केला ईशारा जाता जाता...

Submitted by जिप्सी on 27 December, 2012 - 06:34

नविन वर्ष काही दिवसांवर येऊन ठेपलंय. बघता बघता २०१२ ला निरोप द्यायची वेळ आली. काहि दिवसात नवीन वर्षाची पहाट उजाडेल. सहजच मागे वळुन बघताना माझ्या या वर्षीच्या भटकंतीचा आढावा घेतला. या वर्षात पाहिलेल्या ठिकाणांची, सह्याद्री, समुद्रकिनारा, रीसॉर्ट, गडकिल्ले यांची यादी आठवली. या वर्षात मी गड/किल्ले (राजमाची, कोरलई, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, नाणेघाट, पुरंदर-वज्रगड, लोहगड, सुधागड, हडसर, तुंग आणि तेलबैला), समुद्रकिनारे (मांडवा-आवास, मालवण, तारकर्ली, निवती, मोचेमाड, वेंगुर्ला आणि कुणकेश्वर), महाराष्ट्राबाहेर (कश्मिर आणि दिल्ली), पावसाळी भटकंती (पवना, मुळशी, लवासा, ताम्हीणी घाट, माळशेज घाट, भंडारदरा), इतर (भिगवण पक्षी निरीक्षण, करमरकर शिल्पालय, राणीबाग फुल प्रदर्शन, ओझर, भीमाशंकर) इ. ठिकाणी भटकलो.

सरत्या वर्षाला निरोप द्यायला आणि नविन वर्षाच्या स्वागतासाठी मी उद्यापासुन पुन्हा एकदा ५ दिवसाच्या मालवण दौर्‍यावर चाललोय (२०१२ ने जाता जाता केलेला इशारा :फिदी:). तेंव्हा यावर्षीच्या माझ्या भटकंतीतील निवडक १२ प्रचिंच्या "आठवणींचा कोलाज" मी नविन वर्षाच्या शुभेच्छांसहित सादर करतोय. यातील सर्व प्रचि तुम्ही माझ्या त्या त्या मालिकेमधील पाहिलेली आहे.
=======================================================================
=======================================================================

समस्त मायबोलीकरांना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

=======================================================================
=======================================================================
जानेवारी

राजमाची
फेब्रुवारी

भिगवण
मार्च

कोकण
एप्रिल

आवास-मांडवा
मे

दिल्ली
जून

कश्मिर
जुलै

माळशेज घाट
ऑगस्ट

नाणेघाट
सप्टेंबर

मावळ प्रांत
ऑक्टोबर

जुन्नर आणि परीसर
नोव्हेंबर

भंडारदरा
डिसेंबर

पुरंदर-वज्रगड

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिप्स्या.. मेल्या कित्ती भटकलास २०१२ मध्ये.. जणु जग खरच संपणार होते नै....

हे माबो कॅलेंडर म्हणून छापुया का? मास्तरांना कळवा कोणीतरी.....

जिप्सी ...................तुम्ही जिथे काम / नोकरी ...करतात.........तिथे काही व्हॅकेंन्सी असेल तर सांगा... Wink

सुंदर कल्पना ( आता प्रकाशचित्रांना काय ते नेहमी सुंदर म्हणायचे..) पण २०१३ मधे तूझ्या भटकंतीसाठी हक्काचा साथीदार मिळो, हि शुभेच्छा !

जिप्सीफिशर
तिथे काही व्हॅकेंन्सी असेल तर सांगा>>>>> उदयन.. Proud Happy

जिप्स्या.. मेल्या कित्ती भटकलास २०१२ मध्ये.. जणु जग खरच संपणार होते नै.... >>>>रोहन Biggrin

दिनेशदा Happy Happy

सही रे .. लै भारी .. पुर्ण वर्षभर फिरलास तर Happy
घे बेट्या मजा करुन घे .. एकदा लग्न झालं की बघतो किती महिन्यांच कॅलेंडर बनवतोस ते Wink

२०१२ मध्ये तू आम्हां सगळ्यांना सुंदर प्रचिंची मेजवानी देत गेलास...
वेगवेगळ्या थीम्स मधे प्रचि गुंफून आम्हाला मस्त सफर घडवत गेलास...

तुझ्या कॅमेराला लाभलेली तुझी नजर आणखी बहरो..
अश्याच प्रचिंच्या मेजवान्या घडोत..
येत्या वर्षीही तुला भरपूर फिरता येवो... आम्हांला तू पाहिलेल्या जागांची इ-ट्रीप घडत राहो, अशा अनेकानेक शुभेच्छांसह
नववर्षाभिनंदन!! Happy

मस्त Happy
इतके भटकायला मिळाल्याबद्दल अभिनंदन.

नविन वर्षातही असे भरपुर भटकता येवो अशा मनःपूर्वक शुभेच्छा Happy

मस्त! नविन वर्षाच्या शुभेच्छा! सगळेच फोटो अप्रतिम! जुन्नर चा पहिलाच ढ्गांचा फोटो मला खूप आवडला!

वर्षाचे १२ महिने भटकंती, सो लकी >>>> याच्या नावातच आहे याचे रहस्य - "जिप्सी" - जातिवंत भटक्या...
याच्या पायाला बांधलीये भिंगरी...... गं याच्या पायाला बांधलीये भिंगरी...

मस्त रे - असाच भटकत रहा....... चरैवेति, चरैवेति.... आणि फोटोही काढत रहा.....

Pages