संस्कृत भाषेची उजळणी

Submitted by निंबुडा on 15 January, 2013 - 05:24

इथेच एका बीबी वर 'जिह्वा' ह्या आकारान्त स्त्रीलिंगी शब्दाचे सप्तमी चे एक वचन लिहायचे होते. तेव्हा 'माला' शब्द मनातल्या मनात चालवून पाहिला आणि लक्षात आले की अधले मधले विसमरणात गेले आहे. मग गंमत म्हणून 'देव' आणि 'वन' शब्द चालवून पाहिले. बरीचशी रुपे आठवली. मग चाळाच लागला. आत्मनेपदी, परस्मैपदी, उभयपदी; इ, वहे, महे इ. असे सर्व एका मागोमाग आठवायला लागले. शाळेत संस्कृत (तिसरी भाषा म्हणून) शिकतानाच्या आठवणी जाग्या झाल्या. त्या सर्वांना उजळणी देण्यासाठी हा बीबी. तुम्हाला जे आठवतेय ते तुम्ही ही लिहा. Happy

संस्कृत वर्ग चालू असतानाच्या आठवणीही लिहूया! Happy

+++++++++++++++++
इथे काही जणांनी आधी संस्कृत सुभाषितांची संग्रहमालिका लिहिली आहे. इथे लिंक्स देत आहे.
संस्कृतमधील सुभाषिते मराठीत

वैशिष्टयपूर्ण संस्कृत सुभाषिते

Group content visibility: 
Public - accessible to all site users

देव शब्द चालवूया! मदत करा. (देव==> तृतीय पुरुष एकवचनी पुल्लिंगी नाम)

देवः ,देवौ, देवा: - प्रथमा
देवम, देवौ, देवान्- द्वितीया
तृतीयेची व चतुर्थीची रुपे आठवत नाहीयेत Sad
देवात, देवाभ्याम, देवेभ्यः - पंचमी
देवस्य, देवयो:, देवानाम - षष्ठी
देवे, देवयो:, देवेषु - सप्तमी
हे देव, हे देवौ, हे देवा: - संबोधन

पहिल्यांदा हे प्रथमा, द्वितीया कळले तेव्हा अष्टमी ऐवजी संबोधन का ते बर्‍याच विद्यार्थ्यांच्या लक्षातच यायचे नाही. बरेचजण लिहिताना अष्टमीच लिहित असत. Proud

आता 'माला' (माला ==> तृतीय पुरुष एकवचनी स्त्रील्लिंगी नाम)

माला, मालौ, माला: - प्रथमा
मालाम, माले, माला: -द्वितीया
मालया:, मालयो:, ? - तृतीया
चतुर्थी, पंचमी व षष्ठी आठवत नाही इथेही. Sad
मालाया:, मालयो:, मालासु- सप्तमी
हे माला, हे मालौ, हे माला: - संबोधन

मी लिहिलेली काही रुपे चुकीची असू शकतील. आठवत नाहीयेत.

उजळणी करायला मजा येतेय मात्र! Happy

'वन' शब्द (वन ==> तृतीय पुरुष एकवचनी नपुंसकलिंगी नाम) पण देव प्रमाणेच बहुतांशी चालतो. फक्त बहुवचन (मराठीत अनेकवचन) बदलते. असेच काहीतरी आहे ना.

उदा.
वनम, वने, वनानि - प्रथमा
वनम, वने, वनानि - द्वितीया
पूर्ण येतो का कुणाला हा शब्द चालवता?

महेश, Happy ते परस्मैपदी क्रियापदांसाठी ना?

मी आता आत्मनेपदी क्रियापदांसाठी देते. Happy

इ वहे महे
से इथे ध्वे -- (इथे की इते?? माझा गोंधळ होतोय!)
ते इते अन्ते

धन्यवाद, Harshalc Happy

'देव' शब्दाची मी लिहिलेली बाकीची रुपे बरोबर आहेत का?

कुणी संस्कृत कथाकथनात भाग घेतलाय का?

