आडनावांचा इतिहास...

Submitted by सेनापती... on 26 December, 2012 - 20:45

नमस्कार...

येथे विविध आडनावे, त्यांची उत्पत्ती / व्युत्पत्ती आणि इतिहास याबद्दल माहिती संकलीत व्हावी अशी इच्छा आहे.

पुर्वी आडनावे नव्हती असे दिसुन येते. ती कधी पासून वापरात येउ लागली, कशी तयार होत गेली याबद्दल अधिक जाणून घ्यायची इच्छा आहे.

अनेकांना स्वतःच्या आडनावांचा इतिहास / अर्थ माहित नसतो ते ही कदाचीत येउन माहित होउन जाईल.

कृपया... या धाग्यावर एखाद्या आडनावाविषयी माहिती विचारण्याआधी खाली दिलेल्या पानांवरील आडनावे वाचून बघा.

उल्लेख / माहिती असलेली आडनावे -

पान १ : देशपांडे, देशमुख, पाटील, चौधरी, परजणे, गायकवाड, भारती, कुलकर्णी, उपाध्ये / उपाध्याय, सकळकळे, देव, पटवर्धन, सावंत, सामंत, मराठे

पान २ : जोशी, कोंडे-कोंढे, चव्हाण-चौहान, शिंदे, पाठक-वेदपाठक, जुन्नरकर

पान ३ : सहारे, खंडाळकर, गाडगिळ, पवार, रावण, अशोकदा यांची पोस्ट, वाघमारे आणि प्राणिवाचक आडनावे, देसाई - नंदिनी यांची पोस्ट, केंभावी, चौधरी - प्रिंसेस यांची पोस्ट

पान ४ : गांधी-नेहरु, बच्चन, देसाई - अधिक माहिती, कुलकर्णी, नाडकर्णी, जगदाळे, साबळे, दहातोंडे, 'आडनाव' वा 'कुळनाम' - अशोकदा यांची पोस्ट, यामादा-हायाशी-कोबायाशी - जपानी आडनावे, राजे, राजेशिर्के, पंदेरे, खताते, भुरण, काते, चिले

पान ५: शिंदे, किर्लोसकर, देसाई - अशोकदा यांची पोस्ट, इनामदार, जाधव, यादव, तांबोळी, मणियार-मण्यार, पारकर, दिक्षित

पान ६ : भारतातील-परदेशातील स्थलांतरीत मराठी आडनावे, मोकाशी, खेर, चौगुले

पान ७ : धामणे, शिलाहार-शेलार, भट, देवधर, गोडबोले, प्रभु-देसाई, भिडे, आंबोळे, वालावलकर

पान ८ : ठाकूर-ठाकरे-ठाकेर, बागवे - भाऊंची पोस्ट, थोरात, बडवे, किंकर, राउत, साळवे-साळवी, कदम-कदंब, चुरी

पान ९ : पेठकर-पेटकर, गुर्जर, पाध्ये, निंबाळकर, जगताप, वानखेडे, देव

पान १० : मुळे-मुळ्ये, 'वार'चा अर्थ, मुंबई परिसरातील आडनावे - दिनेशदा यांची पोस्ट,

पान ११ : शिकलगार, अग्निहोत्री, हर्डिकर-अभिषेकी-मंगेशकर, सोनार, किहिमकर, वाघ, माळगावकर,

पान १२ : विविध क्षेत्रातली प्रसिद्ध आडनावे - दिनेशदा यांची पोस्ट, वणकुद्रे, सोळंकी, पारसी आडनावे, कुलवृत्तांत-मौखिक इतिहास - वरदा यांची पोस्ट, पांड-पांडे, राजस्थानी आडनावे

पान १३ : कर्णिक, गुप्ता-गुप्ते, सरदार, तेंडुलकर, बंगाली आणि विदर्भीय आडनावे, परांजपे

पान १४ : येल्लुर आणि गीर येथील आफ्रिकन वंशाचे सिद्दी, शेंडे-शेंड्ये, आडनाव लावण्याची प्रथा - चिनुक्स यांनी दिलेल्या लिंक्स, केळकर, साठे-साठ्ये, मठाधिकारी, धडाम

