निर्भया

Submitted by मंदार खरे on 14 January, 2013 - 07:51

"निर्भया"वर अत्यचार होताना नुसतं बघणं
देवा, कसं शोभतं तुला हे असं वागणं

ईतकी का ही निष्ठूर दिलीस शिक्षा तिज
केलस नरकाहूनी बत्तर तिच पृथ्विवरचं जिणं

असच रहाणार का चालु "निर्भयां"च आक्रंदण
अन डोळयावरती कातड ओढून तूझ झोपणं

बांधली मंदीरे सज्जनांनी पूजले तूज देवघरात
कसं जमलं देवळात त्यांच्याच असं उभं अलिप्त रहाणं

"द्रौपदी"ला वस्त्र पुरवणारा कुठे गेला तो हात
का निव्वळ होतं दंतकथांच मिथ्य पुराण?

"सत्यवाना"ला म्हणे होतेस दिले तू जिवनदान
का नाही फुंकलेस मग कुडीत त्या अबलेच्याही प्राण?

असेल खरा जर कणाकणात नृसिंहाचा तूझा अवतार
दुर्जनांचे पोट फाडूनी त्यांना वठणीवरती आण

mandar.khare@gmail.com

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद...@ वैअव

@श्यामराव.........मला देवाला जबाबदार ठरवायचं नाही आहे

इथे फक्त जाब विचारायचा आहे तुकाराम चित्रपटात

गाढवावरच्या धिंडीचा जसा विचारला तसा......पुढच्या वेळी आणखी स्पष्ट लिहण्याचा प्रयत्न करीन

धन्यवाद.

तुकाराम चित्रपटाचा बराच प्रभाव पडलेला दिसतो तुमच्यावर

असो
का नाही फुंकलेस मग कुडीत त्या अबलेच्याही प्राण?>>>योग्य प्रश्न विचारलात !!