धुंद आठवांची रात, जेव्हा डोळ्यात निजेल
खोल खोल मनामध्ये तूच तूच दाटशील
एक एक पान माझे, सुटे सुटे रे होईल
हर एक अक्षराला, गंध तुझाच असेल
चंद्र खिडकीशी पुन्हा, रेंगाळेल, खोळंबेल
गळालेले रितेपण मुठी भरून घेईल
तुझ्या सयी सार्या स्निग्ध, सभोताली फुलतील
तुझ्या गालातले हसू, माझ्या ओठी उमलेल
हूरहूर, रूखरूख, चित्त बेभान करेल
जरा शहाणे झालेले, मन पुन्हा वेडावेल
तेच रूप ह्या जगाचं, पण नवीन भासेल
तेच काजळ डोळ्याचं, पण नव्याने हसेल
खुळ्या मनाच्या भ्रमांची, भूल मलाही पडेल
तुझ्या असण्याचे भास, नसण्याला असतील
कंच बहर फुलांचा, जरी उद्या ओसरेल
ताजा आठव तुझाच, माझ्या ओंजळी असेल
---------------------------------------------------------------
-ब्लॉगवरही प्रकाशित: वेणूसाहित्य http://venusahitya.blogspot.com/
मस्तच.... प्रत्येक कडव्यागणिक
मस्तच....
प्रत्येक कडव्यागणिक उंचावत जाणारी अप्रतिम रचना....
सुरेख..... सहीच.....
सुरेख..... सहीच.....
वाहवा. फार म्हणजे फार सुंदर
वाहवा. फार म्हणजे फार सुंदर कविता.
मराठी शाळेतील दिवस आठवले. चालीवर म्हणावीशी वाटली ही अष्टाक्षरी.
एक एक पान माझे, सुटे सुटे रे
एक एक पान माझे, सुटे सुटे रे होईल
गळालेले रितेपण मुठी भरून घेईल
जरा शहाणे झालेले, मन पुन्हा वेडावेल<<<
कवितेची शैली मोहक आहे. वातावरण निर्मीतीही आवडली. वरील ओळी विशेष आवडल्या. धन्यवाद.
खूप छान!
खूप छान!
वॉव.. ब्यूटीफुल.. सिंपली
वॉव.. ब्यूटीफुल.. सिंपली ऑसम...
छान.
छान.
आवडली.
आवडली.
हूरहूर, रूखरूख, चित्त बेभान
हूरहूर, रूखरूख, चित्त बेभान करेल
जरा शहाणे झालेले, मन पुन्हा वेडावेल
खुळ्या मनाच्या भ्रमांची, भूल मलाही पडेल
तुझ्या असण्याचे भास, नसण्याला असतील
आय हाय !
व्याकुळ प्रेमिका उभी राहिली डोळ्यासमोर....जियो !!!
खूप आवडली
खूप आवडली
व्याकुळ प्रेमिका >> वेल सेड
व्याकुळ प्रेमिका >> वेल सेड सुप्रिया ताई.
खूप व्याकुळ करणारी कविता आहे. कोणताही आकांत नाही, आक्रोश नाही.... अगदी संयतपणे मनाचा ठाव घेणारे शब्द व्याकुळच करणार ना?
अप्रतिम सुंदर!
व्वाह!
'तुझ्या असण्याचे भास, नसण्याला असतील'
ही ओळ खूप म्हणजे खूप काही बोलते.
वाह !
वाह !
अप्रतिम झाली आहे
अप्रतिम झाली आहे बागेश्री...
रसपशी सहमत. उत्कृष्ट वातावरणनिर्मिती... आतुर, व्याकूळ तरीही संयमित एक्सप्रेशन्स.. थेट पोचणारी रचना...
प्रत्येक द्विपदीमधला भाव तोच असला तरी तिचं वेगळेपण जाणवण्याइतकं रेखलं गेलंय...
अभिनंदन!
आवडली, मस्तच
आवडली, मस्तच
फार सुंदर कविता.
फार सुंदर कविता.
मस्त वातावरणनिर्मिती.....
मस्त वातावरणनिर्मिती..... शब्द पण तोलूनमापून आले आहेत.... !!!
वेणूसाहित्य रॉक्स....!!
सुंदर कविता बागेश्री. आणि खूप
सुंदर कविता बागेश्री. आणि खूप गोड लय.
मला तर जामच रोमँटीक वाटली
मला तर जामच रोमँटीक वाटली कविता. मस्तय.
एक एक पान माझे, सुटे सुटे रे
एक एक पान माझे, सुटे सुटे रे होईल
हर एक अक्षराला, गंध तुझाच असेल
>>
वाह!
किती ग सुंदर लिहितेस
सुंदरच.. यात्रीशी सहमत
सुंदरच.. यात्रीशी सहमत
खूप सखोल अन तरल.
खूप सखोल अन तरल. नेहमीप्रमाणे.
मस्तच..... "कवितेची शैली मोहक
मस्तच.....
"कवितेची शैली मोहक आहे. वातावरण निर्मीतीही आवडली. " >>>> पूर्ण सहमत.
धन्यवाद दोस्तहो... खूप दिवस
धन्यवाद दोस्तहो...
खूप दिवस मनात रेंगाळत होती ही कविता.. उतरवताना नेमकी कशी असेल ह्याची मलाही उत्सुकता होती.. तुम्हा सगळ्यांच्या प्रतिसादामुळे आपल्याच कविता कधी नव्याने समजतात... आभारी आहे.. लोभ असावा