हात तो कोणापुढे पसरायचा नाही!

Submitted by सतीश देवपूरकर on 23 January, 2013 - 14:31

गझल
हात तो कोणापुढे पसरायचा नाही!
मोडणे चालेल,पण वाकायचा नाही!!

मीच माझ्या जिंदगीला द्यायचो खांदा....
भार प्रेताचा मला वाटायचा नाही!

पार चक्काचूर झालो, हे बरे झाले!
आरसा आता तडे मोजायचा नाही!!

काळजी काटेच घेवू लागले अमुची;
मोह आम्हाला फुलांचा व्हायचा नाही!

देत आळोखेपिळोखे ती उभी आहे!
हा तिचा शृंगार तुज सोसायचा नाही!!

कौतुकाची भीक द्यावी लागते येथे;
येथला तुज कायदा समजायचा नाही!

त्यामुळे त्याचे पिणे चिंताजनक नाही!
रेचतो इतकी तरी झिंगायचा नाही!!

काय अत्याचारही चुपचाप सोसावा?
काय पापांचा घडा फोडायचा नाही!

कर कितीही गोड, घाला कात वा काही!
प्रेम नसले तर विडा रंगायचा नाही!!

बोल काहीही, लिही काही, तुझी मर्जी;
वाद कोणाशीच मी घालायचा नाही!

अर्थ त्याच्या बोलणायाचा नीट ध्यानी घे;
एवढेही तो कधी बोलायचा नाही!

निस्तरावा लागतो मज शेवटी गोंधळ
घोळ कुठलाही नवा घालायचा नाही!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

देत आळोखेपिळोखे ती उभी आहे!
हा तिचा शृंगार तुज सोसायचा नाही!! <<< व्वा ! >>>

आवडली...

काही सुटे मिसरे खूप सुंदर आहेत...

प्रोफेसर,
>> पार चक्काचूर झालो, हे बरे झाले!
आरसा आता तडे मोजायचा नाही!!
>> देत आळोखेपिळोखे ती उभी आहे!
हा तिचा शृंगार तुज सोसायचा नाही!!
हे शेर छान. पण सोपा पॅटर्न आहे म्हणून खूप शेर उगीच केल्यासारखे वाटत आहे. का उगाच गझल Dilute करता?
पहिले पाचच शेर सुधा गझल पूर्ण करू शकले अस्ते की. ते पुढचे सगळे लटांबर निरुपयोगी आहे.
>> कर कितीही गोड, घाला कात वा काही!
प्रेम नसले तर विडा रंगायचा नाही!!
हा शेर सोडला तर. पण यात व्याकरणाचा लोचा आहे.
असो.

पण सोपा पॅटर्न आहे म्हणून खूप शेर उगीच केल्यासारखे वाटत आहे. का उगाच गझल Dilute करता?
पहिले पाचच शेर सुधा गझल पूर्ण करू शकले अस्ते की. ते पुढचे सगळे लटांबर निरुपयोगी आहे.

तंतोतंत शब्दात सुयोग्य मत देण्याची लेखिका पारिजाता यांची विलक्षण हातोटी पुन्हा एकदा दिसून आली, यासाठी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! आम्हाला पहिले पाच शेरही निरुपयोगी वाटले हे या निमित्ताने नोंदवत आहोत.

कवी तिलकधारी यांचे आगमन काही दिवसांनी होत असल्याचे आम्हास समजले. तोवर प्रतीक्षा करू. ते या कवीला वठणीवर आणतील.

अमुक गंभीर बुरख्याचा, तमुक आहे तिलकधारी........
बघू या, कोण वठणीवर कुणाला आणतो आहे!!

....................................................................................

तुझे तू आण रणगाडे, तुझ्या तोफा, तुझ्या फौजा!
पुरे आहे तुझ्यासाठी, अरे ही लेखणी माझी!

.....................................................................................
टीप: मुहूर्ताला बघायाला मुहूर्ताची गरज कोणा......
इथे तैनात कुठल्याही क्षणाला राहतो आम्ही!

