आडनावांचा इतिहास...

Submitted by सेनापती... on 26 December, 2012 - 20:45

नमस्कार...

येथे विविध आडनावे, त्यांची उत्पत्ती / व्युत्पत्ती आणि इतिहास याबद्दल माहिती संकलीत व्हावी अशी इच्छा आहे.

पुर्वी आडनावे नव्हती असे दिसुन येते. ती कधी पासून वापरात येउ लागली, कशी तयार होत गेली याबद्दल अधिक जाणून घ्यायची इच्छा आहे.

अनेकांना स्वतःच्या आडनावांचा इतिहास / अर्थ माहित नसतो ते ही कदाचीत येउन माहित होउन जाईल.

कृपया... या धाग्यावर एखाद्या आडनावाविषयी माहिती विचारण्याआधी खाली दिलेल्या पानांवरील आडनावे वाचून बघा.

उल्लेख / माहिती असलेली आडनावे -

पान १ : देशपांडे, देशमुख, पाटील, चौधरी, परजणे, गायकवाड, भारती, कुलकर्णी, उपाध्ये / उपाध्याय, सकळकळे, देव, पटवर्धन, सावंत, सामंत, मराठे

पान २ : जोशी, कोंडे-कोंढे, चव्हाण-चौहान, शिंदे, पाठक-वेदपाठक, जुन्नरकर

पान ३ : सहारे, खंडाळकर, गाडगिळ, पवार, रावण, अशोकदा यांची पोस्ट, वाघमारे आणि प्राणिवाचक आडनावे, देसाई - नंदिनी यांची पोस्ट, केंभावी, चौधरी - प्रिंसेस यांची पोस्ट

पान ४ : गांधी-नेहरु, बच्चन, देसाई - अधिक माहिती, कुलकर्णी, नाडकर्णी, जगदाळे, साबळे, दहातोंडे, 'आडनाव' वा 'कुळनाम' - अशोकदा यांची पोस्ट, यामादा-हायाशी-कोबायाशी - जपानी आडनावे, राजे, राजेशिर्के, पंदेरे, खताते, भुरण, काते, चिले

पान ५: शिंदे, किर्लोसकर, देसाई - अशोकदा यांची पोस्ट, इनामदार, जाधव, यादव, तांबोळी, मणियार-मण्यार, पारकर, दिक्षित

पान ६ : भारतातील-परदेशातील स्थलांतरीत मराठी आडनावे, मोकाशी, खेर, चौगुले

पान ७ : धामणे, शिलाहार-शेलार, भट, देवधर, गोडबोले, प्रभु-देसाई, भिडे, आंबोळे, वालावलकर

पान ८ : ठाकूर-ठाकरे-ठाकेर, बागवे - भाऊंची पोस्ट, थोरात, बडवे, किंकर, राउत, साळवे-साळवी, कदम-कदंब, चुरी

पान ९ : पेठकर-पेटकर, गुर्जर, पाध्ये, निंबाळकर, जगताप, वानखेडे, देव

पान १० : मुळे-मुळ्ये, 'वार'चा अर्थ, मुंबई परिसरातील आडनावे - दिनेशदा यांची पोस्ट,

पान ११ : शिकलगार, अग्निहोत्री, हर्डिकर-अभिषेकी-मंगेशकर, सोनार, किहिमकर, वाघ, माळगावकर,

पान १२ : विविध क्षेत्रातली प्रसिद्ध आडनावे - दिनेशदा यांची पोस्ट, वणकुद्रे, सोळंकी, पारसी आडनावे, कुलवृत्तांत-मौखिक इतिहास - वरदा यांची पोस्ट, पांड-पांडे, राजस्थानी आडनावे

पान १३ : कर्णिक, गुप्ता-गुप्ते, सरदार, तेंडुलकर, बंगाली आणि विदर्भीय आडनावे, परांजपे

