सांगेन काय आता...

Submitted by मुग्धमानसी on 31 October, 2012 - 06:24

सांगेन काय आता माझ्या मनात आहे,
क्षण टाळल्या सुखाची ती पायवाट आहे.

पाहेन रोज तुजला मी याच आरशात,
समजवेन अन स्वतःला कि मीच त्यात आहे.

आकाश पेलणारे झाले जुने तराणे,
गाण्यात फक्त माझ्या ती चांदरात आहे.

सांगू कसे नी काय माझ्या मुक्या मनाला,
असले मुकेच झुरणे त्याच्या मनात आहे.

शब्दास शब्द जुळता आले जुळून गाणे,
गाण्यास अर्थ जुळण्या आता हयात आहे...!!!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही गझल आहे की कविता?

मतला सोडून सगळे शेर आवडलेत.

असले मुकेच झुरणे त्याच्या मनात आहे.
>>>
मनाच्या मनातले Happy

ह्यावरून माझ्या एका मित्राने केलेली कविता आठवली: "हृदयालाही हृदय असते" ह्या नावाची. Happy

मुग्धमानसी,

आरशात, सांगू कसे नी काय....

अशा काही चुका टाळता आल्या असत्या.

प्रयत्न चांगला आहे.

@चांदणी लाड
मी बर्‍याच दिवसांनी आपला प्रतिसाद वाचला.

छान प्रयत्न.
गझलेच्या अंगाने जाणारी कविता.

"गाण्यास अर्थ जुळण्या आता हयात आहे."
इथे "मिळण्या" असं हवं आहे का ?
वैम. कृगैन.