आडनावांचा इतिहास...

Submitted by सेनापती... on 26 December, 2012 - 20:45

नमस्कार...

येथे विविध आडनावे, त्यांची उत्पत्ती / व्युत्पत्ती आणि इतिहास याबद्दल माहिती संकलीत व्हावी अशी इच्छा आहे.

पुर्वी आडनावे नव्हती असे दिसुन येते. ती कधी पासून वापरात येउ लागली, कशी तयार होत गेली याबद्दल अधिक जाणून घ्यायची इच्छा आहे.

अनेकांना स्वतःच्या आडनावांचा इतिहास / अर्थ माहित नसतो ते ही कदाचीत येउन माहित होउन जाईल.

कृपया... या धाग्यावर एखाद्या आडनावाविषयी माहिती विचारण्याआधी खाली दिलेल्या पानांवरील आडनावे वाचून बघा.

उल्लेख / माहिती असलेली आडनावे -

पान १ : देशपांडे, देशमुख, पाटील, चौधरी, परजणे, गायकवाड, भारती, कुलकर्णी, उपाध्ये / उपाध्याय, सकळकळे, देव, पटवर्धन, सावंत, सामंत, मराठे

पान २ : जोशी, कोंडे-कोंढे, चव्हाण-चौहान, शिंदे, पाठक-वेदपाठक, जुन्नरकर

पान ३ : सहारे, खंडाळकर, गाडगिळ, पवार, रावण, अशोकदा यांची पोस्ट, वाघमारे आणि प्राणिवाचक आडनावे, देसाई - नंदिनी यांची पोस्ट, केंभावी, चौधरी - प्रिंसेस यांची पोस्ट

पान ४ : गांधी-नेहरु, बच्चन, देसाई - अधिक माहिती, कुलकर्णी, नाडकर्णी, जगदाळे, साबळे, दहातोंडे, 'आडनाव' वा 'कुळनाम' - अशोकदा यांची पोस्ट, यामादा-हायाशी-कोबायाशी - जपानी आडनावे, राजे, राजेशिर्के, पंदेरे, खताते, भुरण, काते, चिले

पान ५: शिंदे, किर्लोसकर, देसाई - अशोकदा यांची पोस्ट, इनामदार, जाधव, यादव, तांबोळी, मणियार-मण्यार, पारकर, दिक्षित

पान ६ : भारतातील-परदेशातील स्थलांतरीत मराठी आडनावे, मोकाशी, खेर, चौगुले

पान ७ : धामणे, शिलाहार-शेलार, भट, देवधर, गोडबोले, प्रभु-देसाई, भिडे, आंबोळे, वालावलकर

पान ८ : ठाकूर-ठाकरे-ठाकेर, बागवे - भाऊंची पोस्ट, थोरात, बडवे, किंकर, राउत, साळवे-साळवी, कदम-कदंब, चुरी

पान ९ : पेठकर-पेटकर, गुर्जर, पाध्ये, निंबाळकर, जगताप, वानखेडे, देव

पान १० : मुळे-मुळ्ये, 'वार'चा अर्थ, मुंबई परिसरातील आडनावे - दिनेशदा यांची पोस्ट,

पान ११ : शिकलगार, अग्निहोत्री, हर्डिकर-अभिषेकी-मंगेशकर, सोनार, किहिमकर, वाघ, माळगावकर,

पान १२ : विविध क्षेत्रातली प्रसिद्ध आडनावे - दिनेशदा यांची पोस्ट, वणकुद्रे, सोळंकी, पारसी आडनावे, कुलवृत्तांत-मौखिक इतिहास - वरदा यांची पोस्ट, पांड-पांडे, राजस्थानी आडनावे

पान १३ : कर्णिक, गुप्ता-गुप्ते, सरदार, तेंडुलकर, बंगाली आणि विदर्भीय आडनावे, परांजपे

पान १४ : येल्लुर आणि गीर येथील आफ्रिकन वंशाचे सिद्दी, शेंडे-शेंड्ये, आडनाव लावण्याची प्रथा - चिनुक्स यांनी दिलेल्या लिंक्स, केळकर, साठे-साठ्ये, मठाधिकारी, धडाम

पान १५ : चित्पावन ब्राह्मण, गोत्रे, आडनावे व इतिहास, तंजावर मराठी आडनावे, भंडारी, पाटणकर

पान १६ : श्रोत्रिय, ठाकर, समर्थ, पाठारे प्रभु आडनावे, वाडवळ आडनावे, हातीवलेकर, धडाम, भाट, अधिक तंजावर मराठी आडनावे, विश्वासराव

पान १७ : पुणतांबेकर, घाटपांडे, प्राचीन मराठीचा शब्दकोश - चिनुक्स यांची पोस्ट, ठोमरे

पान १८ : ........ अपुर्ण...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आम्ही शिंदे कोकणातले,जात भंडारी,देवगड(हिंदळे)
ग्वाल्हेर मध्यप्रदेश मधून कोकणात आलो असा इतिहास सांगतो.ग्वाल्हेरचे शिंदे आता सिंदानिया आडनाव लावतात.

