योगासनं शिकण्याविषयी

Submitted by नताशा on 22 January, 2013 - 10:35

शास्त्रशुद्ध पद्धतीने योगासनं शिकण्यासाठी कुठली पुस्तकं योग्य आहेत? किंवा डिवीडी वगैरे?
डिवीडी असेल तर बरं कारण पुस्तका पाहून पाहून करणं कठीण पडतं.
मला तरी नीट योगासनं शिकवणारे क्लासेस घराजवळ सापडले नाहीत. बिक्रम योगा, भरत ठाकुर वगैरे नकोय.. पॉवर योगा अजिबात नकोय. एनी सजेशन्स?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बी के एस अय्यंगारांचं 'light on yoga" किंवा योगदीपिका.
त्यांच्या डीव्हीडी आहेत की नाही याची कल्पना नाही मला.

यिन स्टाइल योगा साठी पॉल ग्रिली ची डीव्हीडी मस्त आहे.

शूम्पी, ते बीकेएस चं पुस्तक फार जाडजुड आहे ना? लायब्ररीतून एक आणलं होतं. त्यात बघून बघून कसं करायचं ते टेक्निक काही जमलं नाही मला. पण दुसरं काहीच नाही तर मग आणीन.
पॉल ग्रिलीची सीडी भारतात बघावी लागेल. बरं यिन स्टाइल म्हणजे काय?
आणि ती शिल्पा शेट्टीची सीडी बरी आहे का?

माझ्याकडचं light on yoga फार जाडजुड नाही पण पुस्तक वाचोन आसनं शिकणं मला फार अवघड वाटतं त्यापेक्षा डीव्हीडी खूप चांगली.
यिन म्हणजे फार काही ग्रेट माहिती नसलेला आणि नवा प्रकार नाही. फक्त पॉवर पोझेस न करता फक्त जमिनीवर बसून आणि झोपून करायची आसने.
टाइप ए लोकांना फारसा पसंत नसणारा प्रकार Happy
आधिक माहितीसाठी लिंक बघ.
http://www.paulgrilley.com/

यूट्यूबवर पण शोध. मिळेल काहितरी. शिल्पा शेट्टीची डीव्हीडी मी नाही पाहिलेली.

आसनांमध्ये होणारी मसल्सची हालचाल आणि त्यावर फोकस ठेवून २ ओर्थोपिडिक डॉक्टरांनी २ पुस्तकं लिहिली आहेत (की मसल्स ऑफ योगा) ती व्हिज्युअली फारच छान आहेत. माझ्याकडे फक्त पहिला वॉल्यूम आहे.
त्यांची लिंक : http://www.bandhayoga.com/

धन्यवाद शूम्पी.
इब्लिस, युट्युबचा प्रॉब्लेम असा आहे की रोज सकाळी उठून आधी लॅपटॉप, इंटर्नेट सुरु करुन मग युट्युबवर लोडिंग वगैरे.. ब्रॉडबँड नाहिये सध्या माझ्याकडे.. त्यामुळे फार वेळ जातो.
दुसरं असं की युट्युबवर ढिगानी व्हीडिओज आहेत. त्यातले खरंच जेन्युइन कुठले हे पण कळत नाही. उगाच चुकीचं काहीतरी करायला नको म्हणून जास्त काळजी. तुम्हाला कुठले चांगले व्हिडिओज माहिती असतील तर प्लीज सांगा.

नताशा,
फायरफॉक्स घ्या. त्यात फ्लॅश व्हिडिओ डाउनलोडर नामक एक अ‍ॅड ऑन दिसेल. ते घ्या.
याच्या सहायाने यूट्यूबचा व्हिडू डालो होतो.
फार एक्जाम्पल हे बगा: http://www.mimarathi.net/node/10068 म्हंजे कदाचित काय वर्जिन्ल ते कळेल. तेकायतरी सोपं केलं वगैरे सांगताहेत. माझा अन योगा चा संबंध तो एक व्यायामप्रकार इतकाच आहे. इतर जास्त कमी मला समजत नाही.

शिल्पा शेट्टीची डीव्हीडी ठिक आहे. मी फक्त ती रेफरन्सला म्हणून लावते. म्हणजे एका रांगेत सर्व आसने करून होतात.

पहिल्यांदाच योगासने शिकणार असाल तर एखाद्या प्रशिक्षकाकडून शिकून घ्या, असे माझे मत. प्रत्यक्ष शिकण्यामधे व्यवस्थित पोझेस आणी श्वासाची लय व्यवस्थित समजून घेता येते. एकदा शिकून घेतल्यावर मग घरच्या घरी करायला काहीच त्रास नाही.

