फॅशनचे नवनवीन ट्रेन्ड्स! - भाग १

Submitted by दक्षिणा on 23 January, 2013 - 02:53

या पुर्वीची फॅशनवरची चर्चा http://www.maayboli.com/node/39904 इथे सुरू झाली होती. पोस्ट्स एक हजाराच्या वर गेल्याने, हा नविन धागा उघडला आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी अजूनही बॅकपॅक आणि छोटी स्लिंगबॅग या नोटवर आहे.
मला शक्यतो नाही आवडत भल्या मोठ्या हॅण्डबॅग्ज. त्यापेक्षा लेदरचे क्लासी बॅकपॅक वापरेन.

सेम पिंच... मला ही मोठ्या पोतंवजा बॅगा लागतात. शिवाय डब्याची वेगळीच असते.

सेम पिंच... मला ही मोठ्या पोतंवजा बॅगा लागतात. शिवाय डब्याची वेगळीच असते.>>>>>>>> सेम पिंच Happy

http://www.baggit.com/products/488-penguin-rocky-lavender.aspx#.UQjwjPLcBqA
>>>
ही वाली मस्त्त्त्त आहे Happy

http://www.baggit.com/products/270-roxy-crush-p-black.aspx#.UQjxVfLcBqA
>>
ही पण छान!

मला लहान मोठ्या सगळ्याच बॅगा लागतात
ऑफिसात वेगळी, पिक्चरला जाताना वेगळी, ट्रेडिशनल वेअर वर वेगळी, डिनरला जाताना वेगळी इत्यादी
तरीही मला दर वेळेला वाटतं की माझ्याकडे आज नीट सूट होईल अशी एकही बॅग नाहीये Sad

मोकिमी, आता भेटलेच पाहिजे. उडत्या बाह्या हा फार दिवसांनी ऐकायला आला शब्द प्रयोग माझ्याकडे होते तसले टॉप्स, शिवलेले, स्कर्ट वर घालायचे. टेलरला पण तसेच सांगायचो कि.

बरे आम्ही इतके देशी कि जीन चे कापड विकत घेऊन त्याची मिडी शिवली आणि घातली. कधीही स्टायलिश दिसणे शक्यच नव्हते त्या काळी. ते बघून क्लासला जाताना एक सायकल वाला उगीचच " आईवडिलांना खपवायला जड जाणार ! " असे म्हणून गायबला. त्याहून घाबरून पहिल्याच मुलाशी लगेच लग्न करून टाकले. ह्या ह्या ह्या. काय पण बावळट.

सुती पठाणी ड्रेस शिवलेवते का? ते पुरुष घालतात हे ही आम्हाला माहीत नसायचे.

चायना सिल्क च्या वगैरे साड्या माहीत आहेत का? हाइट होती तेव्हा ती. आणि ते मला कधीच नीट दिसायचे नाही. आपण कलकत्ता कॉटन वाले. ( उंबरठा स्मिता मॉडेल!)

केस मनात येतील तेव्हा वाढवा गं मी तर आता फुकटचा टीपी. प्रॉजेक्ट म्हणून वाढवते आहे. व्यवस्थित तेल मसाज शांपू आणि कलर करायचे. म्हणजे केस चेहर्‍याला चांगले फ्रेम करतात. उलटे वयाने चेहरा ब्रॉड होतो त्याला जरा मोठे केसच बरे दिसतात. ४० परेन्त बॉयकट ठेवलेला मी नवर्‍याच्या आग्रहाने.

ऑफिसात वेगळी, पिक्चरला जाताना वेगळी, ट्रेडिशनल वेअर वर वेगळी, डिनरला जाताना वेगळी इत्यादी
तरीही मला दर वेळेला वाटतं की माझ्याकडे आज नीट सूट होईल अशी एकही बॅग नाहीये >>>

हायला !!! सेम पिंच.....

माझा नवरा तर भयंकर घाबरतो माझ्या बॅग खरेदीला..... ह्या यादीत माझ्या कडुन अजुन भर म्हणजे ट्रीपला जाताना वेगळी.....

सुती पठाणी ड्रेस शिवलेवते का? ते पुरुष घालतात हे ही आम्हाला माहीत नसायचे.

चायना सिल्क च्या वगैरे साड्या माहीत आहेत का? >>>

आमा आता तर भेटलेच पाहिजे आपण.... त्या चायना सिल्क च्या साड्यांनी धुमाकुळ घातला होता... माझा पण पठाणी ड्रेस होता ब्राउन कलर चा... माझी आई चायना सिल्क च्या कापडाचे मला फ्रॉक आणि मॅक्सी शिवायची. लहान पणा पासुन गुट्गुटीत असल्याने, ते कापड माझ्या ढेरी वर मस्त बसायचं.... आइच्या ऑफिस मधे एक उल्हास्नगर चा सिंधी काम करायचा... तो आम्हाला आणि त्या ऑफिस मधल्या समस्त बायांना ही कापडं पुरवायचा.... त्याच्या कडे सिंगापूरच्या साड्या पण असायच्या.... काय काय गमतीचा माल असायचा त्याच्या कडे.... पण एक धमाल होती.... आजच्या सारखी पावला पावलाला कपड्यांची दूकानं नसायची.

दिवाळीची / लग्ना ची खरेदी फक्त आणि फक्त दादरलाच व्हायची . ठाण्यात त्या वेळी दुकानांचा सुळसुळाट नव्हता....