......................प्रा.सतीश देवपूरकर

या अश्या मेड टू ऑर्डर द्विपदी रचणार्‍या इन्स्टन्ट गझल मिक्स वाल्या गझलकारांनी मराठी गझलेची केलेली वाताहात पाहून मनात येते की दादा आज हवे होते.

पारिजाता,
धन्यवाद प्रांजळ प्रतिसादाबद्दल!
पण सोपा पॅटर्न आहे म्हणून खूप शेर उगीच केल्यासारखे वाटत आहे. का उगाच गझल Dilute करता?
हे आपले वै. मत झाले जे व्यक्तीसापेक्ष आहे ज्याचा आम्हास आदर आहेच! त्यासठी कुठल्याही गंभीर भाटांच्या प्रशस्तिपत्रकाची गरज नाही.
सोपा पॅटर्न <<<<< ही काय आहे बुवा संकल्पना? सोपे कुणाला कवीला की, वाचकांना?
खूप शेर उगीच केल्यासारखे वाटत आहे<<<<<<परत एक वै.म. व व्यक्तीसापेक्ष शेरा!
कोणत्या गझलेत कुठे थांबावे हा निर्णय ज्याचा त्याचा असतो.
आम्ही स्वत: कोणतीही गझल पूर्ण झाली असे मानतच नाही, कारण प्रत्येक गझल ही ओपन एन्डेड असते!
शायराचा मूड संपला वा फारच दमणूक झाली त्याची तर तो थांबतो.
परत कधीही, कितीही वर्षांनी शायर त्या गझलेत नव्या दमाचे शेर टाकू शकतो, जुने शेर सुधारू शकतो वा ते पूर्णपणे वगळू देखिल शकतो!

गझलेतील प्रत्येक शेर हा, एक शायरास आलेल्या प्रतत्ययाचा अर्क असतो!
तेव्हा गझल डायलूट वगैरे करणे म्हणजे काय बुवा?................अनाकलनीय वाटते! क्षमस्व!

शेर अमुक एक शेरांचीच असली पाहिजे, अमुक एक इतके शेर नको<,,,,,,,,,,,,,,,असे कुठेही लिखितआहे का?

रिवाज असा आहे की गझलेत किमान पाच शेर असावेत!..............जाणकारांचे मत!
कमाल किती शेर असावेत हे शायराच्या ताकदीवर, कुवतीवर, मानसिकतेवर, फुरसतीवर, प्रतिभेवर, प्रज्ञेवर व इच्छाशकतीवर अवलंबून असते.

प्रत्येक शेर म्हणजे स्वतंत्र कविता असते.
प्रत्येक शेर प्रत्येकास आवडायलाच पाहिजे, असे नाही.
जसे, एका कवीची प्रत्येक कविता प्रत्येकाच्या पसंतीस पडेलच असे नाही! म्हणून तो उगाचच भारंभार लिहितो, असे म्हणता येत नाही
पुढचे सगळे लटांबर निरुपयोगी आहे.<<<<<<<<<<<वै.मत! आपणास निरुपयोगी वा लटांबर वाटते म्हणजे प्रत्येक वाचकास नव्हे!

कशाला लटांबर म्हणायचे ही सुद्धा एक वैयक्तीक बाब आहे!
थांबतो!
.............प्रा.सतीश देवपूरकर

अतिशय सुंदर गझल. मनमोहक गझलियत. देवपुरेकर, तुम्ही लिहीत रहा (नका लिहू असे म्हटले तरी तुम्ही लिहालच, तेव्हा लिहा असेच म्हणतो Proud )

आरश्याचा शेर आवडला

विडा चक्क गंडला आहे !!!! (सार्वत्रिक ठरण्याजोगेच असूनही वै. म. म्हणत आहे )

पारिजाता यांच्याबद्दल आदर वाटतो

जोक नव्हता तो>:>

असो असो उगीउगी....रडू नकोस पुढच्यावेळी नाही हसणार.... ओके ?