नताशा, तुझ्या आसपास पतंजलीचं केंद्र आहे का? ते शिकवतात व्यवस्थित.

रामदेव बाबांच्या सिडीज पण आहेत. पण त्यातही ते स्वत:च सांगतात की या सिडी रेजिमचा क्रम किंवा बारकाव्यांपुरत्याच रेफर करा. प्रत्यक्ष शिकवणारा महत्वाचा.

पतंजली केंद्र नाहिये. रामदेवबाबा सीडीज चांगला ऑप्शन वाटतोय.
धन्यवाद नीधप, नंदिनी.

रामदेवबाबा अन शिल्पा शेट्टी मिळून शिकवणार तर मला..वाह क्या स्पेक्ट्रम है Happy मध्ये इतर काही नाहीच.

रामदेवबाबा बेस्ट .... श्वास कधी घ्यायचा आणि कधी सोडायचा हे व्यवस्थित सांगितले आहे. युट्युबवर बघा किंवा डाउनलोड करुन घ्या.

बरेचसे आसनं लक्षात राहण्यासाठी एखादे चांगले (high resolution) चे पोस्टर आहे का?

नताशा, तुम्ही योगासनांचा प्राथमिक स्तरावरील अभ्यास कुणा अनुभवी प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली केला आहे कां?? नसल्यास कृपया करा. नंदिनीने म्हटल्याप्रमाणे आसनांची स्थिती आणि श्वासाची लय ई. गोष्टी कळल्या की मग improvisation म्हणुन पुस्तके\सीडिज यांची मदत घेऊ शकाल.

शुभेच्छा!

विजय, धन्यवाद. बघते.

भ्रमर, नाही. मला कुणी जवळपास खरे योगा शिक्षक मिळत नाही, हाच प्रॉब्लेम आहे. आजकाल सगळे फॅड योगा स्टुडिओ वाले आहेत. बिक्रम अन भरत ठाकुर वगैरे. बरेचसे फॉरेनर्स ना पटवण्यासाठी उघडलेले स्टुडिओज, जिथे फारच वरवरनं शिकवतात. पॉवर योगा वाले भरपूर आहेत, ते मला नकोय. नायतर सरळ पर्सनल ट्रेनिंग घ्या म्हणतात. त्याचे रेट्स १५०००रु महिना म्हणे. मी फोनवरच हात जोडले.
म्हणून मग शेवटी रामदेवबाबा अन शिल्पा शेट्टी अन पुस्तक हे शिक्षक म्हणून फायनल करावे वाटतेय. काही प्रॉब्लेम नाही ना?

पुस्तके सिडीजच्या आधी योगशिक्षक मस्ट.
पुण्यात असता का? कुठल्या भागात? पुण्यात बहुतेक सगळीकडे पतंजलिची केंद्रे आहेत.
अय्यंगारांची इन्स्टिट्यूट आहे मॉडेल कॉलनीत.

जवळपास नसेल तर विकेंडला थोडेसे लांब (शहराच्या मध्यवर्ती भागापर्यंत) यायचे बघा. पण कुणाकडून तरी शिकून घ्या.

मला सांगा रथसप्तमीला पुण्यात सामुहीक सुर्य नमस्कार घालतात. कुणाला माहित आहे का कुठे ते? पत्ता / नंबर असल्यास द्या Happy

नताशा,

विमलाताई ठकारांची पुस्तके उत्तम असतात असे डॉ बंग यांनी लिहीले होते म्हणुन मी ती वाचलीत.

तसेच बिहार योग स्कुलचे (नावाची खात्री करुन सांगते, किंवा कोणाकडे 'माझा साक्षात्कारी हृदयरोग ' असेल तर त्यात पाहुन सांगा) योगनिद्राच्या ऑडियो सीडीज अतिशय चांगल्या आहेत. त्या मागवून घेऊ शकतेस.

रामदेवबाबांची सीडी आहे. अगदीच काही नसेल तर ठिके ती. मी सुरवातीला शिकले होते त्यामुळे त्यात उजळणी झाली.

शिकुन घ्यावे +१
पण योग शिक्षक पण सांभाळुन. मध्यंतरी माझे एक शिक्षक होते, ते फार वैताग होते. त्यांना वैतागुन मी योग सोडुन दिले. आणि तीच चूक झाली. Sad

स्त्रियांसाठी योग: नावाचे गींताजली अय्यंगारांचे पुस्तक आहे. पण पुन्हा तेच. बेसिक आधी क्लासात शिकुन मग ही पुस्तके रेफर करणे ठिक आहे.

