आडनावांचा इतिहास...

Submitted by सेनापती... on 26 December, 2012 - 20:45

नमस्कार...

येथे विविध आडनावे, त्यांची उत्पत्ती / व्युत्पत्ती आणि इतिहास याबद्दल माहिती संकलीत व्हावी अशी इच्छा आहे.

पुर्वी आडनावे नव्हती असे दिसुन येते. ती कधी पासून वापरात येउ लागली, कशी तयार होत गेली याबद्दल अधिक जाणून घ्यायची इच्छा आहे.

अनेकांना स्वतःच्या आडनावांचा इतिहास / अर्थ माहित नसतो ते ही कदाचीत येउन माहित होउन जाईल.

कृपया... या धाग्यावर एखाद्या आडनावाविषयी माहिती विचारण्याआधी खाली दिलेल्या पानांवरील आडनावे वाचून बघा.

उल्लेख / माहिती असलेली आडनावे -

पान १ : देशपांडे, देशमुख, पाटील, चौधरी, परजणे, गायकवाड, भारती, कुलकर्णी, उपाध्ये / उपाध्याय, सकळकळे, देव, पटवर्धन, सावंत, सामंत, मराठे

पान २ : जोशी, कोंडे-कोंढे, चव्हाण-चौहान, शिंदे, पाठक-वेदपाठक, जुन्नरकर

पान ३ : सहारे, खंडाळकर, गाडगिळ, पवार, रावण, अशोकदा यांची पोस्ट, वाघमारे आणि प्राणिवाचक आडनावे, देसाई - नंदिनी यांची पोस्ट, केंभावी, चौधरी - प्रिंसेस यांची पोस्ट

पान ४ : गांधी-नेहरु, बच्चन, देसाई - अधिक माहिती, कुलकर्णी, नाडकर्णी, जगदाळे, साबळे, दहातोंडे, 'आडनाव' वा 'कुळनाम' - अशोकदा यांची पोस्ट, यामादा-हायाशी-कोबायाशी - जपानी आडनावे, राजे, राजेशिर्के, पंदेरे, खताते, भुरण, काते, चिले

पान ५: शिंदे, किर्लोसकर, देसाई - अशोकदा यांची पोस्ट, इनामदार, जाधव, यादव, तांबोळी, मणियार-मण्यार, पारकर, दिक्षित

पान ६ : भारतातील-परदेशातील स्थलांतरीत मराठी आडनावे, मोकाशी, खेर, चौगुले

पान ७ : धामणे, शिलाहार-शेलार, भट, देवधर, गोडबोले, प्रभु-देसाई, भिडे, आंबोळे, वालावलकर

पान ८ : ठाकूर-ठाकरे-ठाकेर, बागवे - भाऊंची पोस्ट, थोरात, बडवे, किंकर, राउत, साळवे-साळवी, कदम-कदंब, चुरी

पान ९ : पेठकर-पेटकर, गुर्जर, पाध्ये, निंबाळकर, जगताप, वानखेडे, देव

पान १० : मुळे-मुळ्ये, 'वार'चा अर्थ, मुंबई परिसरातील आडनावे - दिनेशदा यांची पोस्ट,

पान ११ : शिकलगार, अग्निहोत्री, हर्डिकर-अभिषेकी-मंगेशकर, सोनार, किहिमकर, वाघ, माळगावकर,

पान १२ : विविध क्षेत्रातली प्रसिद्ध आडनावे - दिनेशदा यांची पोस्ट, वणकुद्रे, सोळंकी, पारसी आडनावे, कुलवृत्तांत-मौखिक इतिहास - वरदा यांची पोस्ट, पांड-पांडे, राजस्थानी आडनावे

पान १३ : कर्णिक, गुप्ता-गुप्ते, सरदार, तेंडुलकर, बंगाली आणि विदर्भीय आडनावे, परांजपे

पान १४ : येल्लुर आणि गीर येथील आफ्रिकन वंशाचे सिद्दी, शेंडे-शेंड्ये, आडनाव लावण्याची प्रथा - चिनुक्स यांनी दिलेल्या लिंक्स, केळकर, साठे-साठ्ये, मठाधिकारी, धडाम

पान १५ : चित्पावन ब्राह्मण, गोत्रे, आडनावे व इतिहास, तंजावर मराठी आडनावे, भंडारी, पाटणकर

पान १६ : श्रोत्रिय, ठाकर, समर्थ, पाठारे प्रभु आडनावे, वाडवळ आडनावे, हातीवलेकर, धडाम, भाट, अधिक तंजावर मराठी आडनावे, विश्वासराव

