समलिंगी संबंध - एक धोका

Submitted by manojprabhakar999 on 28 July, 2009 - 02:16

भारतात हल्ली पाश्चिमात्य देशांचे अनुकरण करण्याचे फॅड वाढत चालले आहे. परंतू फक्त वाईट गोष्टींचेच अनुकरण जास्त होतेय. यातलाच एक प्रकार म्हणजे समलिंगी संबंध. तस पहायला गेलं तर ही एक विकृतीच आहे. विकृती म्हणजे जी प्रकृती नाही ते. प्रकृती म्हणजे नैसर्गिक.
न्यायालयाने या संबंधाना परवानगी दिली ती न्यायदानाच्या कक्षेत राहून.. त्यात त्यांनी काही चूक केली नाही. परंतू समाज, नितीमत्ता, सामाजिक बंधन ह्यांचा विचार केला गेला तर हे सर्वस्व चुकीचे ठरू शकेल. सामाजिक बंधने काही गोष्टी डोळ्यासमोर ठेवून घातली गेली आहेत.
खर तर अशा विकृतपणामुळे संपुर्ण समाज बिघडू शकतो. हे सर्वनाशाला कारणीभूत ठरू शकते. निसर्गचक्र थांबू शकते. प्रजनन ही क्रियाच अशाने कुंठीत होऊन जाईल. जे निसर्गाविरुद्ध आहे. सायन्सच्या भाषेत बोलायचं झालं तर नर आणि मादी यांच्या संबंधाचा यात मागमुसच नाही.
समलिंगी संबंधामुळे पुढे काय दुष्परिणाम होतील हे लक्षात घेतले नाहीत असं मला वाटतयं. असल्या संबंधामुळे एचाअयवी/एड्स सारखे रोग किंवा इतरही रोग फेलावत जाण्याची शक्यताच जास्त. असले रोग किती झपाटयाने फेलावतील याचा विचारच करवत नाही. अशिक्षित व्यक्ती शिक्षणमंत्री झाल्यावर शिक्षणव्यवस्थेचा जसा बोजवारा उडेल तसाच प्रकार इथे घडू शकतो.
ह्या अशा विकृत चाळ्यांना तरूण जास्त बळी पडत असल्याचे दिसून येते. रेव्ह पार्टीजमधून अशा विकृतींना उधाण येते.
ड्रग्स, दारुचा अतिरेक ह्या गोष्टी तरूणांमध्ये आढळून येतात. त्याही दोन स्तरांवर. एक ते ज्यांच्याकडे पैसा नाही आणि दुसरे ते ज्यांच्याकडे नको तेवढा पैसा आहे. ते सहज अशा विकृतींना बळी पडतात. मध्यमवर्गीय सहसा अशा गोष्टींकडे वळत नाहीत कारण ते समाजाला .... मनाला घावरतात.
न्यायालयाच्या न्यायदानाचा आदर आपण करायलाच हवा. या गोष्टी थांबू शकतात जर समाजाने मनावर घेतलं तर. पण जो मनाला घाबरतो तो हे मनावर घेणार नाही आणि जो मनाला घाबरत नाही तो समाजाला काय विचारणार ?
न्यायालयाच्या निर्णयाने अशा लोकांनी मुखवटे घालून व चेहरे रंगवून आनंद व्यक्त केला आहे. समाजासमोर ते ताठ मानेने येत नाहीत. अस का ? यांचा ताठ मानेने जगण्याचा अधिकार कोणी हिरावून घेतलाय.
कदाचित त्यांच्या दृष्टीकोनातून हे बरोबर असेल ही, पण सर्वांगिण विचार करता हे चुकीचे आहे.
खरतरं हा लेखप्रपंच मुर्खपणाचा ठरू शकतो. कारण विकृतीना बळी पडणारे यातून बाहेर पडत नाहीत आणि समाजाला त्यांच्याकडे पहायला वेळ नाही. ’आम्हाला काय करायचे आहे ? ’ ही वृत्ती झाली आहे. कदाचित मीही तेच म्हणेन. कारण मीदेखील या समाजाच भाग आहे.

विषय: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

सायो,
<<बलात्कार वगैरे खपतायत की. तेव्हा कुणी समाजाच्या स्वास्थ्याबद्दल बोलत नाही. समलिंगी संबंध असणार्‍यांना त्यांच्या भरवशावर सोडा की >>
खरंच बलात्कार खपतायंत? विषयांतर, पण ठीक आहे.

खपतायत ह्याचा अर्थ आरोपी सुटतात, उजळ माथ्याने समाजात वावरतात असा घ्या. तेव्हा कुणी समाज स्वास्थ्याबद्दल बोलत नाही ते??

