उधळीत फक्त गेलो मी गंध भोवताली!

Submitted by सतीश देवपूरकर on 28 January, 2013 - 09:47

गझल
उधळीत फक्त गेलो मी गंध भोवताली!
मजला कधी जगाच्या कळल्या न हालचाली!

आहेस तूच पहिला वहिला विचारणारा;
रानातल्या फुलाला त्याची अशी खुशाली!

बोलायला हवे ते मी नेमके विसरलो!
अगदी उभ्या उभ्या ती स्वप्नात काल आली!!

अमुचा तसा न काही संवाद फार झाला;
चोरून भेटण्याची चर्चाच फार झाली!

पाऊस श्रावणाचा यावा तशी अचानक;
रुसते कधी कधी ती, हसते मधेच गाली!

आयोग तो सहावा, जाहीर काय झाला!
प्रत्येक चेह-यावर चढली अपूर्व लाली!!

ती जन्मखूण होती, बघताच प्रेम जडले....
तो तीळ हनुवटीचा! कातिल खळीच गाली!

बघ ऊठसूठ लिहितो, जो तो हवे नको ते!
गझलेस काय उरला नाही कुणीच वाली?

डोळे मिटून सारी पापे करून झाली!
देवास पूजण्याची घाई कितीक झाली!!

देती सहज सुपारी, घडतात रोज हत्त्या!
माणूस स्वस्त झाला, माया महाग झाली!!

व्यक्ती असो कुणीही, निवृत्त व्हायची ती!
यादीत नाव माझे वर काय, काय खाली!!

ते थोर लोक, ज्यांची उठलीत पावले ही.....
होतील मार्गदर्शक, त्यांच्याच वाटचाली!

करतो प्रयास माझा, परवा करीत नाही!
विधिलेख कोणता या लिहिला असेल भाली?

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बोलायला हवे ते मी नेमके विसरलो!
अगदी उभ्या उभ्या ती स्वप्नात काल आली!!>> दुसरी ओळ मिटर मधे बसते आहे का?

बोलायला हवे ते मी नेमके विसरलो!
अगदी उभ्या उभ्या ती स्वप्नात काल आली!!

हा शेर छान.

बोलायला हवे ते ...............
आणि
आहेस तूच पहिलावहिला.............

हे शेर खूप आवडले

गझल म्हणजे सासू लागते आमची.>>>इतकीकाय ती अजून म्हातारी झालेली नाहीये बरका झंपीजी

Lol

अमुचा तसा न काही संवाद फार झाला;
चोरून भेटण्याची चर्चाच फार झाली!

>>> ह्या शेराला मैफीलीत जोरदार टाळ्या , वाहवा मिळेल असे वाटते Happy

प्रोफेसर, पहिले सहा बास होते की. तेवढेच वाचले तर चांगली आहे. बाकीचे "बरं मग?" कॅटेगरीत आहेत.
उभ्या उभ्या आणि चोरून भेटण्याचा आवडला. सहावा आयोग पण बरा. भरीचे शब्द रसभंग करतात ( जसे इथे "तो" )
पण इतर अत्याचारांपेक्षा ही चांगली आहे.

पारिजाता.
केव्हा थांबायचे(गझलेत) हा निर्णय शायराचा असतो!
केव्हा वाचणे बंद करायचे हा निर्णय वाचकांचा असतो!!

मी दिले काळीज माझे काढुनी, झाला गुन्हा का?
गूज हृदयातील लिहिणे, काय अत्याचार होतो?
इति प्रोफेसर