पान १७ : पुणतांबेकर, घाटपांडे, प्राचीन मराठीचा शब्दकोश - चिनुक्स यांची पोस्ट, ठोमरे

पान १८ : ........ अपुर्ण...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'बागवे' नावाबद्दल काहि माहीती आहे का? बाबा म्हणतात कि मूळ नाव सिसोदीया, राजस्थान मधून महाराष्ट्रात आले . त्याचे बागवे कसे झाले माहीती नाही.>>>> सामी, बागवे माझ्या आईच्या माहेरच आडनाव. ह्याबद्द्ल मलाही काही माहिती नाही पण बहुतेक असेच असेल कारण माझं आडनाव "राणे" असं म्हणतात आमचे पुर्वज हल्दीघाटीच्या युद्धानंतर राजस्थानातुन तळकोकणात स्थलांतरीत झाले. जे मुळचे "राणा" होते पुढे अपभ्रंश होउन राणे झाले. हे राणे लोक नाती जोडण्याच्या बाबतीत एकदम चुझी असतात. खूप कमी आडनाव आमच्यात आढळतात (आढळायची). त्यामुळेच म्हणते बागवे राजस्थानी असू शकतात.

मी वर लिहिलेले होते कि शिंदे पण राजस्थानातून आले होते. आणि हे चूझी पण माझ्या आजोळी पण. काही ठराविक आडनावांनाच आपले मानतात Happy

इंटरेस्टिंग माहिती जमा होतेय.
माझ्या एका बंगाली मैत्रिणीला मराठी आडनावांची फारच मजा अन उत्सुकता वाटायची. ती सारखी कुठलंही मराठी आडनाव ऐकलं की त्याचं मूळ शोधायला माझ्या मागे लागायची.
तेव्हा आमच्या असं लक्षात आलं (नुसतं निरिक्षण, नो अभ्यास) की सहसा ज्यांना फिक्स्ड पदवी/वतन्/गोत्र्/गाव/ प्रोफेशन असं काही नसेल तेव्हा त्यांची आडनावं "झाडे, काळे, कोल्हे, ताकसांडे" अशी जेनेरिक झाली असावीत. किंवा नंतरच्या काळात, एखाद्या धंद्यावरुन आपल्याला ओळखू नये, म्हणून लोकांनीच अशी आडनावं घेतली असतील.

विशेषण टाइप आडनावं इंग्रजांमध्ये असतात, त्यावरुन आपल्या लोकांनी घेतली असतील का? जसे Black-काळे, Brown-तपकिरे, Armstrong- भुजबळ वगैरे..

गोडबोले .... काका , काकी , आत्या , काही इतर आदनाव बंधुंना बघुन आमचे पुर्वज काही फार गोड बोलत असावेत असं वाटत नाही Biggrin कदाचित उपरोधिक असु शकेल ...
असो तर कथा अशी आहे म्हणे ( म्हणे म्हणजे सकाळ मधे वाचली होती...ऐकीव आहे खात्री नाही ...सकाळ मधे कोणीही काहीही लिहित हो आजकाल )

आमचं नाव पुर्वी देवधर होतं ...त्याच्यापुर्वी भट ( भट चं देवधर कसं झाले ते माहीत नाही ) तर ह्या देवधर लोकाना म्हणे माहाराजान्नी गडावर संदेश पोहचवायचे काम दिले होते ...अन हे लोक खालुनच आरोळी ठोकायचे ... त्यामुळे ते गडाशी बोलातात असे लोकांना वाटत असावे ...म्हणुन मग गडाशी बोलतात ते गडबोले ... त्याचेच पुढे गोडबोले झाले असावे .:अओ:

कोकणातले कुडाळदेशकर देसाई हे सगळे पूर्वी प्रभु-देसाई असं जोड आडनांव लावायचे (माझे पूर्वज). बहुतेक कुडाळदेशकरांच्या आडनावाची सुरूवात 'प्रभू' ने होत असे (का ते विचारू नका, माहीत नाही). जसे प्रभू तेंडोलकर, प्रभू-खानोलकर , प्रभू-देसाई वगैरे. नंतर काहीनी प्रभू ठेवलं आणि दुसरं नांव सोडलं. आणि काहीनी याच्या उलटं केलं.
देसाई यांचा महसूल गोळा करण्यात काहीतरी हात होता, हे बर्‍याचवेळा ऐकलेलं आहे.

'सामंत' हे बहुतेक सगळे ९०% परूळे गावाशी संबधीत आहेत. (ते सावंत नव्हेत).

