पारंपारीक चिकन/मटण रस्सा

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 4 August, 2010 - 06:39
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ किलो चिकन किंवा मटण
आल, लसुण, मिरची, कोथिंबीर वाटण २ ते ३ चमचे
२ बटाटे कापुन
लसुण पाकळ्या ४-५ ठेचुन
२ मोठे कांदे चिरुन
हिंग, हळद,
२ ते ३ चमचे मसाला (तिखटाच्या आवडीवर)
चवीनुसार मिठ
१ चमचा गरम मसाला
वाटण : २ छोटे कांदे व अर्धी वाटी सुके खोबरे भाजून वाटून

क्रमवार पाककृती: 

प्रथम चिकन किंवा मटण साफ करुन धुवुन त्याला आल, लसुण मिरची कोथिंबीरची पेस्ट लावुन घ्या. मग थोड्या वेळाने टोपात तेल घालुन त्यावर लसुण पाकळ्यांची फोडनी देउन कांदा गुलाबी रंग येई पर्यंत शिजवा. मग त्यात हिंग, हळद, मसाला घालून त्यात चिकन किंवा मटण घालावे. जर चिकन असेल तर चिकन सोबतच बटाटे घालावेत व जर मटण असेल तर आधी ते अर्धे शिजवुन मग बटाटे घालावेत कारण मटण शिजायला वेळ लागतो. मग वरती ताट ठेउन ताटात पाणी ठेवावे. आता जेंव्हा ढवळायच असेल तेंव्हा ताटातील पाणी त्यात टाका किंवा तुमच्या गरजे पुरते पाणी टाका. मग चिकन/मटण शिजले की त्यात कांदा खोबर्‍याचे वाटण, मिठ व गरम मसाला घाला. एक चांगली उकळी येउ द्या व गॅस बंद करा.

वाढणी/प्रमाण: 
५-६ जणांसाठी
अधिक टिपा: 

बटाटा ऑप्शनल आहे.
चिकनला मुरवण्यासाठी आल लसुणच्या पेस्ट सोबत २ चमचे दही किंवा १ लिंबुचा रसही लावतात.
पुर्वी कांदा खोबर आख्ख चुलीत भाजून ते पाट्याने वाटून वाटण करत त्याला वेगळीच चव असते. मी ही कधितरी करते अस. आणि पुर्ण मटणही चुलीवर करते कधीतरी मुड आणी वेळ असल्यावर.

माहितीचा स्रोत: 
आई.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या आगरी पद्धतीच्या मटणाची रेसिपी आमच्या चविष्ट चॅनेलवर.
आगरी पद्धतीचे मटण
https://youtu.be/4fo1cQz6Woc
तिखट पण चविष्ट असे मटण ही आगरी मेजवानीची खासियत त्यात खास भाजक्या कांदा-खोब-याच्या मटणाची लज्जतच न्यारी. पाहुया खास आगरी पद्धतीचे मटण करायची रेसपी. रेसिपी आवडल्यास जरुर लाईक करा, शेयर करा, कमेंट करा आणि अशाच नवनविन रेसिपीज पाहण्यासाठी जर अजून सब्सक्राईब नसेल केला आमचा चविष्ट चॅनेल तर नक्की सब्सक्राईब करा.
IMG_20210728_185049_1.jpg

Pages