे.

खेळ तसा साधा आहे, पुस्तकामधल्या आपल्याला माहित असलेला एखादा बारकावा, घटना, व्यक्ती ह्या बद्दल प्रश्न विचारायचा आणि बाकी लोकांनी त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा. प्रश्नाचे बरोबर उत्तर मिळाल्याशिवाय दुसरा प्रश्न विचारायचा नाही. प्रश्न आणि उत्तर दोन्हीही vague नसतील ह्याची काळजी घेतली पाहिजे. सहसा अगदी खुपच सोपे प्रश्न विचारायचे टाळले पाहिजे नाही तर इतकी मजा येणार नाही. खेळ नक्की कसा पुढे सरकतो हे बघून हवं तर आपण नवीन नियम बनवू शकतो.

ह्या खेळाकरता गप्पांचे पान न उघडता धागा उघडलाय कारण एक तर प्रश्न वाहून जायला नको आणि दुसरं म्हणजे लगे हाथों हा धागाच एक हॅरी पॉटर ट्रिविया लायब्ररी होऊन जाईल. Happy

तर मग करायची सुरवात?... Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नंदिनी Lol लिहीच गं एक करण जोहर इष्टोरी.

युनोहु, ज्याने आधीच्या प्रश्नाचं उत्तर दिलंय त्यानेच पुढचा प्रश्न विचारायचा असतो का ?

माझा प्रश्न : क्विडिचच्या खेळात प्रत्येक टीममध्ये किती खेळाडू असतात ? किती आणि कुठले चेंडू असतात ?

कसला भारी धागा आहे! Happy

क्विडीचमध्ये ७ खेळाडु असतात १ सीकर, ३ चेजर्स,२ बीटर्स, १ कीपर.
३ प्रकारचे चेंडु. क्वॅफल, ब्लजर आणि स्निच.

आता माझा प्रश्नः स्नेपचे घर कुठे असते?

स्नेपचे घर कुठे असते? >> स्पिनर्स एन्ड - जिथे नार्सिसा त्याला शपथ (unbreakable vow) घ्यायला लावते.

रुणुझुणू, मी वैद्यबुवांना काल हेच विचारलं होतं. पण मला वाटतं. प्रश्न कोणीही द्यावा. (म्हणजे गाडी अडून राहणार नाही.)

फिलॉसॉफर्स स्टोनला कोणाचं आणि कुठल्या प्रकारांचं संरक्षण असतं ?

फिलॉसॉफर्स स्टोनला सात प्रकारचं संरक्षण असतं -

१. हॅग्रीड : फ्लफी
२. प्रो. स्प्राऊट : डेव्हिलस् स्नेर
३. प्रो. फिलिअस फ्लिटविक : उडत्या, चिवचिवाट करणार्‍या चाव्या
४. प्रो. क्विरल : माऊंटन ट्रॉल
५. प्रो. मॅक्गोनागल : जादूई बुद्धीबळ
६. प्रो. स्नेप : पोशनबाटल्यांचं कोडं
७. डंबलडोर : मनीषादर्शक (:फिदी:) आरसा

माझा प्रश्नः स्टोनच्या चढाओढीत / दरम्यान स्नेप आणि क्विरेल यांच्यात काय संभाषण / घटना घडतात? त्या कोणाला, कशा कळतात? व्होल्डमार्टला (क्विरेला पझेस केल्यामुळे) ते कळतं का?

प्रयत्न करते..
१-सॉर्टिंगच्या वेळी स्नेप व क्विरेल बोलत असताना हॅरी बघतो.ते स्टोनबाबत असू शकेल.
२ - हॅरीच्या पहिल्या क्विडिच मॅचच्या वेळी क्विरेल त्याला मारायचा प्रयत्न करतो तेव्हा स्नेप त्याला वाचवतो. (हे शेवटी क्विरेल हॅरीला सांगतो)
३ -हॅलोवीनच्या वेळी क्विरेल ट्रोल आत सोडतो तेव्हा स्नेप त्याला स्टोनपर्यंत जाण्याच्या प्रयत्नात फ्लफीजवळ अडवतो. (सेम अ‍ॅज अबव्ह)
४ -दुसर्‍या मॅचच्या नंतर स्नेप आणि क्विरेल फोरबिडन फॉरेस्ट मधे भेटतात. स्नेप क्विरेल कडून तो कुठ्पर्यंत पोहोचला आहे त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न करतो. (हॅरी निंबसवरून त्याम्चा पाठलाग करतो)

या सगळ्या घटनांची माहिती वोल्डेमॉर्टला असते. हाफ ब्लड प्रिन्समधे बेलाट्रिक्सला उत्तर देताना स्नेप याचा उल्लेख करतो..

अशा कोणत्याही ३ घटना सांगा जिथे हॅरीला प्रो.मॅक्गॉनॅगलकडून शिक्षेची अपेक्षा असताना अनपेक्षितपणे चांगली वागणूक मिळते..

हॅपॉ क्विझ चालु केल्यापासुन परीक्षेसाठी बसल्यासारखं वाटतं.. आवडतं पुस्तक असलं म्हणुन काय झालं, उत्तर न आल्यावर लाज वाटतेच ना Sad

प्रश्नाकरता माझा पास

अजूनही आहेत अर्थात..दुसर्‍या भागात मर्टलला भेटायला म्हणून क्लास चुकवून जाताना त्या वाटेत भेटतात तेव्हा हॅरी हर्मायनीला भेटायला जात असल्याची थाप मारतो..आणि त्या विश्वास ठेवतात..

सीरीयस ब्लॅकचा उल्लेख पहिल्यांदा केव्हा होतो? >>> हॅरी सुट्टीहून परतत असताना न्यूजपेपर मध्ये तो बातमी वाचतो तेव्हा.

सिरीयसचा पहिल्यांदा उल्लेख पहिल्याच पुस्तकात हॅग्रिडच्या तोंडुन होतो. तो सिरीयसची बाइक घेउन छोटु हॅरीला प्रिव्हेट ड्राइव्हवर घेउन येतो तेव्हा.

चिंगी, बरोबर. मी आत्ताच पहिलं पुस्तक वाचत होते. परवा यु नो हूच्या प्रश्नासाठी बाहेर काढले होते तेव्हापासून बाहेरच होते. Happy पहिल्याच प्रकरणामधे त्याचा उल्लेख आहे.

आता दुसरा प्रश्न: हॉगवर्टच्या लोगोमधे असलेले पाच प्राणी सांगा.

नंदिनी, पाचवा ड्रॅगन का गं?? त्याचं चित्र नाहिये, शब्दात आहे पण

Draco Dormiens Nunquam Titillandus (or, Never Tickle a Sleeping Dragon).

Gryffindor lion, the Slytherin serpent, the Ravenclaw eagle, and the Hufflepuff badger.

Pages