पान १५ : चित्पावन ब्राह्मण, गोत्रे, आडनावे व इतिहास, तंजावर मराठी आडनावे, भंडारी, पाटणकर

पान १६ : श्रोत्रिय, ठाकर, समर्थ, पाठारे प्रभु आडनावे, वाडवळ आडनावे, हातीवलेकर, धडाम, भाट, अधिक तंजावर मराठी आडनावे, विश्वासराव

पान १७ : पुणतांबेकर, घाटपांडे, प्राचीन मराठीचा शब्दकोश - चिनुक्स यांची पोस्ट, ठोमरे

पान १८ : ........ अपुर्ण...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त धागा आहे... खूप माहिती मिळते आहे... यातल्या केवढ्या गोष्टी माहितच नव्हत्या...
मी माहेरची कर्णिक... मी ऐकलेली माहिती अशी की कर्णिक म्हणजे अकाऊंटंट.. पेश्यामुळे सदान्कदा कानाला लेखणी लावून फिरत म्हणून कानावरून आडनाव पडले...
सिकेपी सोडले, तर बहुदा जीएसबी पण असतात... मधु मंगेश कर्णिक जीएसबी आहेत अस ऐकलं होतं, त्यावरून म्हणते आहे...
गुप्ते (सासर) बद्दल पण ऐकलं आहे की गुप्तहेर खातं यांच्याकडे असायचं.. म्हणून गुप्ते... नक्की काहिच माहित नाही...
सीकेप्यांमधली बरीच आडनावं हुद्द्यावरूनच आलेली वाटतात.. देशपांडे, देशमुख, चिटणीस, फडणीस, गडकरी, प्रधान, ई.
अजुन माहिती वाचायला आवडेल.

सर्वात वाचनीय धागा. विशेषतः अशोक मामा आणि वरदा यांच्या पोस्टी तर खासच.

वरदा यांनी आपल्याकडे नीट डॉक्युमेंटेशन करायची पद्धत नाही याबाबत लिहिले आहे, ते खरेच आहे.

कै. गं बा सरदार हे मागील पिढीतील एक ज्येष्ठ विचारवंत मूळचे तेंडुलकर. त्यांनी तेंडुलकर घराण्याचा वंशवृक्ष (family tree) काढला आहे. तो पार अगदी १६ व्या शतकापर्यंत मागे जातो!

स्वतःचे रूट्स हुडकण्याची धडपड बर्‍याच अमेरिकनांना असते. पैकी गोर्‍यांचे मूळ युरोपात कुठेतरी तर काळ्यांचे अफ्रिकेत! अलेक्स हेलीची रूट्स नावाची कादंबरी प्रसिद्धच आहे (पुढे त्यावर साहित्यचोरीचा आरोपही झाला, ते वेगळे!)

पण असे काहीतरी करण्याची ईच्छा इतर (गं बा सरदार यांच्याप्रमाणे) घराण्यांनीही केली तर, एक उत्तम सामाजिक अभ्यासाचा दस्तऐवज तयार होईल.

my two paisas.

@ mami / agrawal

you are rich ~wink~
agrasen maharaj is like god to tht community. they say that he gave a GOLD BRICK to each house head and told them to 'go forth and multiply' and conquer the world.

(pl take lightly no offense)

***

another thing i wondered was why 'kuldaivats' of many families were at out of the way or inaccessible places. as surname is abt family names. and diff family names from diff communities have same kul-daivat.

one explanation was those villages were on prosperous trade routes in ooooooooooold days. and ALL the ppl of all communities frm tht village shared worship of that goddess.

n why they have a female diety as their 'kul devataa' why not male? some families do. most dont have such male family gods.

varada, any comments please?

काही कोमटी वार आडनावं: गोगुलवार, मड्डीवार, आइंचवार, मारावार, कोट्टावार, पट्टीवार, कोशेट्टीवार, पोशेट्टीवर, मेडपिलवार, गुट्टेवार, मुनगंटीवार, वडेट्टीवार, अडगिलवार, पडगिलवार, पलिकुंडवार, कलकोटवार, तगलपल्लेवार, मुक्कावार, बुक्कावार Wink

बेसिक प्रष्ण : आडनावे लावयची पद्धत कधी पासुन रुढ झालि? म्हणजे नाव बापाचेनाव व आडनाव हा फोरमॅट कधी पासून आला?