त्या ओरिजिनल अय्यंगारांची सुद्धा पुस्तके आहेत.

बाकी शुम्पीला विचार. तिच्याकडे उत्तम रेकमेंडेशन्स आहेत व्हिडियोजचे.

मलाही ते बिक्रम योगा, शिल्पाशेट्टी वगैरे अजिबात करावेसे वाटत नाही. समहाऊ ते टोटली फ्रॉड वाटतात. तसेच ते अमुक बाबा वगैरे ही नाही. तरीही रामदेवबाबांची सीडी बरी आहे.
योगाच्या रीतसर परिक्षा असतात. एखादी लेव्हल करायला हरकत नाही. ते अंगवळणी पडले की तिथुन पुढे विचार करता येईल.

माझेही व्होट पतंजलि योगकेंद्राला. निदान व्यवस्थित शिकुन होईल.

नताशा , मी 1 महिन्यापासून भरत ठाकूर योग क्लासला जायला लागलीये - कोरेगाव पार्क. पुण्यात. मला तर खूप चांगला अनुभव येतोय. यापूर्वी २-३ क्लासेस ट्राय केले होते पण आवडले नव्हते. तुझी भरत ठाकूर क्लासची कमेंट वाचली म्हणून लिहिले. मी आजच मेम्बरशिप renew करून पुढच्या महिन्याची फी भरलीये Happy हा क्लास आणि टिचर चांगला आहे. बाकीच्या शाखांचे माहित नाही.

पौर्णिमाची या संदर्भात एक पोस्ट वाचली होती. तिला माहिती असेल कदाचित. >> मी बोलले तिच्याशी.. ते फक्त क्लासच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. मी कुठेही क्लासला जात नाही.

स्वर, मी पण तिथेच गेले होते गं (आपण भेटलोय की काय एकमेकींना Happy )..पण मला तो ट्रेनर बिलकुलच नाही पटला. पहिल्याच दिवशी त्याने स्ट्रेचिंग, मग ११ सु. न. आणि मेडिटेशन असं करुन घेतलं. पण सगळंच इतकं फास्ट. कार्डिओ एक्सरसाइज म्हणून ते ठीके पण माझं एम नीट योगासनं शिकण्याचं आहे. ते तिथे जमेलसं वाटत नाही. रच्याकने, किती जणं आहेत सध्या बॅचमध्ये? कमी असतील तर थोडं कस्टमाइज करतील का विचारावं लागेल. पण खरं म्हणजे त्या ट्रेनरलाच योगा येत नाही असं माझं मत झालं. (जे काय मी लहानपणी शिकलेय त्यावरुन). तो हातभर टॅटु वालाच ट्रेनर आहे का अजुनही? Wink

नीधप, हम्म..विकेंडला डेक्कनला जाऊन शिकणं हा एक पर्याय आहे म्हणा..एक्सक्युजेस म्हणून नाही पण काय होतं की त्यासाठी १५-१७ किमी वनवे जावं लागतं अन योगा क्लास म्हणजे भल्या पहाटे. त्यामुळे मग कंटाळा. मग तो डिसकंटिन्यु होण्याचे चान्सेस जास्त. म्हणून शेवटचा पर्याय आहे तो.

रैना Happy ते नकटीच्या लग्नाला सत्राशे विघ्न म्हणतात तसं होतं या योगा/जिम वगैरे प्रकारांचं.
पुस्तकं बघते. योगनिद्रा ऑडिओ सिडीमध्ये फक्त योगनिद्रा शिकवतात की सगळंच?

लहानपणी फ्रीमध्ये शिकवायचे लोक तर मी नीट रेग्युलर शिकले नाही. भो.आ.क.फ. Sad

आमच्या ब्रँचमध्ये असलेले दिलिप भातलवंडे हे योगा शिकवतात व त्यांची बरिच पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. हवा असल्यास त्यांचा कॉन्ट्यक्ट नं देवु शकेन.

