Submitted by प्राजु on 25 January, 2013 - 04:29
तेजस बैरागी जाताना क्षितीज विस्कटले
लाल जांभळे तांबुस केशर रंगच फ़िस्कटले
घणघण घंटा निनादली अन झांज किणकिणली
पाण्यावरचे हलके नाजूक तरंग भरकटले
परत चालली गुरे, उजेडा ओहोटी लागली
धूळ माखली सांज तिरावर विश्वाच्या वाकली
अबोल झाल्या झाडेवेली, अबोल गोठा, घरटे
कुठे तिहाई जोगीयाची दिशातुनी वाहिली
भरतीवेड्या चंद्रासोबत चांदणकणही आले
दंगुन त्यांना पाहू जाता हळूच पाऊल भिजले
बुडून जाणार्या गोलाला पाहुन डोळे भरता
नमन कराया नकळत माझे हात जुळोनी आले
- प्राजु
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चित्रदर्शी! धूळ माखली सांज
चित्रदर्शी!
धूळ माखली सांज तिरावर विश्वाच्या वाकली>> व्वा व्वा!
छान
छान
छान छान छान! मोहक शब्दांनी
छान छान छान!
मोहक शब्दांनी कातरवेळ नटवलेली आहेत आपण. आपल्या काव्यप्रवासास आमचे अनेक आशीर्वाद.
लयदार ओळी रचल्या आहेतच तर एखाद दोन ठिकाणी र्हस्व दीर्घ बदलायल हवे आहेत तेही पाहून घ्या वाटले तर.
कळावे
गंभीर समीक्षक
अतिशय सुरेख,
अतिशय सुरेख, चित्रदर्शी....... खूपच आवडली ही रचना...
छानच
छानच
वाह! सुमोही सांज!
वाह! सुमोही सांज!
तेजस बैरागी जाताना क्षितीज
तेजस बैरागी जाताना क्षितीज विस्कटले,>>.>>>सुंदर उपमा ,कविता मस्तच,
अतिशय उतम कविता खूप
अतिशय उतम कविता खूप आवडली
ओळ-न्-ओळ अप्रतीम
जियो !!
छान ..... चित्रदर्शी
छान ..... चित्रदर्शी
मनापासून आभार मंडळी.
मनापासून आभार मंडळी.
व्वा!
व्वा!
वाह! 'मावळत्या दिनकरा..
वाह!
'मावळत्या दिनकरा.. अर्घ्य तुज जोडुनि दोन्हि करा' ही आठवण झाली.
अत्यंत मनमोहक शब्दयोजना..
अत्यंत मनमोहक शब्दयोजना..
प्राजु, प्रथमपासूनच
प्राजु,
प्रथमपासूनच सुंदर...
भरतीवेड्या चंद्रासोबत चांदणकणही आले
दंगुन त्यांना पाहू जाता हळूच पाऊल भिजले
सुंदर ओळी...
सुं--द--र
सुं--द--र
विस्कटले उन्ह जरासे..---
विस्कटले उन्ह जरासे..--- श्यामली
आठवली .... झक्कास!
मनापासून आभार मंडळी.
मनापासून आभार मंडळी.
चित्रकाव्य
चित्रकाव्य
वा! क्या बात है! सुरेख!
वा! क्या बात है! सुरेख!