करान्त आडनावांची पद्धत महाराष्ट्रात इतर विभागांपेक्षा कोकणात अधिक दिसते. किंबहुना, कुठल्या ना कुठल्या प्रकारे गावाशी नाळ जोडून ठेवण्याची प्रथा एकंदरीतच कोकणात (दमण ते मंगळूर) जरा जास्त असावी. इतकी की, कोकणातील हिंदूंप्रमाणेच मुसलमान, ख्रिश्चन आणि ज्यूंमध्येदेखिल करान्त आडनावे दिसतात.

कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिम (कासकर), गेल्या पिढीतील एक बुजूर्ग ज्यू अभिनेता डेविड (चेऊलकर) ही काही उदाहरणे.

जाज्वल्य गोमंतकीय (जाज्वल्य हे विशेषण "ते" सोडून इतर ठिकाणच्या लोकांना लावण्याची मुभा आहे ना? ;)) मात्र "कर" न लावता "कार" असे लावतात. विख्यात कोंकणी साहित्यिक रविंद्र केळेकार हे एक उदाहरण.

कारवार भागात मात्र "कर" न लावता थेट गावाचे नावच आडनाव म्हणून लावण्याची प्रथा दिसते. सुमन कल्याणपूर, गुरु दत्त (पदुकोण) ही काही उदाहरणे.

पेशवा | 29 December, 2012 - 01:20
बेसिक प्रष्ण : आडनावे लावयची पद्धत कधी पासुन रुढ झालि?

"पेशवा"ईपासून हे प्रथा सर्रास सुरू झाली, असे अशोक मामांच्या मागील एका प्रतिसादात आले आहेच. Wink

म्हणजे नाव बापाचेनाव व आडनाव हा फोरमॅट कधी पासून आला?

हा फॉरमॅट म्हणजे मराठी आणि इंग्रजी प्रथांचे मिश्रण असावे. म्हणजे असे - मराठी प्रथा ही प्रथम तुमचे नाव आणि नंतर वडिलांचे नाव अशी. आडनाव असले तरी, ते सर्रस लावण्याची प्रथा पूर्वी नव्हती. तर इंग्रजी प्रथा ही प्रथम तुमचे नाव, नंतर (असलेच तर) तुमचेच दुसरे नाव (वडिलांचे नव्हे!) आणि शेवटी आडनाव अशी आहे. ह्या दोन प्रथांचे मिश्रण म्हणजे नाव-वडिलांचे/नवर्‍याचे नाव-आडनाव हा फॉरमॅट!

मस्त धागा...
अस कुठेतरी वाचलं होत कि, काही बंगाली आडनावे ब्रिटिशांनी बदलली.
उदा: बंडोपाध्याय -> बंडोजी -> बॅनर्जी
मुखोपाध्याय -> मुखोजी -> मुखर्जी
चटोपाध्याय -> चटोजी -> चॅटर्जी

नताशा
काही कोमटी वार आडनावं: >>
हे घे आणखी, वट्टमवार, पांपटवार, दमकोंडवार Lol ,पदमवार, मामीड्वार, बनगिनवार, काप्रतवार, गुंडेवार,
अर्थमवार, मोरलवार, लाभशेटवार, चिद्रवार, पत्तेवार, बच्चेवार

अन्न-धान्यावरुन आलेली नावे - तांदळे, गव्हाणे, साखरे, शेंगदाणे,

भावांच्या संखेवरुन - पंचभाई, सातभाई.

शारिरिक अवयव्/व्यंग/रुप/गुण ई. - काळे, लंगडे, एकबोटे,डोळ्स, तोतरे, बडबडे, शेंबडे.

पशु-पक्षी - वाघ, कोल्हे, हरणे, मुंगी, चिमणे, कावळे, डोम्ब्कावळे, गाढ्वे, नाग, डुकरे.