तू फिदीफिदी केलेस अन् जोक झाला असे मी समजलो वास्तविकतः मी गंभीर समीक्षकांचा प्रतिसाद वाचून गंभीर झालो होतो ..................( Wink )

महेश आपण आमच्या विनोदांवर हसलात ते पाहून आम्हांस अत्यंत हर्ष झाला आहे.
आम्ही कधी तरीच विनोदाच्या वाटेला जातो.
मागे एकदा आम्ही आमचा विनोद दादांना (माबोवर आमचे असंख्य दादा आहेत हे आपणास माहित असेलच) ऐकवला होता तेंव्हा त्यांनी आमची पाठ थोपटली. तुम्हाला म्हणून सांगते आनंदाने मन उचंबळून गेले.
बाकी पहिल्या विनोदावर हसला नाहीत? आपणास त्यात काय खटकले ते वदाल का? दुसरा विनोदात आम्हास नेमके काय सांगायचे आहे असे आपणास वाटते?
आपल्यासारख्या रसिकांनी हासून दिलेली दाद पाहून बरे वाटते. असाच लोभ असू द्यावा.

ishsh.gif
(आम्हांस सध्या दुसरा चेहरा मिळत नसल्याने हाच चालवून घ्या)

Rofl
रिया मस्तच !!फुल्टू कॉमेडी ......ग्रेट आहेस अगदी!!

_/\_

माबोवर आमचे असंख्य दादा आहेत हे आपणास माहित असेलच>>>

........मला भीती वाटते आहे Wink

या अश्या मेड टू ऑर्डर द्विपदी रचणार्‍या इन्स्टन्ट गझल मिक्स वाल्या गझलकारांनी मराठी गझलेची केलेली वाताहात पाहून मनात येते की दादा आज हवे होते.,<<<<<<<<<<<<<<

काय हा कळवळा, उमाळा! धन्य! धन्य!

कोण काय बोलतो? कोण काय झाकतो?
तो वरून ऐकतो, तो वरून पाहतो!
कोण वाहतो फुले, कोण वाहतो शिव्या?
माणसास तो अरे, आरपार वाचतो!

प्रा.सतीश देवपूरकर
लेखनकाल: ०१-०५-२००३
....................................................................

पावले त्याची कळेना त्यास कोठे नेत होती?
कोणती आकाशगंगा त्यास हाका देत होती?
तो नव्हे, तो सूर्य गेला सूर्यमालेतून जैसा;
खुद्द ब्रह्माचीच त्याला साद ऐकू येत होती!

लेखनकाल: ०१-०५-२००३
प्रा.सतीश देवपूरकर

कोण काही सांगतो, म्हणुनीच का लिहिणार मी?
मी कलंदर! पाहिजे तेव्हाच पाझरणार मी!

..............................................................................

आज,
कॉफी हाऊस नामक बाफवरील चर्चा वाचली.
इतरही चर्चा मी वाचत असतो. रोचक चर्चांचे स्क्रीणषॉट मारत असतो. कधी पीडीएफ सेव्ह करतो.
तिथे कुण्या 'गंभीर समिक्षक' नामक आयडीने लै भारी चर्चा केली होती. (रच्याकने गंभीर समिक्षक हा श्री बेफिकिर यांचा 'ऑफिशियल' डुप्लिकेट आयडी आहे, म्हणजेच, हे एकच महोदय दोन आयडी घेऊन लिहितात, हे पुनः एकदा नोंदवितो.)
त्या कॉफी हाऊस की कोणत्याशा वाहून जात्या बाफवर, मा. गंभीर समिक्षक यांनी ४०४७५ बाफ 'पेटणार' असे भाकित केलेले मी पाहिले. भविष्यवेत्त्यांबद्दल नेहेमीच आकर्षण असल्याने मी ते पाण शेव्हले. Wink
अन बाफ पेटलेलाही पाहिला.
आनंद जाहला.

***

रिया ताई,
एक बाफ होता. तिथे एक कविता होती. कायतरी गाय वगैरे होतं बहुतेक. अन मी विचारलं होतं, की तुम्ही हे पाण वर का काढलंत? आठवतंय का?

Pages