लेखात प्रकाशचित्रांचा समावेश कसा करावा?

Submitted by मदत_समिती on 30 March, 2008 - 20:23

HowToGiveImageLink.GIF

"माझे सदस्यत्व" या विभागांतर्गत असलेल्या "खाजगी जागा" या उपविभागात तुम्हाला प्रकाशचित्रांना साठवण्याची सोय आहे. लेखन करताना जिथे प्रकाशचित्र हवे असेल, तिथे मजकुराच्या खिडकीखाली "मजकुरात image किंवा link द्या" असा दुवा आहे त्यावर टिचकी मारा. उघडलेल्या नवीन खिडकीत वरील भागात तुम्ही साठवलेली सर्व प्रकाशचित्रे दिसतील. त्यातील हवे ते निवडून अगदी उजवीकडील 'Send to text' हा दुवा वापरा.

आता तुमच्या मजकुरात Image tag येईल. लेखाचे अवलोकन [preview] करताना किंवा लेख साठवून ठेवल्यावर (Save केल्यावर) तुम्हाला प्रकाशचित्र दिसेल.
खाजगी जागेत साठवलेली प्रकाशचित्रे काढून टाकली तर ती ज्या लेखात टाकली आहेत तिथून दिसेनाशी होतात. यावर उपाय शोधणे चालू आहे.

खाजगी जागेत २० एम्बीपर्यंत जागा उपलब्ध आहे. २० एम्बी भरल्यावर अजून प्रकाशचित्रे चढवण्यासाठी नको असलेली प्रकाशचित्रे उडवून जागा रिकामी करणे आवश्यक आहे.

प्रकाशचित्रांचा आकार हा शक्यतोवर ४०० पिक्सेल असावा, जेणे करून फोटोंचे पान लगेच दिसेल, तसेच मायबोलीवरच्या जाहिराती दिसतील.

पिकासा लिंक कशी द्याल

पिकासामधील चित्राची लिंक येथे देण्याबद्दलच्या अधिक माहितीसाठी गुगलच्या माहिती संकलनात पहा

फ्लिकरवरून येथे लिंक देण्यासाठी फ्लिकर FAQ मध्ये पहा

फोटोंचा साईझ कमी करण्यासाठी mspaint, irfanview, acdsee ते फोटोशॉप पर्यंत अनेक सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत. तसेच मायक्रोसॉफ्टची पॉवरटॉय सिरीजदेखील आहे. फ्लिकरसारखी संकेतस्थळे ही सुविधा विनामूल्य देतात. आपल्याला जे सोयीचे वाटते ते आपण वापरू शकता.

सूचना: शक्यतोवर ८०० पिक्सेलच्या प्रकाशचित्रांची लिंक देऊ नका. असे प्रकाशचित्रांचे पान दिसण्यात वेळ लागतो, [डायल अप कनेक्शन असेल तर जास्तच ...] आणि मायबोलीच्या जाहिरातींवर प्रकाशचित्र पसरते.

दिसतेय का तुम्हाला?? > नाही दिसत. पिकासा मधिल Linkच्या खाली 'Embed image' option आहे. त्यातील Link इथे Copy+Paste करा.

Select Sizeच्या खालिल Option मधिल
Hide album link टिक करा
Image only (no link) टिक करु नका.

IPHONE वर ती सेंड टू वाली लिंक येत नाही. पहिल्या तीन येतात. फाईल्स अपलोड झाल्यात पण वापरता येत नाहीयेत Sad

धन्यवाद मंजुडी.. हे लिमीटेशन जाईपर्यंत वॅलेंटाईन गिफ्टस् म्हणून संगणक देणारा/देणारी कोणी शोधावे लागणार

पिकासा लिंकः
"लिंक टू धिस फोटो" अशी लिंकच दिसत नाहिये...."लिंक टू धिस अल्बम" दिसतीय पण सिंगल फोटोसाठी नाही.... अजुन काही अल्टरनेटीव्ह आहे का?

आता पिकासा डाऊनलोड का करून घ्यावे लागतेय? शिवाय ते डाऊनलोड केले तरी फोटो गुगल प्लस मध्येच उघडत आहेत. आणि गुगल प्लस मध्ये लिंक टू धिस अल्बम वगैरे ऑप्शन नहियेत. Sad

पिकासा लिंकः
"लिंक टू धिस फोटो" अशी लिंकच दिसत नाहिये...."लिंक टू धिस अल्बम" दिसतीय पण सिंगल फोटोसाठी नाही.... अजुन काही अल्टरनेटीव्ह आहे का?>>>>>स्वरूप, अल्बम "प्रायव्हेट" ठेवला आहे का? असेल तर तो आधी "लिंक टु एनीवन" असा ठेवा. त्यानंतर तुम्हाला सिंगल फोटोसाठी लिंक सिलेक्ट करता येईल.

ऐका...........सेटींग्स मधे ...
google+ मधे
Disable Google+ जे शेवटी आहे त्या मधे here वर क्लिक करा नंतर पहिला ऑप्शन
Delete Google+ content वर क्लिक करा.......तुमचा पिकासा पहिल्या सारखा दिसेल

@सुधीर जी
मायबोलीवर चलचित्र चढवता येत नाहीत. युटुबवर चलचित्र चढवुन त्याचा दुवा इथे द्या.