पान १४ : येल्लुर आणि गीर येथील आफ्रिकन वंशाचे सिद्दी, शेंडे-शेंड्ये, आडनाव लावण्याची प्रथा - चिनुक्स यांनी दिलेल्या लिंक्स, केळकर, साठे-साठ्ये, मठाधिकारी, धडाम

पान १५ : चित्पावन ब्राह्मण, गोत्रे, आडनावे व इतिहास, तंजावर मराठी आडनावे, भंडारी, पाटणकर

पान १६ : श्रोत्रिय, ठाकर, समर्थ, पाठारे प्रभु आडनावे, वाडवळ आडनावे, हातीवलेकर, धडाम, भाट, अधिक तंजावर मराठी आडनावे, विश्वासराव

पान १७ : पुणतांबेकर, घाटपांडे, प्राचीन मराठीचा शब्दकोश - चिनुक्स यांची पोस्ट, ठोमरे

पान १८ : ........ अपुर्ण...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शिंदे या नावाची व्युत्पत्ती ठावूक नाही पण हे खुप जुने आडनाव आहे. महिकावतीच्या बखरीत १२ व्या शतकात लढवय्या हरबाजी शिंदे याचा उल्लेख येतो.

महेश, किर्लोस असं गाव आहे कोकणात. सिंधुदुर्गात. Happy

लिंब्याच्या पोस्टचा निषेध. एखाद्याच्या अभ्यासाची अशी खिल्ली उडवणं यात आपला पालथा घडा दिसतो.

असो.

"देसाई" इथे लक्षणीय संख्येने दिसत आहेत. सबब या आडनावाविषयी काहीसे जादाचे.....

गुजराथ प्रांतात 'देसाई' या आडनावाचे प्राबल्य अगदी 'पटेल' यांच्या तोडीचे आढळते. त्याला कारण म्हणजे समस्त 'देसाई' हे भरभक्कम असे जमीनदार....लॅण्डलॉर्ड, त्यामुळे सधन आणि मग परत त्यामुळेच सावकारी अंगी भिनलेली. गुजराथ मूळातच नोकरीपेक्षा उद्योगधंद्याशी निगडित असल्याने कोणत्याही प्रकारच्या धंद्यासाठी बिजभांडवल 'देसाई' समाजाकडून त्या धडपड्यांना पुरविले जात असे. मग तो उद्योजक यशाचा पहिला पेढा श्रीकृष्णाला दिल्यानंतर दुसरा 'देसाई' ला देत असे. तो प्रघात आजही आहे.

सावकारीच्या दबदब्यामुळे देसाई मंडळीना ग्रामसभा चालविण्याचेही हक्क मिळाले. जमीनीचे व्यवहार तर देसाईंच्या सहीशिक्क्यानेच होत.....'देसा = जमीन' असाही अर्थ आणि 'स्वामी = मालक' असा अर्थ....स्वामीतील 'ई' कार पहिल्या 'देसा' ला जोडला गेला...आणि तयार झाले उपनाम 'देसाई'....तिच आडनावाची निशाणी बनली. गुजराथमधील तमाम नागर ब्राह्मण समाज 'देसाई' आडनावाचा आहे....जे पटेलाना शह देतात.

महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास, मुघलांनी आणि पुढे इंग्रजांनी ज्या घराण्याला महसूल कर वसूलीचे अधिकार दिले ती घराणी 'देसाई' आडनावाने ओळखली जाऊ लागली. "देसाई पुढच्या आठवड्यात गावात येणार आहे..." अशी सूचना कोतवालीकडून गावकामगार पाटलाला मिळाली की समजायचे = महसूल वसुली अधिकारी येणार आहे. त्यामुळे जी व्यक्ती या कामाला नियुक्त असे तिचे मूळचे आडनाव वेगळे असले तरी त्या आडनावाला ".....देसाई' चे शेपूट आपोआप लागू लागले...उदा. कोकणातेल सावंत-देसाई, राणे-देसाई, बेळगावचे टिकेकर-देसाई इ.

