पहिली कविता

Submitted by पारिजाता on 11 January, 2013 - 01:40

दोन अबोले एका घरात सुखात नांदत असतात.
एकदा एक अबोला, सामोरा ये दुसर्‍याला.
डावी मान, डावी भुवई उडवतो अन म्हणतो जणु :
"चल गायब होऊ या?"
दुसरा मग उंचावत भुवया,
डावी जिवणी, डावी मान मागे किंचित फेकत म्हणतो,
"हा! तेवढं कुठलं आपलं नशीब!
इथंच रहाणार दोस्त आपण. कदाचित मरेपरेन्त"
आणि पुन्हा त्या घरामधे ते,
नांदू लागतात तसेच सुखे.
दोन अबोले!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हं. नाही झेपली म्हणजे फसलीच. एकूण इथल्या कविता वाचून explanation देणे पण नकोच.
फक्त एकच. ते अबोले म्हणजे एकमेकांशी काही संवाद उरला नसताना सुद्धा एकत्र रहाणारी दोन माणसं आहेत.

छानच Happy

माझा झब्बु Happy

============================

दोन अबोले एका घरात रुसलेले.
एकदा एक अबोला, सामोरा येतो दुसर्‍याच्या.

डावा गाल, ओठ आणी नाक मुरडतो अण म्हणातो जणु :
"अडलय माझं खेटर"
दुसराही नाक फेंदारतो
सुस्कार्‍याचा आवाज करत म्हणतो,
"गेली उडत"

एक्मेकांना क्रॉस झाले की
हळुच तिरकी मान करुन
डोळ्यांच्या कोपरातुन पहातात

आणि नजरानजर होतास
फिसकन्न हसुन म्म्हणतात्

नाहीच राहु शकत तुझ्याशिवाय

नांदू लागतात तसेच सुखे.
दोघे अबोला सुटल्यावर!

चला सांगा कुणाकुणाच्या घरातले आहे हे चित्र? आणी महिण्यातुन फ्रिक्वंसी किती Wink

पारे झेपी नही Happy

ते अबोले म्हणजे एकमेकांशी काही संवाद उरला नसताना सुद्धा एकत्र रहाणारी दोन माणसं आहेत.>>>>>>>>>> अग पण ते डोळ्यांनी संवाद साधतायेत की Uhoh

वर्षे तु टपुनच असतेस काय ग कविता शोधत विडंबनासाठी. मस्तय विडंबन. आणि हे माझ्या घरचं चित्र आहे बरं का Happy

थॅंक्स बागू. सस्मित, हो गं तेच म्हन्जे त्यांच्या मनात येतं कधीकधी की सगळं विसरून संवाद साधावा पण ते जमतच नाही. Ego and fear of rejection Sad
ही कविता सुचली तेंव्हा मला तलाशमधलं आमिर आणि रानीचं ते visual आठवलं. त्या दोघांनाही एकमेकांकडं जाऊन घट्ट मिठी मारावी वाटते पण दरी इतकी जास्त असते कि ते तसं करतच नाहीत.

कल्पना चांगली आहे.

सुरेश भटांचा शेर आठवला :

भेटतो कोण येथे कुणाला
भेटती एकमेका दुरावे!

अनंतशी सहमत.
साहित्यकाराने आपल्या वकूबानुसार लिहीत रहावे.
कवितेचा आवड-निवडीचा लोकल निष्कर्ष बहुधा रचनेची सुलभता असल्यामुळे प्रतिसादांवरून कवितेचे मूल्यमापन होऊ नये. मात्र त्यामुळे प्रतिसादांचे महत्त्वच नाही असे नाही.

वर कोट केलेल्या भटांच्या शेराची आठवण केल्याबद्दल स्वाती ह्यांचे धन्यवाद.

धन्यवाद.

छान आहे, थोडी मांडणी बदलली तर जास्त परिणामकारक होईल...
वर्षाची कविता वाचल्यावर कळेल तुम्हाला मी काय म्हणतो आहे ते. वर्षे मस्त..!!