धन्यवाद.

प्रकाशचित्रांसाठी सोपा उपाय : करून पाहा.

अ)खालील टेंप्लेटस बनवून मोबाईलच्या नोटस मध्ये साठवावे.

१)कावळा कंस img src="" alt="photo" /कावळा कंस
अथवा
२)कावळा कंस img src="" width="320" alt="photo" /कावळा कंस
अथवा
३)कावळा कंस img src="" width="640" alt="photo" /कावळा कंस
इत्यादी.

शेवटचा कावळा कंस >
सुरुवातीचा कावळा कंस <

ब)फोटोबकेट अथवा {फ्लीकर/पिकासा वगैरे}मध्ये फोटो अॅल्बममध्ये चढवून ठेवायचे.

क)हवा असलेला फोटो निवडून त्याची Direct link http पासून सुरू होते ती कॉपी करायची.

ड)ती लिंक '(अ)'मधल्या src नंतरच्या "" मध्यभागी पेस्ट करायची.तिनांपैकी एक टेंप्लेट चांगले चालेल.

इ)आता लेखात/पोस्टमध्ये हव्या त्याजागी या तयार लिंका टाकून पूर्ण लेखच नोटसमध्ये एका फोल्डरात तयार ठेवायचा.

फ)पूर्ण लेख फोटोंच्या लिंकांसह मायबोली उघडून नवीन लेखन करा मध्ये डकवला की झाले.

ग)फक्त तयार केलेल्या लिंक्सही मथळ्यासहकॉपी पेस्ट करू शकता.

प्रतिसाद तपासला की फोटो दिसेल. नाही दिसला तर कुठेतरी स्पेस अथवा "ची चूक असेल.

#मायबोलीसाठी फोटो देतांना ते दाखवायचेच आहेत त्यामुळे ते इतर फोटोसाइटसवर असायला काहीच हरकत नाही. याठिकाणी मात्र ते 'पब्लिक' ऑप्शनमध्ये ठेवावेत.शिवाय ते दुसरीकडेही पटकन वापरता येतात फक्त योग्य टेंप्लेट टाकायचे.

#कोणतेही रिसाईजिंग सॉफ्टवेर डाउनलोड वगैरे करायला नको.खाजगी जागा येथे अपलोड करायला नको.

#१८००केबीचे फोटोपण आपोआप रिसाईज होतात.

# width="पिक्सेल" यातला पिक्सेलचा आकडा बदलला की काम होते. परंतू 640 पेक्षा मोठा नको. अगदी काहीच न देता (अ)१ची टेंप्लेटही काम करते.

#काही कारणामुळे त्यासाईट बंद पडल्यातर अथवा ब्राउजरचा इमिज ऑप्शन ऑफ असेल तर फोटो न दिसता त्या चौकटीत alt =" इथे काय नाव दिले ते दिसेल.

मला प्रिंट स्क्रीन करून तो फोटो प्रतिसादात टाकायचा आहे कसा टाकावा ?
खाजगी जागा मध्ये फोटो कसे add करावेत?

The selected file 2013-03-24 13.41.15.jpg could not be uploaded. The file is 1.5 MB exceeding the maximum file size of 153.6 KB.

06:04:25 Upload failed.
असा मेसेज येतोय

मी टाकलेले रांगोळीचे फोटोज दिसत नाहीत .माझ्याकडुनच काहीतरी पीसी चा तांत्रीक बिघाड आहे असे वाटते.प्लीज मद्त करा ते नीट दिसण्यासाठी. सोप्या भाषेत सांगा काय करु ते?

मी तीनदा फोटो एकाच ठिकाणी बद्लुन परत टाकलेत,नाही दिसत म्हणुन .आधी फोटोंच्या साईजचा प्रोब्लेम असेल, म्हणुन परत साईज बदलुन टाकले तरीही दिसत नाहीत. असे का होते आहे ते समजत नाही .माझ्या पीसी वर हल्लीच firefox version update केले होते .त्या नंतर आपोआप तारीख बद्लली किंवा मला ती बद्ललेली समजली नाही .पीसी च्या तांत्रीक गोष्टी तितक्याश्या माहीत नाहीत.त्यामुळे आता डेट टाईम सेट केल्यानंतरचा सचिनच्या फॅन वाल्या धाग्यावरचा फोटो जो मी नेट वरुन घेतलाय तो दिसतोय पण मी टाकलेले पुर्वीचे सगळेच फोटोज दिसत नाहीत. आता ते परत दिसण्यासाठीही काय करु ते सांगा?

अरे माबो वर 'मिकी वायरस' सारखा चांगला पीसी च तांत्रीक ज्ञान असणारं कुणीच नाही का? वरच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मदत करा. प्लीज Happy .

अत्तापर्यंत तीनदा असे झाले की मी प्रतिसाद मा.बो.वर टाकला . तो काहीवेळ दिसला नंतर काय झाले माहीत नाही तो गायबच झाला. प्रतिसाद दिल्या नंतर खाली सेव व प्रतिसाद तापासा असे आहे. नेमके तेथे काय कारायचे हे माहित नाही.

Pages