स्री मनाचा तळ

Submitted by संजय४५ on 21 January, 2013 - 11:23

स्री मनाचा तळ

..................................

मी अनुभवलंय

अन अनुभवतोय

स्री शरीरापलीकडचं

एक अदभूत सुंदर जग

मला जाणून घ्यायचं होतं

तिचं खरं मन

जे आजपर्यंत माझ्यासाठी

एक गूढ होतं

विहिरीचं पाणी दिसतं

पण तिलाही तळ असतो

तसाच स्रीच्या मनाचा तळ

शोधायचा होता मला

त्यासाठी मी एक केलं

माझ्यातल्या वासनेला दूर केलं

माझ्या मनाच्या तळाला

अगोदर मी स्वच्छ केलं

न तो मनाचा आरसा घेऊन

उभा राहिलो तिच्यापुढे

तेव्हा ती उभी राहिली

निर्धास्त त्या आरशापुढे

कुठलही भय नाही

पूर्ण विश्वास भरला तिच्यात

तेव्हा बघायला मिळालं

मला तिच्या मनाच्या डोहात

आज पटलंय मला

स्रीच्या शरीरापेक्षा

तिचं मन खूप सुंदर आहे

मी पोहचू शकलो

त्या तळापर्यंत

या भाग्यवंतात मी हि आहे .

संजय एम निकुंभ , वसई

दि . ०९.०१.१३

http://www.facebook.com/SanjayNikumbhPoems?ref=hl

Group content visibility: 
Public - accessible to all site users

निकुंभजी तुम्हाला कवितेची आवड दिसतेय. फेसबुकवर तुमच्या अनेक कविता दिसतात. माझी विनंती आहे कि तुम्ही चांगल्या कविता वाचून पहा.