आमच्या शाळेत आठव्या इयत्तेपासून तिसरी भाषा म्हणून संस्कृत वा हिंदी घ्यावे लागत असे. त्यामुळे आठवीला संस्कृत विषय निवडल्यानंतरच खर्‍या अर्थाने संस्कृतचा भाषा म्हणून अभ्यास सुरू झाला. पण तत्पूर्वी घरात म्हटले जाणारे श्लोक व स्तोत्रे ह्यांमुळे संस्कृतशी थोडेफार लागेबांधे होतेच. शिवाय प्राथमिक शाळेत (पहिली ते चौथी) संस्कृत कथाकथनात दोन-तीनदा भागही घेतल्याचे आठवते. तेव्हा संस्कृत मध्ये लिहिलेली छोटुशी कथा जशी दिलीय तशीच्या तशी पाठ करून स्पर्धेत म्हणत असे. सगळेच शब्द कळत नसत. Proud पण ते जडबंबाळ शब्द म्हणायला आवडत असत, इतके नक्की. Happy

हिरकणीची कथा आणि कावळा व हंसाची कथा स्पर्धेत सादर केल्याचे आठवतेय. Happy

मालाची रूपं शोधत होतो, पण मला स्वतःलाही खात्री नाही, कारण तो शब्द मल कधीच पाठ झाला नाही. शोधून पोस्टेन...

आपण ही रूपे एकत्रित करून मुख्य धाग्यात ठेवू शकू का?
>>
ठेवायला हरकत नाही, पण हळू हळू ह्या धाग्यावर खूप गोष्टींची चर्चा होईल. मुख्य धाग्यात काय काय आणि किती ठेवणार! नाही का?

माला

माला माले माला: प्रथमा
मालाम, माले, माला: द्वितीया
मालया मालाभ्याम मालाभि: तृतीया
मालायै मालाभ्याम मालाभ्यः चतुर्थी
मालाया: मालाभ्याम मालाभ्यः पंचंमी
मालाया: मालयो: मालानाम षष्ठी
मालायाम मालयो: मालासु सप्तमी
हे माले हे माले हे माला: संबोधन

सगळ्यांत सोपी आणि सुंदर भाषा आहे संस्कृत >> +१
गंमत म्हणजे कर्ता, क्रियापद आणि कर्म कुठेही कसे ही फिरवले तरीही चालते व अर्थाचा अनर्थही होत नाही. Happy

सुदैवाने खाजगी शिकवणी मधल्या कुंटे मॅडम हा विषय फारच गोडीने शिकवित असत. त्यामुळे तास कधी संपत असे कळतही नसे. त्यांचा तास संपूच नये असे वाटत असे. दर तासाच्या शेवटी त्या एक अवांतर (पाठ्यक्रमाबाहेरचे) सुभाषित देत असत. आणि त्यातील क्लिष्ट शब्दांचे अर्थ देऊन आम्हाला स्वतःला त्याचा अर्थ उमगतो का हे पहायला लावत असत. सरावाने हळू हळू जमले होते. तरीही समजले नाही तर स्वतः आंगत असत. अवांतर बर्‍याच गोष्टी शिकवत असत.

आळंदी ला का कुठेतरी म्हणे एका संस्कृतप्रेमी ग्रूप चे दर वर्षी संमेलन होते. तेथे नेहमीचे संभाषणही ते सर्व आवर्जून संस्कृत मध्येच करतात. ही माहिती त्यांच्याकडूनच कळली. मी आठवीत असतानाच त्यांचे वय सत्तरी किंवा पंचाहत्तरीच्या घरात होते.

संस्कृत लेखनाबाबतीत व व्याकरणाबाबतीत त्या अतिशय दक्ष होत्या.

भुलभुलैया (शॉर्टफॉर्म भुभु करायचा का? Wink ), धन्यवाद! Happy

हे माले हे माले हे माला: संबोधन >>>
प्र.पु. आणि द्वि.पु. ला 'माले' च होते का?

