गार्लिक भेंडी

Submitted by चिन्नु on 23 January, 2013 - 08:58
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पाव वाटी काजु, पाव किलो भेंडी, एक सिमला मिर्ची, १ लहान चमचा बेसन, १० लसूण पाकळ्या, कडीपत्ता, कोथिंबीर, फोडणीचे जिन्नस, मीठ, तेल - फोडणीला व भेंडी तळण्यासाठी. थोडे पाणी.

क्रमवार पाककृती: 

काजु तेलात, तुपात शॅलो फ्राय करावे. एक दोन काजुचे तुकडे व २ लसूण पाकळ्या वरून टाकण्यासाठी बाजूला काढावेत. काजुची पूड करावी. लसणीचा लगदा करावा. भेंडी धुवून- पुस्प्प्न कोरडी करा. मध्ये चीर द्या. व तेलात खरपूस तळून घ्या.
काजुपूड, बेसन, लसणीचा लगदा, मीठ, कोथिंबीर थोडे पाणी घालून सारण तयार करा. तळलेल्या भेंडीत हे भरा.
गॅसवर पॅन ठेवून फोडणी करून घ्या. कडीपत्ता, सिमला मिर्चीचे तुकडे घाला. सि.मि. पुरते मीठ घाला - नाहीतर मीठ जास्त होइल. परता. मग भेंड्या घाला. झाकण ठेवा. मंद आचेवर २-३ मिनिटे ठेवा. काजुचे तुकडे, लसणाचे तुकडे घाला. अलगद परता. वरून कोथिंबीर घाला.

वाढणी/प्रमाण: 
अंदाजे
अधिक टिपा: 

१. यात तिखट घालत नाही मी. आवडत असल्यास फोडणीमध्ये हिरव्या मिरच्या घालू शकता.
२. हा प्रकार स्नॅक म्हणूनही खपतो.
३. डाळ भाताबरोबर छान तोंडीलावणे होते.

माहितीचा स्रोत: 
टीव्ही
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्या बात है....आजकाल किचन मधे जोरदार वावर दिसतोय आमच्या चिन्नुचा Happy
मस्त !!
लेकिन फोटू मंगता है यार....... Wink

धन्यवाद सर्वांना.
सिमला मिर्ची भाजी 'वाढवण्यासाठी' तसेच थोड्या तिखटासाठीप्ण. नाही टाकली तरी चालेल. पण सारणामध्ये थोडे तिखट घालावे.