मला एक सांगा, ऑयली स्कीनवर मेकअप जास्त वेळ टिकावा ह्यासाठी काय करता येईल? पुढच्या आठवड्यात चुलत नणंदेचं लग्न आहे. दुपारचा मुहुर्त आहे. सकाळपासुनच तयारी करुन जाणार आहे. १-२ सोप्या हेअर स्टाईल्सपण सुचवा खांद्यापर्यंतच्या केसांसाठी.

>> तरीही मला दर वेळेला वाटतं की माझ्याकडे आज नीट सूट होईल अशी एकही बॅग नाहीये अरेरे
मला पण Sad

ऑयली स्कीनवर मेकअप जास्त वेळ टिकावा ह्यासाठी काय करता येईल?>> चेहरा स्वच्छ धुतल्यावर, मेकप करायच्या काही काळ आधी, बर्फाचा तुकडा चेहर्‍यावर फिरवा.

उडत्या बाह्या>> म्हणजे कॅप स्लिव्हज का?

स्वाती, ह्या टीपव्यतिरिक्त दुसरं काही? बर्फ फिरवुनही तेलाच्या नद्या वाहतातच. फाऊंडेशन लावु शकत नाही मी. स्किनपोर्स बंद झाल्यासारखे वाटतात मला त्याने.

योडे मेन मेकप च्या वेळी योग्य ती काळजी घेणे, टिपकागद जवळ बाळगणे, शिवाय टचप साठी सामानही बाळगणे, याशिवाय मला दुसरा पर्याय दिसत नाही.

काही स्पेसिफिक प्रकारच्या प्रोफेशनल मेकपची टेक्निक्स आहेत जी १३-१४ तासांच्या शिफ्टसाठी मेकप टिकवून ठेवतात. पण त्यासाठी रेग्युलर टचप करावा लागतोच.
ती वगळता बेस किंवा फाउंडेशनशिवाय मुंबईच्या धावपळीत मेकप टिकवणे अशक्य.

काँपॅक्ट प्रेस्ड पावडरचा बरोबर ठेवणे. त्याने मॅट लुक छान देता येतो. फाउंडेशन सकाळी लावले तरीही
प्रवासात, व्हेन्यूवर पोहोचायच्या आधी काँपॅक्ट चा एक हात फिरविणे. व हल्का ब्लश लावणे. कार्यालयात प्रवेश करण्या आधी रेस्ट रूम मध्ये जाऊन मेकप व साडी वगैरे नीट करता आले तर फार बरे. उत्तम प्रतीचे स्प्रे अत्तर किंवा डिओ मारायला विसरू नका. ह्याचा ऑयली स्किन शी संबंध नाही पण आपल्या भोवते एक फ्रेश एअर तयार होते.

पर्स मध्ये मेकप किट कॅरी करता ना? शिवाय वेट टिश्यू एक पाकीट ठेवा. फौडेशन लावल्यावर हलके टिश्यूने पॅट करून मग काँपॅक्ट ची पावडर लावा.

लॅक्टोकॅलामाईन लावलंयस का
>>
आधी लावायचे पण २-३ तासांनी चेहरा ऑयली वाटतोच. मागे एकदा ऑलिवीयाचा फाऊंडेशन केक बघितला होता पण खरंतर ते सगळं वापरायची आधीच भिती वाटते मला स्कीन सेन्सिटीव्हीटीमुळे.

स्किन ब्रीद करत नाही. ते चुकीची माहिती आहे. आपण नाकानेच ब्रीद करतो. त्यामुळे पर्सेप्शन प्रॉब्लेम दूर करा.

लॅक्मेचे पोकेमॉन बॉल सारखे दिस्णारे फाउंडेशन पॅक आहे. तो मस्त आहे. अगदी लाइट आणि मॅट.
हिमालया नीम फेस वॉश वापरल्याने पण स्किन मस्त फ्रेश होते. हपिसात जरूर न्यावे.

ह्या काही टिप्स नेट वर सापडल्या

Choose the Right Makeup
Foundations, whether they come in the form of cream or compact powder, are commonly oil-based. Using them would worsen the greasy and shiny look of your skin. One option that you have is to use loose powder to control the oil on your face. Aside from that, loose powders also take off that shiny appearance. The good thing about loose powder is that you can apply it anytime of the day. However, if you want the coverage given by foundations, try finding a product that is oil-free and water based.
Putting on Makeup Tactically
Before applying foundation or makeup, use a blotting paper. This will help in absorbing excess oil from your face. Consequently, when you put on foundation, less oil will be at the base therefore your skin would not appear that shiny. Another technique that you can do is to apply shimmery makeup. This will enhance the natural shine of your skin making it attractive rather than problematic.
There is a lot of things you can do to control the oil on your face. Keep this tips in mind and you will no longer have to worry about having all that grease on your face. All you will have is a healthy looking skin.

बॅगिट च्या सर्व बॅग्स आवडल्या.. ती स्वतःच गळ्यात बीड्स च्या माळा घातलेली आणी ते शेवटची ब्लॅक जास्त आवडल्या..

कुछ हटके नेल आर्ट

५.६ उन्ची अणि जाडसर बान्धा आहे माझा. कोणती जीन्स शोभून दिसेल? स्किनी मधे जास्त जाड दिसायला होत का?

अ‍ॅन हॅथवे हल्ली जाम विनोना रायडरची स्टाइल मारायला जाते असं वाटतं का? मला विनोना भयंकर आवडते आणि तिला गूळ, साखर, मध यांच्या एकत्रित पाकातून बुचकळून काढली तर ती अ‍ॅन हॅथवे होईल असं वाटतं Wink

अ‍ॅनच्या फोटोखालचे ग्रे, ऑरेंज, क्रीम वाले नेल आर्ट आवडेश... सोss मी!! Happy

Pages