आत्मप्रभा

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 3 January, 2013 - 04:57

तव कृपेचा झरा आत
हळू हळू आहे वाहत
अन पावुले नकळत
तुजकडे आहे चालत ll१ ll
संपले आता रागावणे
संपले उगा खंतावणे
तुच काढिले गळ्यातून
मुढ अहंतेचे लोढणे ll२ ll
पाहतो होऊन चकित
मीच होते काय हे केले ?
लोढणे मानुनिया प्रिय
कैसे चैतन्य नाकारीले ? ll३ll
अवघी काजळी भ्रमाची
पूर्णपणे आता मिटली
जाणीवेत आणि कोवळी
आत्मप्रभा आहे दाटली ll४ll

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा, अतिशय सुरेख रचना. प्रासादिक व आशयघनदेखील.

"आत्मप्रभा नित्य नवी | तेचि करुन ठाणदिवी | जो इंद्रियाते चोरुन जेवी | तयासीची फावे ||" - ज्ञानेश्वरी अ. ६
काय बहारदार ओवी आहे पहा माऊलींची........

तुच काढिले गळ्यातून
मुढ अहंतेचे लोढणे ll२ ll
......
लोढणे मानुनिया प्रिय
कैसे चैतन्य नाकारीले ? ll३ll

- वा! फार छान Happy .