पट पट पट पट मोजित नोटा

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

पट पट पट पट मोजित नोटा चाले राजा नेता
ओठावरती जीन मिसळूनी घेतो रुपेरी सोडा

उंची फेरारी स्वतःस छान
जनास करी ईंधन दरवाढ
भाववाढ ती सामान्यांस अन स्वत: फिरवीतो स्कोडा

नेता राजा फार हुषार
सत्तेवर तो होता स्वार
नुसता त्याला पुरे हवाला स्वीस अकौन्ट काढा

सात सदनिका भूखंड सात
बळकावितो हा एक दमात
आला आला राजा नेता सोडा रस्ता सोडा

मूळ कविता:

टप टप टप टप टाकित टापा चाले माझा घोडा
पाठीवरती जीन मखमली पायी रुपेरी तोडा

उंच भरारी दोन्ही कान
ऐटीत वळवी मान कमान
मधेच केव्हा दुडकत दुडकत चाले थोडा थोडा

घोडा माझा फार हुशार
पाठीवर मी होता स्वार
नुसता त्याला पुरे इशारा कशास चाबुक ओढ़ा

सात अरण्ये समुद्र सात
ओलांडीत हा एक दमात
आला आला माझा घोडा सोडा रस्ता सोडा

विषय: 
प्रकार: