गुंफण

Submitted by आनंदयात्री on 7 January, 2013 - 04:31

दु:ख पुरातन
दु:ख चिरंतन
दु:ख जगाच्या
घरचे अंगण

दु:ख मोहवी
दु:ख बोलवी
दु:ख खुळ्या
पायातील पैंजण

दु:ख उराशी
दु:ख उशाशी
दु:ख सोबती
बनून कांकण

दु:ख चिडचिडे
दु:ख तडफडे
दु:ख सनातन
शाश्वत वणवण

दु:ख एकटे
दु:ख धाकटे
दु:ख थोरल्या
सुखास कारण

दु:ख मल्मली
दु:ख भरजरी
दु:ख सुखाशी
अतूट गुंफण!

- नचिकेत जोशी
(ब्लॉगवर पूर्वप्रकाशित - http://anandyatra.blogspot.in/2012/07/blog-post_30.html)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दु:खाचे विविध पैलू मस्तच मांडलेत.

"दु:ख मल्मली
दु:ख भरजरी" >>> हे मला व्यक्तिश: पटलं नसलं तरी
दु:खावर प्रेम करणार्‍यांच्या दृष्टीकोनातून या ओळी क्लासिक आहेत हे निश्चित.

"दु:ख सुखाशी
अतूट गुंफण!" >>> .... हे वास्तव आहे आणि मांडलंयही मस्तच.

एकूण कविता सहज, सुंदर उतरली आहे.