मस्त धागा.

कारवार भागात मात्र "कर" न लावता थेट गावाचे नावच आडनाव म्हणून लावण्याची प्रथा दिसते. सुमन कल्याणपूर, गुरु दत्त (पदुकोण) ही काही उदाहरणे. >> कर्नटकात मी हुबळी हे आड्नाव ऐकले आहे.

आडनांवे गावावरून असल्याने सयुक्तिक वाटतात, पण काहींची कुलदैवते खूप लांबच्या ठिकाणची असतात ते कसे काय? असा प्रश्न वर इब्लिस यांनी विचारला आहे,
त्यावर माझे ४ पैसे Happy
>>>>
one explanation was those villages were on prosperous trade routes in ooooooooooold days. and ALL the ppl of all communities frm tht village shared worship of that goddess.
>>>>
ह्याबरोबरच, असे असावे का? की आत्ता जी कुलदैवते आहेत ती मुळात ग्रामदैवते असावीत.
म्हणजे, त्या त्या गावच्या लोकांचं मुख्य दैवत. आणि वरच्या एक्स्प्लनेशननुसार, ती गावे कदाचित व्यापाराच्या दृष्टीने भरभराटीला आलेली गावे असावीत, ज्यामुळे त्या गावात जास्त लोक राहात असावेत?
नंतर कामानिमित्त लोक दुसर्‍या गावी गेले तरी तिथल्या गावचं ग्रामदैवत 'आपलं दैवत' म्हणून मानत नसावेत.
मग काळाच्या ओघात कदाचित त्या दूरच्या गावाचं नाव आडनावात आलं असेल.त्यामुळे दूरच्या गावी स्थलांतर झालं तरी कुलदैवत मात्र तेच राहिलं.
हा फक्त अंदाज आहे..

वरदा, अशोककाका यांच्याकडून प्रतिसाद अपेक्षित आहे.

कोकणामधे बर्‍याचदा मूळ गाव आणि कुलदैवत अशी सांगड सापडते. देशावर मात्र ही सांगड जास्तकरून आढळत नाही. आमचे मूळ गाव बागलकोट आणि कुलदैवत मात्र तुळजापूर आहे.

रोहन, मी चेन्नईत नव्हे तर एकदा मुंबईमधे अशा एका तंजावरी मराठी मुलीशी बोलले होते. तिचं तमिळलेलं मराठी एकदम वेगळी भाषा वाटते. तिचं आडनाव राव होतं. इकडे गणपतीच्या दिवसांमधे आढळलेले अजून एक साम्य. इथे पण गणपतीच्या पार्थिव मूर्तीची पूजा होते पण गणपती ओल्या मातीचा असतो आणि रंगवलेला वगैरे अजिबात नसतो. प्रसाद म्हणून उकडीचे मोदक!! फक्त आपण करतो तसे कळ्यावगैरे कलाकुसर नसते. पिरॅमिडसारखा आकार देऊन उकडतात. बाकी सर्व रेसिपी सेम कर्नाटकामधे उकडीचे मोदक हा प्रकार जवळजवळ नाहीच. एक राज्य उडी मारून हा पदार्थ परत इथे रूजलेला पाहून मजा वाटली होती (की इकडून तिकडे गेला????)

मंगलोरला असताना सतिशच्या ऑफिसमधे एकजण होता. घरामधे तूळू वगैरे बोलायचे, तसं प्रथापरंपरानी कानडी वातावरण. पण जात मात्र मराठा. शिवाजी महाराजांसोबत इकडे आले होते म्हणून सांगितलं होतं. त्याचं पण आडनाव रावच होतं.

दक्षिणेकडे सर्वत्र गावाचे नाव, वडलांचे नाव आणि मग स्वत:चे नाव असे लिहितात. सोयीसाठी हे बर्‍याचदा गावाचे आणि वडलांचे नाव इंग्रजी आद्याक्षरात लिहितात. मग स्थानिक भाषेमधे लिहिताना पण इंग्रजी आद्याक्षरेच लिहितात. उदा. के यु विठ्ठल असे नाव असेल तर कानडीमधे "के" "यु" असे लिहितात. का. (कारवार) उ. (उमेश) विठ्ठल असे लिहत नाहीत.