मुस्लिम 'देसाई" यांची पाळेमुळे खणली तर ही मंडळीदेखील मुघल साम्राज्यातील महसूल वसुली अधिकारी लोकच होते. कालांतराने ते उद्योग बंद झाल्यावर बरीचशी देसाई मंडळी इथल्या मातीत, उद्योगात मिसळून गेली आहेत. मांसमच्छी याच्या जोडीने ज्याला आपण 'भंगार' म्हणतो अशा "स्क्रॅप ट्रेड' मध्ये तसेच ट्रक वाहतुकीत, बिलोरी काचसामान कारागिरी, पतंग, पानमसाला अशा धंद्यात बहुतांशी मुसलमान 'देसाई' आपणास सापडतील.

अशोक पाटील

आईच्या माहेरुन ती सोनवणे . हे आडनाव पण महाराष्ट्रात सगळ्या जाति धर्मात आढळते. अगदी देसाई आडनावाप्रमाणेच.

ह्म्म वर्तक हे आडनाव पण असंच कोकणातलं वतनदारीशी निगडीत असावं.
कोब्रा आणि पाचकळशी असं दोघांच्यात असतं.
तसेच सगळे वर्तक कोब्रा एकाच गोत्राचे नसतात.

होय नीरजा.. पाचकळशी... खरतर सोमवंशी क्षत्रीय पाठारे / पाचकळशी यात वर्तक, राउत, सावे, चुरी, चौधरी, चोरघे, घरत अशी आडनावे येतात.

मला वाटतय दीक्षित आडनावाचा इतिहास मोकिमि ने पहिल्याच पानवर लिहिलाय.

हेडर लवकरच अपडेट करावे लागणार आहे. धागा सुसाट जातोय... आजतरी.

सगळीच माहिती इंटरेस्टिंग आहे. Happy

आमचे सासरचे आडनाव काणे. एकदा मंगलोरात पोस्टमन आला तर मी वरच्या मजल्यावर (तिथे एक कॅथलिक फॅमिली रहायची) पाठवला. "इथे मि. केन म्हनून कोणी राहत नाही" हे सांगून!!!!!

हो पण वर्तक हे कोब्रांच्यात पण आहे. माझं आजोळ आहे.
आणि आमच्याकडे पत्रिका बित्रिका बघून सगोत्र नसलेल्या कोब्रा वर्तकांची एकमेकांशी लग्नेही झालेली आहेत. Happy

Atree...>>>>गामा तुला माबोचापुनाओक ही पदवी बहाल... Wink

रोहन..........इनामदार हे नाव मुसलमान मधे पण आहे...........मराठ्यांमधे पण आहे आणि ब्राह्मणांमधे सुध्दा आहे...मल्टीस्टारर आडनाव Happy

खंडागळे

होय उदय.... इनामदार हे देखील वतन इनाम मिळालेले लोक होते. पुर्वीचे जमिनदार. Happy त्यांना शासकीय अधिकार होते का हे मला ठावूक नाही.

यस नीरजा... कोब्रांच्यात पण वर्तक आहे. मान्यच आहे.

रोहन, हेडरमधे पान क्रमांक घाल त्यापुढे त्या पानावर ज्या आडनावांची चर्चा झाली असेल त्यांची नावे लिही. ते शोधायला जास्त सोपे पडेल.

आमचे आडनाव जाधव हा उत्तरेकडील यादव याचा अपभ्रंश आहे असे आमचे आजोबा सांगायचे , हे खर खोट माहिती आहे का कुणाला ?

जाधव हे मुळचे यादव... मुळात महाराष्टातही खुप यादव घराणी आहेत. सर्वच यादव युपी-बिहारी नव्हेत.

