Submitted by मी मुक्ता.. on 10 January, 2013 - 06:17
पुन्हा नव्याने मुकाट झाली,
आयुष्याची वाणी..
नाते उरले, विरली त्यातील,
तुझी नि माझी गाणी...
मुक्या मुखाने कथा वदावी,
ऐकायाला बहिरे..
तरी चालली गोष्ट निरंतर,
थांबत नाही कोणी...
छाती फुटून यावी असले,
दु:ख दाटूनी आले..
पण अश्रूंचे भासच डोळा,
झरले नाही पाणी...
सांजभयाची किनार सुंदर,
नकळत भुलवी प्राणा..
सांजभयाचा पदर विखारी,
साकळलेला नयनी...
कोसळला मग चंद्र नभातून,
तारे विझता विझता..
आभाळाच्या भाळी आता,
काळोखाची गाणी...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
व्वा!!! प्रचंड सुंदर...
व्वा!!! प्रचंड सुंदर...
खूपच सुंदर
खूपच सुंदर
अतिशय सुंदर!
अतिशय सुंदर!
सुंदर अनुभूती..
सुंदर अनुभूती..
वाह..
वाह..
शप्पथ!!! आवडलीच!
शप्पथ!!! आवडलीच!
छाती फुटून यावी असले, दु:ख
छाती फुटून यावी असले,
दु:ख दाटूनी आले..
पण अश्रूंचे भासच डोळा,
झरले नाही पाणी...
छान.
अरे मस्त!!! आली रे आली
अरे मस्त!!! आली रे आली
सुंदर.
सुंदर.
शेवटच्या ओळी खास!
शेवटच्या ओळी खास!
सुरेख.
सुरेख.
सुरेख.मस्त!
सुरेख.मस्त!
संपूर्ण सुंदर कविता. >> नाते
संपूर्ण सुंदर कविता.
>> नाते उरले, विरली त्यातील,
तुझी नि माझी गाणी...>>
पु.ले.शु.
सर्वांचे खूप आभार..
सर्वांचे खूप आभार..
आहाहा! फार म्हणजे फार आवडली
आहाहा! फार म्हणजे फार आवडली आहे ही कविता!
सुंदर!
सुंदर!
शेवटून दुसरा शेर तितकासा उलगडला नाही. बाकी गझल सदृश्य रचना खूपच मस्त! आवडली. तुमचे लेखन वाचायला आवडेल.
आवडली!
आवडली!
वाह! वाह!
वाह! वाह!
कोसळला मग चंद्र नभातून,
कोसळला मग चंद्र नभातून,
तारे विझता विझता..
आभाळाच्या भाळी आता,
काळोखाची गाणी............
सुंदर कल्पना
मस्त!
मस्त!