ह्याच्या वरुन एक जोक आठवला ....माझ्या एका ब्रिगेडी मित्राने परांजपे ह्या शब्दाची व्युत्पत्ती पर अन्न जपे अर्थात जे नेहमी दुसर्‍याच्या घरी भिक मागुन जगतात ते अशी केली होती Rofl

त्याची खरी व्युत्पत्ती अशी आहे
परांजपे = परां + जपे = अर्थात जे परा वाणी मधे जप करतात ते !! Light 1

नंदिनी.. तामिळनाडुत नाड चा अर्थ देश / प्रांत असा काहिसा आहे का?

नाडकर्णी हे आडनाव तिथूनच आले आहे का बहुदा?

उठसूठ कुणालाही भिडणारे म्हणून ’भिडे’(र्‍ह्स्व भि) आडनाव पडले असेल....
नेहमी संकोचणार्‍या लोकांना ’भीडे’( दीर्घ भी) आडनाव पडले असेल. Happy
अमूक देव(द्या),तमूक देव(द्या) अशी सतत मागणी करणार्‍यांना देव असं आडनाव पडलं असेल. Happy

सगळ्या पोस्ट्स अजून वाचल्या नाहीत, पण मजेशीर माहिती मिळते आहे. Happy
'भिडे' आले, आता 'आंबोळे'चाही उगम सांगा. Happy
आंबोली घाटाशी काही संबंध असेल का?

माहेरचं आडनाव भिडे, पण फार पूर्वी ते 'रसाळ' होतं असं वडिलांकडून ऐकल्याचं आठवतं. रसाळ वाणीमुळे असेल असं माझं मीच ठरवलं आहे. Proud

ओह ओके ओके. धन्यवाद. Happy

आंबोळी(पदार्थ)चा संबंध असेलही. कोण जाणे.
अशी खाद्यपदार्थांवरून आणखी आडनावं ऐकली आहेत का?

प्रभु : पर भु = दुसर्‍या भुमितुन आलेले = गौड सारस्वत सरस्वती नदीच्य आसपास रहाणारे= नतर सरस्वती नदी लुप्त झाल्यावर खाली दक्षिणेला सरकले. ( स्र्तोतः माझी एक सारस्वत मैत्रिण)

रोहन, ते भात = तांदुळ या अर्थी आहे ना?
मी तरी अशी 'प्रोसेस्ड' पदार्थांवरून आडनावं पारशांतच ऐकली आहेत. दारूवाला वगैरे. Lol

बोंडे, तळेले, विनोद, जमनीस / जमेनीस, भोगले, नेवगी, भाटकर, पार्टे यांचे अर्थ माहित असल्यास सांगा...

साळवी आणि सुर्वे ह्या कोकणी आडनावांवर लिहा कोणीतरी... Happy

महाजन सुद्धा.

आंबोळे हे आडनाव मी पहिल्यांदा स्वातीचंच ऐकलंय. तस्मात तुम्हीच सांगा याची उत्पत्ती Happy

दहीभाते, दूधभाते अशी आडनावे आहेत खाद्यपदार्थांवरून.

जगातल्या सगळ्या महाखडूस लोकांना देवाने कुलकर्णी नाव दिले आहे असा माझा लहानपणी समज होता, सासर कुलकर्णी झाल्यावर ..जाउदे Proud

रोहन, मस्तच धागा.

परभू आणि प्रभू एकच का ?

हे.मा. , आमचं देवस्थान वालावल. त्यामुळे नाव वालावलकर देसाई झालं. अजूनही मूळ घरी रहाणारे वालावलकर आडनाव लावतात. बाहेर पडलेले (काही पिढ्यांआधी) देसाई नाव लावतात. प्रभू-देसाई वेगळे. १००% सामंत कुडाळदेशकर. दुसर्‍या जातीत हे नाव ऐकलं नाही. जाणकारांनी प्रकाश टाकावा.

आधी मुलाच्या नावामागे वडलांच नाव लावलं की पुरेसं व्हायचं अगदी ९५ पर्यंत कॉटन मिल्स / एस्टी वगैरे मध्ये तुकाराम सखाराम एव्हढ्याच नावाने ओळखला जायचा माणूस. (आठवा पुलंचा येष्टीमधला शिवराम (की सखाराम) गोविंद)
गोव्यातली काही नावं ही वडलांच्या नावावरुन मुलांना पडली असं ऐकलं होतं
उदा. पेड्रोज = पेद्रोचा मुलगा, डीक्रूझ = डिक्रूचा मुलगा ...

गाव, व्यवसाय, हुद्दा, पराक्रम (किंवा पळपुटेपणा) हे सोडून ईतर प्रकाराने आडनावे पडली असतील का ?

पळपुटेपणा = रणछोडदास.

Pages