मारवा

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

तुटल्या नात्याचे तुकडे
मी सांग कसे सांधावे
रेशीमधाग्यांचे बंध
अन् पुन्हा कसे बांधावे

वाटेवर नुसत्या काचा
अंधार गर्द भवताली
हरवले, मी चुकले रस्ता
जरी परत वाटले यावे

नियतीचा होता घाला
की आगळीक माझी झाली
मी जवळ तुझ्या येताना
वाढवले फक्त दुरावे

मारवा जीवाला छळतो
मन उदास अन् एकाकी
मी श्वास समर्पिन माझे
एकदाच तू परतावे!

विषय: 
प्रकार: 

छानै.
मी श्वास समर्पिन माझे
एकदाच तू परतावे!
सुंदर
(श्री, गर्द अंधार म्हणून वेळ चुकली म्हणताय का?)

धन्यवाद दाद आणि चैतन्य.
दाद... कविता अवेळी पोस्ट केली म्हणून श्री असं म्हणतायत Happy

खूप छान कविता.

वाटेवर नुसत्या काचा
भोवती गर्द अंधार
हरवले, मी चुकले रस्ता
जरी परत वाटले यावे

>>>
मला वाचताना दुसर्‍या ओळीत लयीची गडबड झाली.

अंधार गर्द भवताली असा बदल केला तर वाचताना लय जाणवली.

वाह रूपा वाह..
सुंदर कविता... मस्त लिहीलीत!
मारव्याची हूरहूर ओळींतून थेट मनात.. व्वा

नियतीचा होता घाला
की आगळीक माझी झाली>> क्या बात! आगळीक होताना उमजत नाही आपल्यालाच अन् नंतर दोष नियतीच्या माथी.. असं काहीसं!

धन्यवाद निंबुडा आणि बागेश्री.
निंबुडा, सुचवलेला बदल पटला आणि आवडला म्हणून लगेच केला आहे. धन्यवाद पुन्हा एकदा.