सुलूभाऊ, म्हणजे तुमच्या म्हणण्याचा मथितार्थ असा की खाजगीत संबंध ठेवायला हरकत नाही, खुलेपणाचा प्रॉब्लेम आहे? समलिंगी संबंध हे फक्त आणि फक्त शारीरिकच असू शकतात? अशांना आपल्या जोडीदाराबद्दल प्रेम, जिव्हाळा वाटत नाही/वाटू नये? एकत्र राहून घरकुल थाटायची इच्छा होत नाही/होऊ नये? मुलं असावीशी वाटत नाहीत/वाटू नये? ते मुलं वाढवायला असमर्थ असतात?

>> इतका वाद कित्येक देशांत कित्येक वर्षे का चालला असेल?
चारचौघांपेक्षा निराळं असं काहीही उघडपणे स्वीकारायला लोक तयार नसतात म्हणून.

सायो,
<<खपतायत ह्याचा अर्थ आरोपी सुटतात, उजळ माथ्याने समाजात वावरतात असा घ्या. तेव्हा कुणी समाज स्वास्थ्याबद्दल बोलत नाही ते?<<>>
मला काहीच पटलं नाही. आरोपी सुटतो याचा अर्थ तो गुन्हा समाज मान्य करतो असे होत नाही.

स्वाती, समलैगिकता नैसर्गिक तर मुलं नैसर्गिक रित्या का बरे होत नसावीत? जरून प्रेम करावे. कुणावरही प्रेम करावे. घर थाटावे पण समाजाने ते नैसर्गिक म्हणून स्विकारावे हा अट्टहास चूकीचा वाटतो.

>> पण समाजाने ते नैसर्गिक म्हणून स्विकारावे हा अट्टहास चूकीचा वाटतो.
मग सांगा ना समाजाने काय करायचं नक्की? वाळीत टाकायचं? आपल्या मुलांना त्यांचं हसं उडवायला शिकवायचं?

मग ज्या भिन्नलिंगी जोडप्यांना नैसर्गिकरीत्त्या अपत्यप्राप्ती होऊ शकत नाही त्यांनाही वाळीत टाकायचं का? त्यांचंही हसं उडवायचं का?

आनंदाने समलैंगिक पालक्-पाल्य स्विकार करीन. <<<
पण तुमच्या स्वीकाराला फारसं कोणी विचारणार नाहीये.
कायदा समलिंगी लोकांविरूद्ध माणुसकीला सोडून वागण्याची मुभा देत नाही. त्यांच्या मुलांबाबत तुमच्या मुलांच्या मनात विष पेरत वाढवलेत तर तोटा तुमच्याच मुलांचा आहे.

स्वाती,
<<मग ज्या भिन्नलिंगी जोडप्यांना नैसर्गिकरीत्त्या अपत्यप्राप्ती होऊ शकत नाही त्यांनाही वाळीत टाकायचं का<<>>
भिन्नलिंगी जोडप्याना नैसर्गिक रित्या अपत्यप्राप्ती होते का? हो.
सगळ्या भिन्नलिंगी जोडप्याना नैसर्गिक रित्या अपत्यप्राप्ती होते का? नाही.

समलिंगी जोडप्याना नैसर्गिक रित्या अपत्यप्राप्ती होते का? नाही
सगळ्या समलिंगी जोडप्याना नैसर्गिक रित्या अपत्यप्राप्ती होते का? नाही.

फरक कळला असेल अशी अपेक्षा आहे.

मुळात लैंगिक संबंध हे केवळ प्रजोत्पादनासाठीच असतात का?
असतील तर मग गर्भनिरोधकांना पण विरोध व्हायला हवा नाही का?

फरक तर आहेच हो! तिथेच तर चर्चा सुरू झाली नाही का? पण काय करायचं ते सांगतच नाही तुम्ही.

>>>समलिंगी संबंध हे फक्त आणि फक्त शारीरिकच असू शकतात? अशांना आपल्या जोडीदाराबद्दल प्रेम, जिव्हाळा वाटत नाही/वाटू नये? एकत्र राहून घरकुल थाटायची इच्छा होत नाही/होऊ नये? मुलं असावीशी वाटत नाहीत/वाटू नये? ते मुलं वाढवायला असमर्थ असतात?>> +१००

समलिंगी संबंध केवळ आणि केवळ शारीरीक असतात हा मुळात गैरसमज आहे,
मनात अढी धरुन वाद घालायला बसलेल्यांना किती समजवणार?

नीधप,
<< पण तुमच्या स्वीकाराला फारसं कोणी विचारणार नाहीये.
कायदा समलिंगी लोकांविरूद्ध माणुसकीला सोडून वागण्याची मुभा देत नाही. त्यांच्या मुलांबाबत तुमच्या मुलांच्या मनात विष पेरत वाढवलेत तर तोटा तुमच्याच मुलांचा आहे.
>>
? माणूसकीबद्धल वाद नव्हताच कधी.

