झेप

Submitted by वनिता तेंडुलकर ... on 1 February, 2013 - 00:53

दुःख गोंजारायला
आता उसंत नाही
अंत आरंभाआधी
मला पसंत नाही

शुष्क गात्रांत आता
तेज आगळे वाही
स्वप्न नव्या उद्याचे
खुल्या लोचनी पाही

डोळ्यात थेंब सुखाचे
पंखात झेप उद्याची
गगन भरारीसाठी
भीती कशा कुणाची ?

पसरले पंख मी
झेप घेण्या नभी
पाश मोडुनी जुने
कात टाकुनी उभी

वनिता Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान !

चांगले लेखन झाले आहे

शेवटच्या चार ओळी वृत्तात बसतात अधिक आभ्यास करा
गझल लिहू शकाल
पुलेशु
________________________

रच्याकने :सचिन तेंडुलकर तुमचा नातेवाईक आहे का
?

नमस्कार! प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद ...वैभवजी, ह्या रचनेत जसे सुचत गेले त्से उतरवत गेले... आणि थोडेफार बदल.... त्यामुळे वृत्ताकडे लक्ष दिले नव्हते... यापुढे शक्यतो हि काळजी घेईनच..
* राहिले सचिनबद्दल ...त्यावर अवश्य बोलूया नंतर Happy

छाने.