अमेरिकेत 'समर बॉर्न' मुलांना नक्की कधी शाळेत घालावे?

Submitted by पूर्वा on 16 January, 2013 - 10:21

अमेरिकेत बहुतेक शाळांमध्ये ऑगस्ट/सप्टेंबर अखेर असणार्‍या मुलाच्या वयाप्रमाणे त्या मुलाला कोणत्या इयत्तेत घालावे हे ठरवले जाते.जसे ५ पूर्ण असेल तर Kindergarten,६ पूर्ण असेल तर First Grade वगैरे.परंतु ज्या मुलांचे जन्म जुलै,ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये आहेत त्या मुलांच्या दॄष्टीने विचार केला तर त्यांच्या वर्गात जवळपास १ वर्षाने मोठी मुलेसुद्धा असतात.लहान वयात मुलांच्या Emotional,Physical आणि Social development मध्ये काही महिन्यांच्या अंतराने बराच फरक पडू शकतो म्ह्णून बर्‍याचवेळा पालक मुलांना १ वर्ष उशीरा शाळेत घालतात असे मला नुकतेच समजले.
हे चूक कि बरोबर ह्याबद्दल बरेच वेगवेगळे मतप्रवाह आहेत.

उदाहरणार्थ माझ्या मुलाचा जन्म ऑगस्ट ०८ मधील आहे,त्याच्या वर्गात सप्टेंबर ०७ पासून ऑगस्ट ०८ पर्यंतची मुले आहेत.त्यामुळे त्याच्यापेक्षा Physically मोठी दिसणारी मुले देखील त्याच्या वर्गात आहेत तसेच Emotionally थोडी जास्त mature मुले देखील आहेत. सध्या प्रॉब्लेम जाणवत नाही पण अजून थोडं मोठं झाल्यावर ह्या फरकाचा परिणाम मुलांवर होतो का?त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होतो का?अशी मुले Bullying बळी पडतात का? असे बरेच प्रश्न सध्या माझ्या मनात आहेत.
अश्या मुलांना १ वर्ष उशीरा घातल्याने पुढे जाऊन त्यांचा confidence वाढतो,त्यांना अभ्यास सोपा वाटतो.असे बरेच फायदे वाचण्यात आले आहेत.
आपल्यापैकी कोणी असा विचार केला आहे का?
http://www.education.com/reference/article/Ref_He_Has_Summer/

http://www.telegraph.co.uk/education/educationnews/9696487/Summer-born-c...

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथे उलट ऑक्टोबर बॉर्न (कट ऑफ थोडक्यात मिस केलेल्या) मुलांना वरच्या वर्गात ढकलायला उतावीळ आईवडील पाहिलेत. सहसा आपले देशी.
मला वैयक्तिकरीत्त्या अजून अनुभव नाही, पण याची काळजी करण्याची आवश्यकता वाटत नाही. एका वर्षाच्या आतला फरक अभ्यासासाठी फार नाही असं वाटतं.
बुलीइंग वगैरे लहान 'असणार्‍या'पेक्षा लहान 'दिसणार्‍या' मुलांच्या बाबतीत होण्याची शक्यता अधिक असावी.

मी स्वतः सप्टेंबर बॉर्न आहे आणि वर्गात कायम सर्वात लहान असायचे. पण मला कधी काही प्रॉब्लेम आल्याचं आठवत नाही. उलट लेकीने कटऑफ तीन दिवसांनी मिस केलाय. तेव्हा ती वर्गात सर्वात मोठी असणार. तिचा अनुभव (आला की) सांगेन. Happy

प्रत्येक शाळेची Deadline असते आणि वेगवेगळ्या राज्यात ती वेगवेगळी असते.
लवकर घालावे (भारतीय पालक) उशीरा घालावे शाळेत (बहुदा गोरे पालक) दोन्ही विचारधारा आहेत.
मुलं १०,११, १२ वीत गेल्याशिवाय त्याचे परीणाम कळू शकत नाहीत.
बुली - वगैरेला वयापेक्षा इतर कारणं बरीच असतात.
आंगठ्याचा नियमः महिनाभराचा फरक असेल तर लवकर घालावे.
तीन चार महिन्याचा फरक असेल तर उशीरा..

माझ्या दोघी (जून, आणि ऑगस्टवाल्या) वेळेवर शाळेत गेल्या. पण बरोबरची मुलं १० महिने मोठी असलेली पण होती. १०/१२ लाही त्या सगळ्यांमधे वयाच्या फरकामुळे काही वेगळेपणा वाटला नाही.

