गुंजारव

Submitted by गुंजारव on 3 February, 2013 - 13:46

मायबोलीवरील सर्व मराठी रसिकांना सादर प्रणाम!
गुंजारव स्टुडियोमद्ध्ये अम्ही दर महिन्याला एक नवीन गाणं तयार करतो..
हा आमचा उपक्रम आपल्याला नक्की आवडेल अशी आमची आशा आहे.

https://soundcloud.com/gunjaravstudio

औदुंबर

ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेउन ;
निळासावळा झरा वाहतो बेटाबेटांतुन.

चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे ;
शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गरदी पुढे.

पायवाट पांढरी तयांतुनि अडवीतिडवी पडे ;
हिरव्या कुरणांमधुन चालली काळ्या डोहाकडे.

झाकळुनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर ;
पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर.

- बालकवी
(त्र्यंबक बापूजी ठोंबरे, १८९०-१९१८)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद पियु परीआणि श्री!!

आमचं पुढचं गाणं २१ तारखेला प्रकाशित होइल..कवी माधव ज्यूलियन यांचं "आमुचे घर छान!"..

आणि मागच्या वर्षी केलेल्या १० इंग्रजी गाण्यांच्या संग्रहाचं ( "I think of you") ऑनलाईन प्रकाशनही लवकरच करत आहोत.

आमचं facebook page जरूर लाईक करा!

https://www.facebook.com/#!/gunjaravstudio.music

"पैल तीरावर पत्र घरावर, तुळशीचे ठेवून
बेत शिजविला,देह निजविला, काळघुटी घेऊन"

दाहक पण सुंदर!

जाहिरात ही एक कला आहे म्हणे
तुम्हाला ती छान जमलीये
विशेषतः इथे मायबोली ह्या संकेतस्थळाची निवड केलीत यातच सर्वकाही आले
खूप खूप शुभेच्छा

~वैवकु Happy