मराठ्यांची मुळ ९६ कुळे आहेत व त्या ९६ कुळांची ९६ अडनावे आहेत प्रत्येक अडनावाला ओऴखण्यसाठी एक देवक (लग्नात देवकार्यात पुजतात) दिलेले आहे जसे आमचे अडनाव भुसारे (मराठा जि.सोलापुर) व देवक 'सुर्यफुल' आहे आमचे मुळ अडनाव गायकवाड आहे. 'सुर्यफुल' देवाक आसलेले वेगवेगळ्या अडनावंचे लोक आमची भावकी लागते.
माझ्य संग्रहात मराठ्यांच्या मुळ ९६ कुळांची ९६ अडनावे आहेत.

माझ्य संग्रहात मराठ्यांच्या मुळ ९६ कुळांची ९६ अडनावे आहेत.>>>
कृपया इकडे लिस्ट लिहाल का?
मलाही आमचे देवक वरुन मुळ आडनाव कळेल.

कोणाकड " Kshatriy Marathyanchi Vanshavali v Shannav Kuli " हे पुस्तक आहे का? असल्यास देऊ शकाल का?

आराध्यवृक्ष जर "कुचला" असेल तर लग्नकार्यात तो पुजावा लागतो. "कुचला" वृक्षाविषयी माहिती मिळत नाही. कोण सांगू शकेल का? आराध्यवृक्षाची संस्कृत नावे व व्यावहारिक नावे याविषयीचा स्वतंत्र धागा काढणे इष्ट ठरेल.

आराध्य वृक्ष म्हणजे काय?

मागे दापोली कृषी विद्यापिठात राषीप्रमाणे नक्षत्र वृक्ष असे वन पाहिले होते. ती यादी आहे माझ्याकडे.

आज नात्यातल्या एका लग्नात पुणतांबेकर हे तंजावरी महाराष्ट्रीयन असू शकतात का याबद्दल तिथे उपस्थित ज्येष्ठांना विचारल्यावर त्याला दुजोरा मिळाला. सध्याच्या हयात ज्येनांना नक्की माहिती नाही, पण त्यांनी एवढे सांगितले की आपण मूळ कर्नाटकातलेच. इथे मिळालेल्या माहितीमुळे इतके तरी कळाले. थँक्स हा धागा सुरू केल्याबद्दल! Happy

पुणतांबे म्हणून गाव आहे नगर जिल्ह्यात, राहता तालुक्यात, गोदावरीच्या काठी. त्या गावाची आठवण म्हणून तिथून स्थलांतरित झालेले लोक पुणतांबेकर हे आडनाव लावत असावेत, पण त्या अगोदर आमचे आजोळचे हे पूर्वज कोळविशे असे आडनाव लावत असल्याचे कळाले. तेव्हाचा त्यांचा व्यवसाय बहुधा सावकारीचा होता. पण होळकरांनी गाव लुटल्यावर सारे कुटुंब पुण्याला स्थलांतरित झाले, व गावाची आठवण म्हणून कोळविशे ऐवजी पुणतांबेकर आडनाव लावू लागले असे एका ज्येष्ठांनी सांगितले. आता कोळविशे आडनाव कसे, कुठून आले ते मात्र माहीत नाही.

छान आहे हा बाफ. वाचुन बरीच नवी माहिती मिळाली.

आमच्या आडनावाचा इतिहास कोणाला माहिती असल्यास सांगा. आडनाव: नातु/नातू

घाटपांडे या आडनावातच घाट असल्याने त्याचा संबंध घाटाशी आहे हे नक्की. तसे आमचे मूळ गाव पुणे नाशिक रस्त्यावर पेठ घाटाजवळ असलेले भावडी असे सांगितले जाते. तेथून हे सगळे घाटपांडे आंबेगाव, खेड, जुन्नर तालुक्यात विखुरले.