त्या ओरिजिनल अय्यंगारांची सुद्धा पुस्तके आहेत>> लाइट ऑन योग हे त्यांचच आहे जे मी रेकमेंड केलेलं आहे.
नताशा तू कोथरुडमध्ये रहात असलीस तर एक उत्तम योगा क्लास मला माहिती आहे. आई-वडिल-मुलगा असे तिघे शिकवतात. ते रमामणी अय्यंगार इंस्टिट्युटमध्ये पण शिकवतात. कित्येक वर्षे शिकवत आहेत.
योगासनांमध्ये सर्व अवयवांची अलाइनमेंट कशी हवी ह्याबद्दल शिकण्यासाठी आणि स्पेसिफिक शारिरिक व्याधी साठी योगासनांचा थेरप्युटिक वापर हे शिकण्याकरता अय्यंगार क्लासला तोड नाही.

विक्रम योगा मी स्व्तः ट्राय केलेलं नाही पण त्याच धर्तीवर (कारण विक्रम चौधरीने त्याचे मॉडेल कॉपीराइट केले आहे, तो एक वेगळाच वादाचा मुद्दा आहे) इथे सनस्टोन योगा म्हणून एक चेन आहे तिथे गेले होते. मला ते आवडण्याची कारणं म्हणजे कृत्रिमरित्या वाढवलेलं खोलीचं तापमान आणि आर्द्रता, त्याच त्याच आसनांचा कधिही न बदलणारा सिक्वेन्स.

पावर योगा बद्दल एवढा आकस का? बीकेएस अय्यंगारांचे गुरु म्हणजे टी. कृष्णंमाचार्य. त्यांचे प्रॉमिनंट शिष्य म्हणजे बीकेएस अय्यंगार (अय्यंगार पद्धत:पुणे), के. पट्टभी जॉइस(अष्टांग योगा पद्धत:मैसूर), इंद्रादेवी(साइ योगा: अमेरिका, अर्जेंटिना), टीकेव्ही देसिकाचार( विन्यासक्रम: चेन्नै- कृष्णंमाचार्य यांचा मुलगाच ), श्रीवत्स रामस्वामी(विन्यासक्रमः अमेरिका)
ह्या सर्व प्रॉमिनंट शिक्षकांनी कृष्णम्माचार्यांचीच विन्यासक्रम पद्धत आणि त्यावर स्वतःचे संस्कार करून जगभरात नेली. पावर योगा म्हणजे फार काही वेगळं वेस्टर्न फॅड नाही. विन्यासक्रम म्हणजे सूर्य नमस्काराच्या बेसिक पोजेस वापरूनच उभ्याने करायची आसने. त्याने कार्डिओ प्रकाराचा व्यायाम नक्कीच होतो. ते वाइट तेव्हा ठरेल जेव्हा करणारी व्यक्ती स्वासाचे लय नीट सांभाळणार नाही , आपलं शरीर आपल्याला देत असलेले क्यूज नीट लक्षपूर्वक ऐकून सरावात बदल करणार नाही किंवा फक्त विन्यासक्रम करेल आणि अलाइनमेंटकडे लक्ष देणार नाही.
सांगायचा मुद्दा असा की नाही बै ते पावर योगा योग्य असं म्हणून कोणी ते डिसमिस करू नये.
कोणत्याही फ्लेवरचा योगा शिका पण निष्णात शिक्षकाकडून शिका आणि विसरू नका की प्रत्येकाचं शरीर आणी त्याच्या गरजा वेगळ्या असतात. स्वतःच्या गरजेप्रमाणे आसने त्यांची योग्य मॉडिफिकेशस वापरून करा आणि त्यासाठीच अनुभवी शिक्शकाची गरज आहे.

जरा जस्तीच मोठं आणि कदाचित विस्कळीत पोस्ट झालं खरं पण काय करणार विषय जिव्हाळ्याचा असल्याने वाहवत गेले Happy

ठाण्यात अंबिका कुटिर योग येथे चांगल्या पध्दतीने योगासने शिकविली जातात. तेसुध्दा मोफत. आणि त्यांचा बेसिक,अ‍ॅडव्हान्स असे कोर्सेस आहेत. पुण्यात आहेत की नाही ठाऊक नाही. पण मुंबईत खूप ठिकाणी त्यांचा शिक्षकवर्ग जाऊन शिकवतात (मोठा ग्रुप असेल तर)
माझा अनुभव उत्तम आहे. Happy