माझा मुलगा जुलै बॉर्न आहे. ५ पूर्ण झाल्यावर त्याच्या किंडरगार्टनची प्रोसेस सुरु केली. प्रवेश मिळाला पण त्यावेळी तो वयाच्या मानाने बराच लहान वाटायचा, वागायचा म्हणून वाटलं की त्याचं पब्लिअक स्कूलच्या मोठ्या वर्गात कसं निभेल.म्हणून तो प्रवेश कॅन्सल करुन एक वर्ष त्याच्या माँटेसरी प्रीस्कूलला कंटिन्यु केलं. आता तो सहा पूर्ण करुन किंडरगार्टनला जातोय आणि एक वर्ष त्याला मागे ठेवलं हे मी बरोबर केलं असं माझं मत आहे. त्याच्या पेडीनेही मला सपोर्ट केलंय Happy

अमेरिकेशी संबंधित नाही पण माझा वै अनुभव. मी माझ्या वर्गात नेहमीच सगळ्यात लहान होते. १-१.५ वर्षाचा फरक.. जन्म तारखेचा घोळ . तर तेव्हा नाही जाणवलं , मार्क चांगलेच पडत गेले म्हणुन . आता मागे वळुन बघताना जाणवतं की मॅच्युरिटीमध्ये नक्की फरक पडतो. त्यात आपल्या इथला अभ्यास, स्कॉलरशिप, प्रज्ञाशोध, ह्यंव त्यंव सगळं करताना स्टॅमिना कमी पडतो. उगीच चिड्चिड होते. हे टाळता आलं असतं आणि मग i could have performed even better असं कधीकधी मनात येतं.

अभ्यासापेक्षा मॅच्युरिटीतल्या फरकामुळे येणार्‍या प्रॉब्लेम्सची मला जास्त काळजी वाटते.चिंगी म्हणते तसं.

माझ्या मुलाची जन्म तारीख २९ ऑगस्ट आहे.आमच्या राज्यात ३१ ऑगस्ट्ला असणारे वय धरतात.त्यामुळे तो जस्ट २ दिवसांनी त्याच्या वयाच्या वर्गात बसतो.अर्थात इथल्या भारतीय मैत्रिणींना सही वाटतं ज्यांची मुलं सप्टेंबर मधली आहेत.पण मला असा प्रश्न पडतो कि जर हा १ सप्टेंबरला जन्माला आला असता तर त्याला एक वर्ष मागे नक्कीच रहावं लागलं असतं.अश्यावेळी त्याला काही फायदा झाला असता का?
एका टिचरचं असं मत पडलं कि मुलींपेक्षा मुलांना(मुलग्यांना) १ वर्ष उशीरा घालावं.मुली पटकन मॅच्युअर होतात.मुलांना १ वर्ष मिळालं तर त्यांच्या निर्णय क्षमतेत बराच फरक पडतो.

सायो,तू लिहिलं आहेस अगदी तोच माझा प्रश्न आहे.पुढच्या वर्षी पब्लिक स्कूलला घालावं का नाही हाच प्रश्न मला पडला आहे.
परदेसाई, तुमचा आंगठ्याचा नियम समजला नाही.

माझी मुलं जून मधली आहेत. आमच्या टाउन्मधली कटॉफ ३१ ऑग आहे..
माझी मुल त्याच्या वायोगटानुसारच्य वर्गात आहेत.

आम्ही राज्य्/देश बदालले त्या वेळी मुल भावी शाळेत कौंसेलर सोबत काही चाचण्यामधून गेलेत....
(दुसर्‍या देशातूनआल्याने त्याना पुढल्या वर्गात जाता आले असते )
मुलगा त्याच्या वयापेक्षा जास्त समज्दार तर मुलगी तिच्या वयाच्या माना ने इमॅचुयर आहे असं आढळून आलं ( मुलगा मो ठा न मुलगी लहान आहे).

आमही त्या त्या कौन्सेलर चे रेकमेंडेशन नुसार मुलाना त्याम्च्य वयानुसार च्या वर्गात घातले.

पर देसाई : "थंब रूल" म्हणताहेत
पर देसाई : + १

पूर्वा, एकतर तुझा मुलगा रेडी आहे की नाही हे तुम्हांलाच बाकी कुणाहीपेक्षा जास्त लक्षात येईल. माझ्या मुलाच्या माँटेसरीतल्या टिचर्सनीही त्याला एक वर्ष मागे ठेवल्यास फायदा होईल असं सुचवल्यामुळे मला पटलं. माझ्या पेडीच्या मते मॅच्युरिटीत पडणारा फरक आत्ता लक्षात येईल असं नाही पण हायस्कूलमध्ये जाणवू शकतं आणि त्यावेळी त्याला थोड्या मोठ्या वयाचा फायदा होईल. खूप ज्युईश आईवडील मुलांना वर्षभर मागे ठेवतात असंही ऐकून आहे.

>> परदेसाई, तुमचा आंगठ्याचा नियम समजला नाही.
जन्मदिवस वजा कटऑफ हे अंतर महिन्याभरापेक्षा कमी असेल तर वर ढकलावं, जास्त असेल तर उशीरा घालावं असा थंब रूल सांगतायत ते.