<<.....मात्र "कर" न लावता "कार" असे लावतात. विख्यात कोंकणी साहित्यिक रविंद्र केळेकार हे एक उदाहरण>> सुनीलजी, बर्‍याच कोकणी भाषांमधे नांवातल्या 'कर' चा बोलताना मात्र ' कार' असाच उच्चार केला जातो. उदा. नांव 'गावसकर' असलं तरी मालवणीत बोलताना ' गावस्काराच्या सुनीलान क्रिकेट गाजवल्यान ', असंच बोललं जातं. माझ्याबद्दल इथल्या मालवणी कंपूत ' त्या भाऊ नमस्काराक श्यानपन बंद करूंक सांगा रे कोनी तरी ! ', असाच सूर ऐकूं येईल. कदाचित 'केळेकरा'नीं उच्चाराप्रमाणेच 'केळेकार' नांव लिहीणं स्विकारलं असावं.

एकदा मुंबईमधे अशा एका तंजावरी मराठी मुलीशी बोलले होते. तिचं तमिळलेलं मराठी एकदम वेगळी भाषा वाटते>> मटा मध्ये आशिष चांदोरकरांचा एक लेख वाचलेला.
ते तेव्हा निवडणुका कव्हर करायला तिकडे गेलेले. अशी एक व्यक्ती एका नेत्याच्या प्रचारसभेचे वेळापत्रक संभाळात होती. ते त्यांच्याशी बोलले देखील होते. त्यांच्या ब्लॉगवर लेख असेल आर्चिव्स मध्ये.

you are rich ~wink~
agrasen maharaj is like god to tht community. they say that he gave a GOLD BRICK to each house head and told them to 'go forth and multiply' and conquer the world.

(pl take lightly no offense)

>>>>>> इब्लिस, नो ऑफेन्स टेकन!!! Proud ती सोन्याची वीट घरी शोधून बघते. Happy

मामी, 'go forth and multiply' तेव्हा आतापर्यंत सोन्याच्या विटांची भिंत तयार व्हायला हवी तुमच्याकडे Wink

नंदिनी....

तुम्ही दक्षिणेकडील राज्यातील लोकांची 'नावे' लिहिण्याच्या पद्धतीविषयी वर लिहिले आहेच. त्याचा संदर्भ धरून सांगतो की आमच्या ऑडिट विभागात नव्याने एक स्टेनो [महिला] सेवेत आली होती. मूळची केरळच्या त्रिचुर जिल्ह्यातील होती. चार सहकारी लोकांच्या टीमची मी निवड करून त्याना ड्युटीवर केव्हापासून हजर राह्यचे याचा मेमो केला आणि तशी नोटीस टंकण्यासाठी तिच्याकडे दिली होती. तिने नोटीस तर व्यवस्थित केलीच, पण ज्यावेळी त्या चौघांच्या नावाचे लखोटे तिने माझ्या हाती ठेवले त्यावेळी मी काहीसा चक्रावलोच. नावे अशी टंकली होती पाकिटावर :

१. एस.बी. भीमराव
२. जे. एस. रामचंद्र
३. सी. एल. वसंतराव
४. के. आर. जगन्नाथ
महाराष्ट्रीयन पद्धतीत...शाळाकॉलेजीसच्य कॅटलॉगमध्ये वगैरे....प्रथम आडनाव, मग नाव आणि नंतर वडिलांचे नाव द्यायची सर्रास पद्धत आहे. त्यानुसार मी नावे दिली होती......१. सासणे बाळासाहेब भीमराव, २. जाधव स्वाती रामचंद्र, ३. चव्हाण लक्ष्मण वसंतराव, ४. क्षीरसागर रमेश जगन्नाथ,

त्या स्टेनो बिचारीला नावाची महाराष्ट्रीन पद्धती माहीत नसल्याने तिने दिलेल्या नावांचे तिच्या दक्षिण रितीरिवाजानुसार बारसे करून त्यांचेद तीन भाग केले. पहिल्या दोनची आद्याक्षरे आणि तिसरा भाग पूर्ण देणे.

