अस्सल केशर कसे ओळखाल ?

Submitted by मी_केदार on 20 January, 2013 - 12:08

काश्मीर हे केशरासाठी प्रसीध्द आहे. हे सर्वानाच माहीती आहे,
keshar.jpg

आपल्या पैकी कोणीना कोणी काश्मीरला जातो तेव्हा आपण आवर्जुन केशर आणायला सांगतो. पण आणणार्‍याची नेमकी ईथेच गोची होते की अस्सल केशर कसे ओळखायचे Uhoh तरी मायबोली करानी काही नुस्खे, तोड्गे कीवा खत्रीशीर ब्रान्ड कीन्वा दुकाने यान्चे पत्ते येथे उपलब्ध करावेत

keshar 2.jpg

तटी : आमचे परम मीत्रवर्य राजमान्य राजश्री सध्या काश्मीरत आहेत. ते परतीचा प्रवास २२ जानेवारी २०१३ स सुरु कारणार आहेत, त्यापुर्वी माहीती उप्लब्ध झाल्यास आम्ही उपकृत होउ _____/|\____ धन्यवाद

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पिवळे धागे नसलेले आणि dry असलेले पहुन घेने. खरी केशराची काडी एकदम dry असते.

ईराणी केशर घ्या त्या पेक्षा.

ईराणी केशर हा काय प्रकार असतो ? >> इराण मध्ये पिकणारे केशर हे स्वाद आणि रंगात अव्वल मानले जाते. त्या नंतर काश्मिर आणि मग स्पेन मध्ये पिकणार्‍या केशराचा क्रमांक लागतो.

काश्मीरी केशरा ची परिक्षा = ड्राय काड्या, एक काडी घेवुन हाताने चुरुन पहावी हाताला रंग लागल्यास ती बनावट. वाळकी काडी फक्त आणि फक्त पाण्यात/ दुधात खलल्यावरच रंग देते. थोडे पाणी डिश मधे घेवुन त्यात ती काडी खलुन रंग आला तरच ते खरे केशर. खर्‍या केशराच्या तीन चार काड्या आर्धा लिटर खीरीला पुरतात.

इराणी केशर एकदम झकास. पण ते काश्मीरला मिळत नाही. ते दुबई मधे मिळते.

काश्मीर मधले केशर ही चांगले असते. फक्त बनावट मालाची खुप भीती असते.

इराणी लोक रोजच्या भाता मध्ये ही केशराचा वापर करतात. ते केशर जरा लांब काड्यांचे असते. काश्मीर मधे ही लांब काड्या असतात, पण बहुदा मध्यम काड्या जास्त. स्पेन चं केशर जरा बुटकं असतं.

काश्मीर चं केशर उत्तम हवं असेल तर श्री नगर ला किंवा पेहेलगाम ला "बेबी ब्रँड सॅफरोन " किंवा "लायन ब्रँड" चं केशर विचारा. ते उत्तम असते.

इथे वर लिहिलेलेच आहे सगळ्यांनी. मला स्वतःला स्पेनचे केशर आवडते पण ते भारतात बहुदा मिळत नाही. दुबई किंवा गल्फ मधून कुणी येणारे असेल तर आणायला सांगायचे.
खरे केशराचे धागे फार चिवट असतात. ते सहसा बोटाने ओढल्यास तूटत नाहीत. ते खलावेच लागतात. डोळ्याने बघितल्यास ते मूळाशी रुंद आणि वर निमुळते होत गेलेले दिसतात.
त्यात पिवळे धागे कमी असतात. पाण्यात किंवा दूधात किंवा लिंबाच्या रसात घातल्यावर लगेच रंग वेगळा होत नाही, तर काही वेळाने वेगळा होतो. अनुभवी नाकांना वासानेच कळते.

भारतात खुपच भेसळ असते. मिठाईच्या दुकानात मिठाईवर केशराच्या काड्या दिसतात त्याही बनावटच असतात. प्राजक्ताच्या फुलाच्या देठाची किंवा मक्याच्या कणसातील धाग्याची भेसळ असते. प्राजक्ताचे देठ धोकादायक नाहीत. त्यातले आणि केशरातले रंगद्रव्य एकच असते. मक्याचे तंतू चिवट असतात पण ते एकसमान रुंदीचे असतात.

खात्री नसेल तर कृत्रिम इसेन्स ( सरकारमान्य ) वापरावा. तो कमी धोकादायक असतो.

दाल लेक मधे शिकार्‍यातुन विकतात ते केशर फेक असते. पेहेलगाम ला जाताना काही ब्रँड्स्ची स्वतःची दुकाने आहेत तसेच एअरपोर्ट वर सरकारी दुकान आहे तिथे चांगले केशर मिळते, दुबईतुन आणायचे झाले तर गोल्ड्सुक लगत स्पाईस सुक आहे तेथे सगळेच स्पाईसेस चांगले मिळतात.

धन्यवाद सर्वांचे _____/\____

अनुभवी नाकांना वासानेच कळते.>>>>> हे मात्र खरये

म्ह्णजे प्राजक्ताचे देठ खाण्यायोग्य असतात काय? प्राजक्त फुलांचे देठ वापरून घरच्या घरी रंग करून ठेवला तर तो अन्न्पदार्थात वापरता येइल का ? माझ्या घरी खुप येतात प्राजक्ताची फुलं !