घाटपांडे..

अ.रा.कुलकर्णींच्या 'शिवकालीन महाराष्ट्र' मध्ये घाटपांडे हे कोकण आणि घाट या मधल्या ज्या व्यापारी वाटा होत्या तिथले जकात नाक्यावरचे अधिकारी होते असा उल्लेख आहे.

उदा. नाणेघाट.

"

आज प्राचीन मराठीचा शब्दकोश सहज चाळत असताना काही शब्द दिसले -

१. ठोंबरा = जोंधळ्याच्या कण्यांचा भात
२. ठोसर = जाड, भरीव
३. पळसुला = उपनयन संस्कारातील पळसाच्या डहाळीवर पाणी शिंपडण्याचा विधी
४. पावगी = जुवाठ्यातील (जुगार जिथे चालतो असं ठिकाण) नोकर
५. फडतर = फळाची फोड , फडतरणे = विस्तार पावणे
६. बनकर = माळी
७. मणियार = सोनार
८. बागडे = खेळगडी
९. बापैय्या = चातक पक्षी
१०. भट = योद्धा
११. भटाचारिया = शिकलेला ब्राह्मण
१२. भुसारी = व्यापारी
१३. मुळिक = मूळ नसलेले, अनादि.

भट = योद्धा
>> हे अगदीच अनपेक्षित आहे ना? प्रचलित अर्थाच्या मानाने एकदम भिन्न.

भुसारी = व्यापारी
>> किराणाभुसार मालाचे व्यापारी अशा शब्दप्रयोग कायम वाचलाय. मग भुसारचा अर्थ व्यापार असा घ्यायचा का?

नाही, भुसारमाल.

कोशात भट या शब्दाचा एक अर्थ जसा योद्धा दिला आहे, तसा दुसरा अर्थ 'वैदिक ब्राह्मण' असाही आहे. त्यावरून भट्टाचार्य, भट्टराय ही आडनावं आली आहेत.

कोशात भट या शब्दाचा एक अर्थ जसा योद्धा दिला आहे, तसा दुसरा अर्थ 'वैदिक ब्राह्मण' असाही आहे.>> अच्छा. परस्पर विरोधी आहेत का अर्थ? म्हणजे ज्या काळात हे वापरले जात होते तेव्हा वैदिक ब्राह्मणदेखील युद्ध करत होते का?

हे थोडंसं कर्नाटकी ब्राह्मणांच्या "धणेर" आणि "आचारी" लोकांसारखं वाटतय. दोन्ही ब्राह्मणच. पण धणेर म्हणजे जमीनदार, यांच्याकडे ऐपतीनुसार सैन्य वगैरे असायचे म्हणे. आचारी (मूळ शब्द आचार्य) म्हणजे पुरोहित आणि पूजापाठ करणारे.

नंदिनी,

>> परस्पर विरोधी आहेत का अर्थ? म्हणजे ज्या काळात हे वापरले जात होते तेव्हा वैदिक ब्राह्मणदेखील युद्ध
>> करत होते का?

अनेक ब्राह्मणांना क्षात्रविद्या अवगत होती. आणि अनेक क्षत्रिय तप करून ब्रह्मज्ञ झालेत. मानवाने जीवनात क्षात्र आणि ब्राह्म या दोन प्रकारच्या तेजांची आराधना करावी असे म्हणतात. माझ्या अंदाजाने भट मधील भ हे अक्षर तेज दर्शवते. हे क्षात्रतेज वा ब्रह्मतेज असू शकते. ट हे अक्षर युक्तता दर्शवते. म्हणून 'भ'ने युक्त असा तो भट.

चूभूदेघे.

आ.न.,
-गा.पै.

मोहोड आड्नावाबद्ल कोणी सान्गू शकेल का? तशे आम्हि विदर्भातले पण एका पूस्तकात वाचले कि आम्हि मूळ सातार् चे ९६ कूळात आम्हि मोहिते कुळात येतो आणखि माहिति मिळाल्यास स्वागत

आजोळी श्रीरामपूरजवळ नगर जिल्ह्यातील पुणतांबे हे मूळ गाव म्हणून पुणतांबेकर हे आडनाव.>>>

तर तांबेकर हे अडनाव कसे पडले असेल ?

आज कवीन्द्र परमानन्दकृत श्रीशिवभारत हा शिवकालीन ग्रंथ वाचत होतो. यात तोमर = ठोमर = ठोमरे असा वापर केला गेला आहे.

Pages