[त्यातही तिने 'स्वाती' महिला म्हणून 'Miss J. S. Ramachandra' अशी जी नोटील टंकली होती, ती वाचून स्वातीसह सार्‍यांची हसून हसून पुरेवाट झाली होती. पुढे कित्येक दिवस स्वातीबाईला सार्‍यांनी "अहो मिस रामचंद्र' अशीच हाक मारणे सुरू केले होते....अर्थात खेळीमेळीने...हसतखेळत.]

अशोक पाटील

हे गावाशी नाळ जोडणे का होत असावे ? आधी तर आपण सर्वच भटके होतो. जिथे सुपीक जमीन / पाणी होते तिथे थांबलो. मग तिथली परिस्थिती बिघडल्यावर किंवा अधिक चांगल्या ठिकाणी जायचे म्हणून तिथून निघालो, आणि नव्या जागी वसलो.

मग जिथे काही काळच राहिलो, त्याची आठवण जपायचे कारण काय ? त्या जागेशी / गावाशी एवढी अटॅचमेंट का असावी ?

ती स्थिरस्थावर आयूष्य देणारी ( नाव असणारी ) पहिली जागा होती म्हणून कि जिथे आलो तिथल्या लोकांनी विचारले, कुठून आलात, म्हणून ?

<< हे गावाशी नाळ जोडणे का होत असावे ? >> दिनेशदा, कारण साधं सरळच असावं. आडनांव कांहीही असलं तरी ऑफिसमधे नाही का म्हणत, 'अरे, त्या डोंबिवलीकराला बोलव बघूं', 'बघा रे त्या पार्लेकरांचं काय खलबत चाललंय ', इ.इ. ! आणि, माणूस जगांत कुठेही गेला तरीही कुठेतरी पूर्वापार आपलीं मूळं घट्ट धरून आहेत ही भावना त्याला दिलासा देणारीच असावी ! इतराना आपल्यासाठीं व आपल्याला स्वतःसाठी निश्चित, कायमस्वरुपी ' आयडेंटीटी' असावी , ही आत्यंतिक, मूलभूत गरजच यामागे असावी असं मला वाटतं.

परांजपे ह्या आडनावाबद्दल कुणी काही लिहिलेले दिसले नाही.
माझ्या नजरेतून सुटलेही असू शकेल. पण ह्या आडनावाबद्दलची ऐकीव माहिती-

वाणीचे जे चार प्रकार आहेत ते-
वैखरी|, मध्यमा, पश्यन्ती आणि परा- त्यातल्या 'परा' वाणीने जप करणारे ते परांजपे.
परा वाणीने जप करणे म्हणजे अक्षरश: श्वासाश्वासावर जप चालू असणे.
मला आधी वाटायचे जे 'परांना म्हणजे इतरांना जपतात ते परांजपे'. Happy

शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटं छाटली...त्या शाखाच्या वंशजांना एकबोटे तर म्हणत नसावेत? Wink

गोगो,

>> गुप्ते (सासर) बद्दल पण ऐकलं आहे की गुप्तहेर खातं यांच्याकडे असायचं.. म्हणून गुप्ते

माझा एक मित्र म्हणतो की चित्रगुप्तावरून चित्रे आणि गुप्ते ही आडनावे आली! उत्तर भारतातील गुप्त/गुप्ता हे लोक मात्र चंद्रगुप्ताच्या वंशातले आहेत.

आ.न.,
-गा.पै.

भाऊ, हे गावाशी नाते जोडून राहणे गोवेकरांना छानच जमते. त्यांच्या ग्रामदेवतेच्या उत्सवाला, ते जगात कुठेही असले तरी हजेरी लावतातच. किमान आर्थिक मदत तरी करतातच.

कोणी पंडित/पंडीत आडनावाबद्दल सांगू शकेल काय?
आमच्या शेजारी राहतात. सून म्हणते आम्ही सोनार आहोत. सासू म्हणते नाही आम्ही ब्राम्हणच.

Pages