शूम्पी, तू जितकं जास्त लिहिशील तितकंच आम्हाला ज्ञान. त्यामुळे तू लिहिच.
पावर योगाविषयी आकस नाही पण एकतर मला अजिबात वजन कमी करायचं नाहिये. वाढलं तर धावेल. Wink दुसरं म्हणजे काही मेडिकल कंडिशन्समुळे मी हेवी कार्डिओ व्यायाम करायला नको आहे. पण वेट रिडक्शनचं आमिष म्हणून जिकडेतिकडे पावर अन बिक्रम योगाची चलती आहे. त्यात अर्धवट प्रशिक्षीत ट्रेनर्स (हे बरेचदा जिम ट्रेनर्स असतात. फारतर २-३ महिन्याचं योगा प्रशिक्षण घेतलं असतं) अगदी शाळेतल्या पीटीसारखे १-२-३-४ च्या तालावर फास्ट आसनं करुन घेतात. (कारण वेट रिडक्शनचं आमिष) माझ्या माहितीप्रमाणे योगासनं संथ लयीत श्वासाच्या तालावर करायला पाहिजे.
मग जर योगासनांचं मूळ USP फुलफिल होत नसेल तर त्या पावर योगात अन इतर कुठल्या व्यायामात काय फरक राहिला? हा माझा प्रश्न आहे. याचं उत्तर हे बिक्रम अन आर्टिस्टिक योगावाले लोक देत नाहीत. म्हणून मला ते नकोय.
ओरिजिनल बिक्रम किंवा आर्टिस्टिक योगा चांगलं असेलच पण त्यांचे ट्रेनर्स नीट प्रशिक्षित नसतात असं माझं निरिक्षण आहे. त्यांना प्रत्येकाला सुट होणारी आसनं करुन घेण्याइतकं ज्ञान नसतं. ते ठरलेल्या क्रमाने अन लयीनी सगळ्यांकडून सारखेच आसनं करुन घेतात. मी लहान असताना जिथे शिकायचे तिथे मला आठवतं की सर सांगायचे की अमुक कंडिशन असणार्‍यांनी पुढचं आसन करु नका वगैरे..
म्हणून जर कुणी ट्रॅडिशनल योग शिकवेल तर मला जास्त बरं वाटेल.
रच्याकने मी विमाननगरला रहाते. तिकडून कोथरुड फार दूर आहे.

नताशा तुझ्या पोस्टवरून मला असं वाततय की तुझ्यासाठी अय्यंगार स्टाइल फार्फार उपयुक्त होइल.
माझ्या माहितीप्रमाणे अय्यंगार स्कूल मध्ये टीचर ट्रेनिंग मिळवणं अजिबात सोपं नाही. पाचेक वर्ष लागतात त्यासाठी.

आर्टिस्टिक योगा म्हणजे काय ? Uhoh

तुझ्यासाठी अय्यंगार स्टाइल फार्फार उपयुक्त होइल.>> ओके. चला कीवर्ड तर मिळाला. आता शोधते. Happy
आर्टिस्टिक म्हणजे भरत ठाकुर.

नताशा:

तुझ्या पोस्टी मनापासून पटल्या. पॉवर योगा हा शब्द्च मला oxymoron वाटतो. आमच्या अ‍ॅथलेटीक क्लब मधले योगा क्लासेस बहुतेक त्या प्रकारात मोडतात. डाव्या पायाचा अंगठा मानेवरून उजव्या कानाजवळ आणला की ह्यांचा झाला योगा! आणि टाइट्ट कपडे घातलेले पुरुष! आपल्या शरिराला झ्पत नसलेली आसन करताना लोक दिसली. तू वर लिहल्याप्रमाणे contra-indication अजिबात सांगत नव्हते. मला ते सर्व प्रचंड unsafe वाटल. आणि कार्डिओच करायच तर जास्ती चांगले पर्याय आहेत म्हणून क्लब मध्ये योगाच्या क्लासला जाण सोडल. बिक्रम चौधरी तर मला चोर वाटतो. त्याचे योगा बद्दलचे अगाध विचार एकदा वाचले..he would rather be a fitness trainer!

योग या शब्दाचा अर्थ फार फार कमी प्रशिक्षकांना कळतो. आसन करण/येण हे योगाभ्यासाच एक अंग झाल संपूर्ण योगाभ्यास नव्हे. त्याचप्रमाणे ती एक साधना आहे--हे कुणीच बिंबवत नाही. साधना का करावी, कशी करावी, त्याची वेगवेगळी अंग याची उमज असलेला शिक्षक पाहिजे. आणि आमच्या इथे अमेरिकेत योगाच एवढ व्यापारीकरण झालेल आहे की विचारू नका.

बिक्रम चौधरी तर मला चोर वाटतो.>> वाटतो काय आहेच तो चोर Happy
आमच्या इथे अमेरिकेत योगाच एवढ व्यापारीकरण झालेल आहे की विचारू नका.>> खरं आहे ते . mile wide and inch deep

Pages