माझी दोघंही मे बॉर्न आहेत. कट ऑफ डेट १ ऑगस्ट आहे. माझी मुलगी किंडर स्कीप करुन पहिलीत गेली. हे तिची टीचर आणि शाळेची प्रिन्सी. यांच्या सांगण्यानुसारच झालं. तेव्हा मी तिची नेहमीची पेडी, ओळखीचे अजून दोन पेडी, सायकोलॉजीस्ट व दोन टीचर एवढ्यांशी बोलुन निर्णय घेतला. त्यामुळे तिच्या वर्गात तिच्यापेक्षा दीड ते पावणेदोन वर्षानी मोठी मुलं होती. अ‍ॅकॅडेमीकली कधीच ती मागे पडली नाही. दोघा भावंडात ती मोठी व मुलगी ह्या दोन नक्कीच जमेच्या बाजू होत्या. तरीदेखील खूप अ‍ॅलर्ट राहून तिच्याशी वेळोवेळी बोलत होते. ती वयात येईपर्यंत मीच जास्त टेन्शनमधे असायचे. तिच्या इतर मैत्रीणींशी तुलना करता सोशली मागे पड्ल्याचे किंवा काही प्रश्न निर्माण झाल्याचे कधी जाणवले नाही. आता ती ग्रॅजुएट स्कूलमधे आहे.
मुलग्याच्या बाबतीतही सेम सिचुएशन निर्माण झाली होती पण तेव्हा मात्र पेडीने नको म्हणून सांगितले, कारण वर पूर्वाने सांगितले आहे तेच. शिवाय तो कट ऑफ डेटच्या दोनच महिने आधी बॉर्न, त्यामुळे अ‍ॅज इट इज वर्गात लहानात. तो रूटीन प्रमाणे गेला.
थोडक्यात रुटीन च्या बाहेर जाऊन काही करायचे तर थोडं जास्त काम, जास्त काळज्या असणारच, नाही का?

पूर्वा, दे टाळी, माझाही मुलगा २९ ऑगस्ट्चा, तो २००९ चा आहे म्हणून हा प्रश्न अजून पडला नाही.

पूर्वा, एकतर तुझा मुलगा रेडी आहे की नाही हे तुम्हांलाच बाकी कुणाहीपेक्षा जास्त लक्षात येईल. >>
सायोशी सहमत, आत्तापर्यंतचा त्याचा प्रोग्रेस पाहून ठरव.

मुलांची मॅच्युरीटी वगैरे प्रत्येक मुला/मुलीवर अवलंबून असते असे आमचे इथला पेडी म्हणालेला तेव्हा(तो भारतीय होता). मलाही तेच वाटलेले व ते मला पटल नंतर मुलीच्या प्रगतीकडे पाहून.

माझी मुलगी फेब मध्ये बॉर्न आहे, तेव्हा आम्ही तिला आधीच्याच वर्गात ढकलले(भारतीय ना...). तिच्या वर्गात तिच्या पेक्षा मोठे (सहा महिने/वर्षे/दिड वर्षे असे होते.) तिला काहीच फरक नाही पडला.
पण उलट इतरांना फरक पडला... Happy
टिचरच्या मते खूपच ती पटकन शिकणारी, समंजस अशी होती(त्यावेळी शाळेत असताना.. अजूनही आहे). Happy

माझा मावसभावाचा मुलगा त्याच्या वर्गात सर्वात लहान होता("त्याच्या वर्गात"... पुन्हा फेब मध्ये जन्म्ग). तरी भावाने पुढच्या वर्गात ढकलला.. तो ही खूप व्यव्स्थित आहे/होता...

त्यामुळे ते मुला/मुलींवर अवलंबून आहे. आणि पालकच ज्यास्त समजू शकतात. हे म्हणजे, एकावे जनाचे.. करावे मनाचे आपले मूल बघून, असे असते असे मला वाटते.

एक निरिक्षण उपयोगी ठरते, आपले मुलगा-मुलगी मोठ्या मध्ये खेळतात का? खेळताना/वागताना कसे वागतात ते पाहिले असेलच ना?

(मॅच्युरीटीचे काय, वय वाढून ती येतेच असे नाही)

पूर्वा,
माझ्या मुलीसाठी अनेक वर्षांमागे आम्हाला देखिल हा प्रश्न होता. तिच्या ७० वर्षांच्या बाईंनी सांगितलं कि ती भावनिक, अभ्यासाच्या द्रुष्टिने ई. ई. तयार आहे, पण तुम्ही तिच्या हाय स्कूल वर्षांचा विचार करा- हल्ली मुलांवरचे ताण इतक्या वेगळ्या प्रकारचे आहेत, क्लीश्ट आहेत आणि ते तिला १ वर्ष अगोदर सामोरे जावे लागतील...त्यांनी साधं उदा. दिलं होतं की वर्गामधे १६ व्या वर्षी सगळ्याचे driving licenses येतिल तेव्हा ती मात्र १५ वर्षांची असेल.