>> आरोपी सुटतो याचा अर्थ तो गुन्हा समाज मान्य करतो असे होत नाही.>> समाज मान्य करतो असं म्हटलेलं नाही. मान्य करत नसला तरी तेव्हा समाजाच्या स्वास्थ्याची उठाठेव कुणाला नसते असं म्हटलंय.
>>भिन्नलिंगी जोडप्याना नैसर्गिक रित्या अपत्यप्राप्ती होते का? हो.>> होते का सगळ्यांनाच नैसर्गिकरित्या अपत्यप्राप्ती? तसं असतं तर आयव्हीएफ, सरोगेट मदर्स वगैरे अस्तित्वात नसतंच.
दुसरा एक विचार असा करा. समलिंगी जोडप्यांना स्वतःचं मूल असू शकत नाही पण मूल वाढवायची तर इच्छा आहे. त्यातून ही कपल्स मुलं दत्तक घेतात. त्यामुळे अनाथ मुलांना स्वतःच प्रेमाचं घर तर मिळतं ना?

>> माणूसकीबद्धल वाद नव्हताच कधी.
मग नेमका कशाबद्दल वाद आहे? 'स्वीकारणार नाही' म्हणजे नक्की काय करणार सांगा ना.

स्वाती,
<< फरक तर आहेच हो! तिथेच तर चर्चा सुरू झाली नाही का? पण काय करायचं ते सांगतच नाही तुम्ही.
>>

माझ्याकडे याचं खरोखरच उत्तर नाही. i really wish माझ्यकडे याचं उत्तर असतं. उत्तर शोधत आहे. इतके मात्र मी convinced आहे की समलैंगिकता अगदी नैसर्गिक आहे हे मला मान्य नाही आणि म्हणूनच समाजात उघडपणे नैसर्गिक म्हणून मला समलैंगिक विवाह, पालक, पाल्य या संकल्पना स्विकारयच्या नाहीत.

जे निसर्गात अस्तित्त्वात आहेच, आणि ज्याचा कोणालाही त्रास नाही (तुम्हाला कल्पनेने होतोय तसा त्रास नव्हे - आजारामुळे होतो तसा त्रास) ते सगळं नैसर्गिकच नाही का?

स्वाती,
<<
>> माणूसकीबद्धल वाद नव्हताच कधी.
मग नेमका कशाबद्दल वाद आहे? 'स्वीकारणार नाही' म्हणजे नक्की काय करणार सांगा ना.
>>

स्विकारायच्या नाहीत म्हणजे, जमेल तितके समलैंगिक विवाह, नंतर होणारी अपत्ये यांचा समाजाचेच घटक व्हावेत कारण ते नैसर्गिक आहे असा कायदा जर होत असेल तर त्याचा विरोध करायचा.

म्हणजे तुम्हाला कल्पनेने त्रास होतो म्हणून काही जित्याजागत्या व्यक्तींनी त्यांच्या अत्यंत स्वाभाविक आणि निरागस (त्यांचा कोणालाही कसलाही त्रास होत नाही या अर्थी) वृत्ती मारायच्या, हो ना?

मीही थकले. पण तुम्ही तणतण करत नाही आहात. खरंच जेन्युइनली शॉकमधे आहात हे दिसतं आहे. तुम्ही विचार कराल आणि आज ना उद्या तुम्हाला पटेल अशी मला खात्री वाटते आहे. Happy

नंतर होणारी अपत्ये यांचा समाजाचेच घटक व्हावेत <<<
कोणी कुठे जन्म घ्यावा हे ठरवून होत नाही. त्या अपत्यांचा काहीही दोष नसताना त्यांना समाजाचा घटक व्हायला विरोध करणारे तुम्ही कोण? अधिकारच काय?

कायदा समलैंगिकता कंपलसरी करणार नाहीये. समलैंगिक विवाह केवळ कायद्यानेरजिस्टर होत नसले तरी समलैंगिक जोडपी एकत्र रहातायत.
एकट्या व्यक्तीलाही सरोगसीने, आर्टिफिशियल इन्सिम्नेशन करून वा दत्तक घेऊन अपत्य प्राप्त करायचा अधिकार आहे. तस्मात हे होऊ शकते.
संपत्ती वा इतर कायदेशीर गोष्टींमधे एकत्रित रित्या मालकी असायला लग्नबंधनाची जरूरी नाही.

यातल्या कुठल्या गोष्टीला तुम्ही विरोध करणार कायद्याने? कुठल्या बळावर?