थँक्स वैभव, अनंत, समीर, गंगाधर. तुम्ही सगळे चांगल्या गझला लिहिता ना. मला तो फॉर्म फार आवडतो पण नीट अभ्यास केल्याशिवाय लिहू नये असं ठरवलंय. तेंव्हा सध्या फक्त वाचतेय. हिम्मत केल्यावर तुम्ही मदत करालच. Happy
सत्यजीत, मांडणी बदलली म्हणजे कसं? हे अगदी academic purpose ने विचारते आहे. कारण तुम्ही वर्षाची जी कविता मला बघायला सांगताय तिची मांडणी अगदीच माझ्या कवितेसारखी आहे.

दोन अबोले एका घरात
सुखात नांदत असतात

एकदा एक अबोला,
सामोरा ये दुसर्‍याला

डावी मान, डावी भुवई उडवतो
अन म्हणतो जणु :
"चल गायब होऊ या?"

दुसरा मग भुवया उंचावत ,
डावी जिवणी, डावी मान मागे किंचित फेकत
म्हणतो...
"हा! तेवढं कुठलं आपलं नशीब!
इथंच रहाणार दोस्त आपण.
कदाचित मरे पर्यंत...."

आणि पुन्हा त्या घरामधे ते,
नांदू लागतात तसेच सुखे... दोन अबोले!

खर तर तुझी रचना तुला वाटेल तशीच असवी, मी उगाच शहाणपणा करतो आहे.. म्हणुन क्षमस्व.

आनंदयात्री थॅंक्स. Happy
सत्यजीत Happy नाही अरे. शिकणे हा purpose. नक्की सांगत जा. नाही पटले तर भांडू या की. personal मुद्द्यांवरून भांडण्यापेक्षा कविता जास्त चांगली कशी लिहीता येईल यावर भांडण बरे. ओके अशी मांडणी जास्त readable आहे का? हं विचार करते आहे. मला मुक्तछंदात लिहून पण एक मीटर हवा होता तो सापडला म्हणून लिहीले होते तसे. Happy

पारिजाता,
कविता आवडली असे म्हणणार नाही.

पण तुझी लर्नेबिलिटी आवडली. त्याबद्दल कौतुक. कविता शिकून येत नाही गं. आतून उमलते आपोआप. ठरवून लिहायला बसलं की झाली कविता असंही होत नाही. आतला आवाज जेव्हा केव्हा साद घालेल तेव्हा लक्ष ठेव इतकंच. जमेल तुला. पहिली कविता तर जमलीच आहे. Happy

खूप खूप शुभेच्छा!

वर्षे, झब्बु छान आहे. तू खरी विडम्बन क्वीन आहेस, ह्यात शंकाच नाही. Happy

सत्यजित ह्यांनी सुचविलेल्या मांडणीत कविता जास्त छान वाटतेय वाचताना, असे मलाही वाटले.

जमल्यास कवितेला समर्पक शीर्षक दे ना! पहिला कविता असल्याचा उल्लेख (हवाच असल्यास) तळटिपेत करू शकतेस! Happy

कवितेच्या प्रांगणात तुझे स्वागत! Happy

मला मुक्तछंदात लिहून पण एक मीटर हवा होता>>
सही जा रहे हो एकदम मॅडम !!
होय अगदी खरय !!मुक्तछंदात ;छंदबद्ध कवितेस जसा असतो तसा नाही पण मीटर असतो !
गायनाकूलता , ठराविक अंतरावर येणारी सयमकता वगैरे अनेक मुद्दे आहेत फक्त ओळी आपल्याला हव्या तिथे तोडून लिहिल्या की मुक्तछन्द होत नाही त्यास स्फूट आसे काहीतरी म्हणतात ...बागेश्रीला माहीत असेल तिच्या कविता तशाच असतात (असो पण खूप सुंदर असतात ...अगदी तिच्या अवलोकनातल्या मधुबालाइतक्याच!!)

सत्यजित यांची माण्डणी आवडली
असो ..जाउद्या..पुलेशु !!

निंबुडे, कविता नाही शिकायची पण व्यक्त करायचे नवे फॉर्म्स शिकता येतात की. Happy थॅंक्स गं.
भारतीताई मनापासून थँक्स Happy
वैभव जी धन्यवाद Happy

Pages