Submitted by राजीव मासरूळकर on 30 January, 2013 - 04:10
=@कळी@=
गुलाबकळीसम
तुझे ओठ ते
तव ओठांवर
नजर गोठते
डोळ्यांमधल्या
पाण्यामधुनी
अनुरागाची
घुमती गाणी
गालावरच्या
खळीत वाटे
विश्वभरातील
सौख्यच दाटे
कच(सं)भारातून
बट सुटलेली
भासे मज जणु
अमृतवल्ली
तुझा देह हा
विजेसारखा
पावसासवे
जाहला सखा
तुझ्या मिठीची
ऊब आगळी
मम मौनाची
फुलुन ये कळी !
- राजीव मासरूळकर
दि १४.१.२०१३
रात्री ९.४० वाजता
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शब्दकळा चांगली आहे.. जरा
शब्दकळा चांगली आहे.. जरा उदात्त विषयांकडे वळा आता
सौंदर्याचं चांगलं वर्णन
सौंदर्याचं चांगलं वर्णन केलंय.
वाहवा..क्या बात है
वाहवा..क्या बात है
शब्दकळा चांगली आहे . . . जरा
शब्दकळा चांगली आहे . . . जरा उदात्त विषयांकडे वळा आता .>>>
बाजीरावजी , धन्यवाद .
(बाजीराव मस्तानी या विषयाचा विचार करावा म्हणतो .)
उल्हास भिडे सर , कावळेदादा
उल्हास भिडे सर , कावळेदादा ,
धन्यवाद !