मल्टीस्टारर नाही मल्टी कास्ट

माझ्या बहिणीचं सासरचं आडनाव कोडोलीकर (इनामदार) पण तिचा नवरा म्हणायचा की इनामं गेली, दारं राह्यली नुसती आता. Proud

छान धागा!
तांबोळी हे आडनाव पण हिंदू व मुसलमान दोघांमधे आढळते.
उत्तरेमधे पुष्कळदा कुलसमूह्/जात/उपजात हेच आडनाव म्हणून वापरले जाते उदा. अगरवाल, ओसवाल, जिंदाल, गुप्ता वगैरे. पण आपल्याकडे बलुतेदारी आडनावे सोडल्यास ( सुतार, गवंडी, कुंभार वगैरे) जात अथवा समूह आडनाव म्हणून वापरलेले दिसत नाही. कु़णाला आठवत असतील तर सांगा

माझे अडनांव बिनिवाले(सासरचे), माहेरचे कुळकर्णी.....माझे सासरे सांगतात आपल्याकडे बिन्नी बनविण्याचा व्यवसाय होता म्हणुन बिनिवाले अडनांव पडले, पण बिन्नी म्हणजे काय मला कळले नाही... Happy

तांबोळी हे आडनाव पण हिंदू व मुसलमान दोघांमधे आढळते.
>> इव्हन मणियार..

आणि पटेल हे मुसलमान आणि गुजराथी दोन्ही असतात.

अशोक,
आपल्याकडे इंग्रजांचा प्रभाव आडनावावर पडलेला दिसत नाही.
मला अंगोलात आल्यापासून गोव्यात आल्यासारखे वाटतेय. मावरो, पावलो, सबास्तीन, डी कोस्टा, फर्नांडो अशीच आडनावे आहेत.

इंग्रजांचा प्रभाव आडनावावर पडलेला दिसत नाही.
> एक पारकर आडनाव सोडले तर अजून दुसरे कुठले इंग्रजी आडनाव मलातरी अजुन लक्ष्यात येत नाहिये.

दा. अंगोला म्हणजे पोर्तुगिझ कॉलनी ना? मग असणारच ना..

दिक्षीत म्हणजे अकांउंटंट.... त्या त्या गावाचा/ राज्याचा हिशेब तपासनीस... म्हणजे दिक्षीत. हे आडनाव पण कर्नाटक, उत्तर, महाराष्ट्र, मेघालय इकडे कुठेही सापडतं... आपल्या कडे देब्रा, कोब्रा कोणीही असु शकतात.

मी माहेरची जावडेकर... ह्या आडनावा वरुन लहान पणी शाळेत खुप चिडवुन घेतले आहे. जा वडेकर... असे टोमणे अगदी शिक्षकांकदूनही ऐकुन घेतले आहेत. ( गम्म्त म्हणजे माझे नाव जा वडेकर आणि माझ्या पाठी बसायची ती तळवडेकर...)

मला नेहेमी प्रश्न पडतो हे नाव कसे पडले असावे ? कारण बहुतेक जावडेकर हे कोकणातल्या मामनोली गावातले. "जावडे" असे गाव ऐकण्यात नाही. गावा वरुनच पडलेले वाटते... कोणास जास्त माहित असेल तर सांगावे...

बहुतेक कर्‍हाडे आडनावे ही गावा वरुन आहेत.

दिक्षितत या शब्दाचा अर्थ ज्याला दिक्षा मिळालेली आहे असा.
कोब्रा आणि कर्‍हाड्यांच्यात पाह्यलंय मी हे आडनाव. देब्रा दिक्षित माझ्या ओळखीचे नाहीत. आणि मग गुजराथी लोकांच्यात.

उत्तरेत नैनीताल वगैरे भागातले पहाडी किंवा कुमाऊनी लोक आहेत ते म्हणतात की कुठल्या तरी युद्धाच्या वेळेला ते महाराष्ट्रातून पळून जाऊन तिकडे सेटल झाले. त्यांच्यापैकी काही आडनावे मराठी किंवा गुज्जु वाटावी अशी आहेत. वैष्णव, कलबे ही आत्ता पटकन आठवतायत ती.
(हे वैष्णव आडनावाच्या कुमाऊनी मैत्रिणीच्या कलबे आडनावाच्या मावसोबांनी सांगितलेलं. ख खो दे जा!) Happy

Pages