आधी लोक प्रेम-विवाह, जातीबाहेर लग्न, समुद्र ओलांडणे इ इ गोष्टीनाही विरोध करत होते, तसच आत्ता सम-लैंगिक इ इ ला विरोध होतोय. पण काळापुढे कुणाचे चालत नाही. संस्कृती काळासोबत बदलतच राहणार. आपण फक्त एक मूक साक्षीदार या बदलाचे. आपण आत्ता या गोष्टीवर बोलतोय, माहित नाही पुढची पिढी कशावरून वाद घालणार आहे. कुणाला माहित अजून १०० वर्षांनी मुलगा-मुलगी लग्न हे अनैसर्गिक वाटू शकेल.
ता. क: ज्याला जे करायचे आहे तो/ती कुणाच्याही बापाला न घाबरता, कायदा/समाजाची पर्वा न करता करत राहणार. त्यामुळे चिल.

सुलू, तुम्ही ब्रेक के बाद याल तेव्हा मी वर दत्तक मुलांबद्दल विचारलंय त्यावरही लिहा.
>>नंतर होणारी अपत्ये>> अपत्य एकमेकांपासून होणारच नाही. दत्तक घेतील किंवा सरोगसी हा एक पर्याय असू शकेल.

मी जिथे राहते तिथे एक गे (दोन स्त्रिया) कपल राहतं. त्यातल्या एकीला दोन मुलं आधीच्या लग्नापासून झालेली आहेत पण नवर्‍याबरोबर डिव्होर्स घेऊन ती आपल्या मुलं घेऊन समलिंगी पार्टनर बरोबर एकत्र राहते. लग्नही केलंय दोघींनी. अशा केसमध्ये मुलांना आई वडीलही आहेत आणि आई-आईही आहेत. मग अशा मुलांनाही वाळीत टाकणार का तुम्ही? ह्याच उदाहरणासारखं आणखी एक कपल माझे क्लायंट होते.

"evey time I try to get out, n they pull me back in!" - The Godfather Happy
स्वाती,
<<
म्हणजे तुम्हाला कल्पनेने त्रास होतो म्हणून काही जित्याजागत्या व्यक्तींनी त्यांच्या अत्यंत स्वाभाविक आणि निरागस (त्यांचा कोणालाही कसलाही त्रास होत नाही या अर्थी) वृत्ती मारायच्या, हो ना?
>>
अहो, असा अर्थ माझ्या कुठल्या argument ने काढलात ? कोण सांगतंय मारायला? मी नाही हो! मी फक्त त्याना नैसर्गिक मानायला तयार नाही हो!
हे जगातल्या समलैंगिकानो, आणि त्यांच्या समर्थकानो, माझा तुमच्यावर रोष नाही. ऐश करा. प्रेम करा. फक्त मला तुम्ही जे करताय ते कसे नैसर्गिक आहे ते स्विकारायला सांगू नका!
झाले?

सुलुभाऊ आहेत होय!
मग त्यांची भिती बरोबर आहे.
Wink

सायन्स फिक्शन मोड ऑन/

समलैंगिकता टिकली, अन त्यात लेस्बियन्सला मुली पैदा करायला पुरुषाची आवश्यकताच नाही, हे शास्त्रीय दृष्ट्या पटले, तर पहिले झूट पुरुष जात गायब होईल जगातून.
असेही बरेच ठिकाणी फक्त स्पर्म प्रोव्हाईड करणे अन मग मादीला हाय प्रोटीन डाएट पुरवणे असाही उपयोग नर प्राण्यांचा असतो Wink
म्हणून पुरुषांना समलैगिकतेची भिती वाटते, अन बहुतेक ऑब्झर्वेशन्सनुसार पुरुषांत समलैंगिकता जास्त प्रमाणात असते हे अ‍ॅक्सेप्ट करणे जड जाते..
असो.
इव्होल्युशनच्या पुढच्या पायरीची मी वाट पहात आहे. अन त्या वेळी काय होईल याची कल्पनाही करीत आहे.
/ऑफ

स्वप्नरंजक इब्लिस

अहो असं कसं होईल... समलैंगिकता नैसर्गिक आहे हे मान्य केल्याने सगळ्या बायका अचानक लेस्बियन होणारेत का? Happy
जे भिन्नलिंगी प्रवृत्तीचे आहेत ते अचानक बदलणार नाहीयेत हो.

हे शेवटचे पोस्ट at least पुढल्या काही तासांसाठी.. नाहीतर मी जरी समलैंगिक नसलो तरी boss माझी प्यांट काढायला लावेल! Wink

कायदा, मुलं, दत्तक , मी विरोध करणारा कोण याची उत्तरे आता ब्रेक नंतर!

Pages