मला वाटत होते की "हे माला हे माले हे माला: संबोधन"

माला माले माला: - प्रथमा
मालाम् माले माला: - द्वितीया
मालया मालाभ्याम् मालाभि: - तृतीया
मालायै मालाभ्याम् मालाभ्यः - चतुर्थी
मालाया: मालाभ्याम् मालाभ्यः - पंचमी
मालाया: मालयो: मालानाम् - षष्ठी
मालायाम् मालयो: मालासु - सप्तमी
हे माले हे माले हे माला: - संबोधन

प्रथमा, द्वितीया आणि संबोधन सोडता वन देवप्रमाणेच चालतो. इथे लिहिलेली प्रथमा, द्वितीया रुपे बरोबर आहेत.
हे वन हे वने हे वनानि - संबोधन

संस्कृत व्याकरणासाठी संदर्भ म्हणून संस्कृत शब्द-धातु रुपावलि: नावाचे पुस्तक मिळायचे. ते वापरता येईल उजळणी करायला.

भूलभुलैया, पाय मोडायला '.h' वापरा.

निंबुडा
Happy
मी पण अकरावीत संस्कृत वक्तृत्व स्पर्धेत स्वा. सावरकरांवर भाषण केलं होत. आता काहीही आठवत नाही!!

संस्कृत शब्द-धातु रुपावलि: नावाचे पुस्तक मिळायचे. >>> Happy आठवले.

ते वापरता येईल उजळणी करायला. >> तसली उजळणी करत नाहीये. शाळेत शिकल्यापैकी आता काय आठवतेय ते पहायचे. काही जुने आठवायचे. इतकाच उद्देश आहे. Happy कुठे ऑफिशियली संस्कृत चे ज्ञान पाजळायची गरज पडेल तेव्हा मात्र ते पुस्तक मिळवून खरोखरीची उजळणी करेन! इथे निव्वळ स्मरणशक्तीला ताण द्यायचा प्रयत्न चाललाय! Happy

भूलभुलैया, पाय मोडायला '.h' वापरा.
>>
हायला, हे माहीतच नव्हते. मी आपलं 'म' हे अक्षर लिहिलं (इंग्रजी m टाईप करून) की पुढे अजून एक कुठलेही लेटर कीबोर्ड वर टाईपते. मग पुन्हा बॅकस्पेस! की मोडला जातो म चा पाय. Happy

तसेच .n ने अनुस्वार देता येतो, ही ही खूपच नंतर कळले. अजूनही पूर्वीच्या सवयीने shift + m चा वापर करते. Happy

ते 'म' च्या पाय मोडण्यावरून आठवले.

इथे मायबोलीत 'आरोग्यं धनसंपदा' नावाचा ग्रूप आहे. तो ''आरोग्यम् धनसंपदा" असा लिहिलाय. ते 'आरोग्यं धनसंपदा' असे हवे आहे ना?

निंबुडा सेम हिअर Proud
मी लिहिणार होतो, परत म्हटलं एवढं स्टॅण्डर्ड दिलंय, मग का आपली गावठी मेथड सांगा Rofl
यू टू Lol

छान धागा Happy
>>>> देवः ,देवौ, देवा: - प्रथमा<<<<
आता हा चालवलेला शब्द, त्याचा वाक्यात उपयोग करताना मराठीतून काय अर्थ होतो/कार्यकारणभाव काय हे देखिल कुणी सान्गू शकेल का? माझे प्रश्न असे की (माझे संस्कृत नव्हते ( )

देवः देवौ देवा: असे तिन वेळेस का? वरील कोष्टकावरून कळतय थोड थोड पण पुन्हा समजावुन सान्गा प्लिजच.
प्रथमा/द्वितिया ते संबोधन, या विभक्ति - याचा अर्थ काय? मराठीतुन वाक्यात उपयोग करुन अर्थ सान्गा ना
एक देव या शब्दाच्या प्रत्येक रुपाचे मराठी वाक्यात्/अर्थ सान्गुन कुणी विश्लेषण करू शकेल काय?
धन्यवाद

Pages