घरबसल्या संपर्क जगाशी साधत आहे!

Submitted by सतीश देवपूरकर on 22 December, 2012 - 09:33

गझल
घरबसल्या संपर्क जगाशी साधत आहे!
अंतर का माणसांतले मग, वाढत आहे?

ते पूर्वीचे पत्र कुठे अन् कुठे पोस्टमन?
वाट पाहणे, अधीर होणे संपत आहे!

नाव, गाव सारेच बनावट, फसवा फोटो.....
वरवरच्या शब्दांवर दुनिया डोलत आहे!

ना ज्ञानाचा, वडीलकीचा आदर उरला....
पोर शेंबडे म्हाता-याला शिकवत आहे!

रक्ताचे पाणी करुनी वाढवले ज्याला;
तोच पोरगा जाब पित्याला मागत आहे!

तारुण्याच्या धुंदीतच बापास बोललो!
तेच बोल मुलगाही मजला सुनवत आहे!!

गेलेला क्षण किंवा व्यक्ती काय परतते?
केव्हाचे मी हेच मला समजावत आहे!

देवाचा आवाज हरेकामध्ये असतो!
कुणी दाबतो तर कोणी तो ऐकत आहे!!

भीती आम्हा कुठली? सरणावर जळण्याची?
हयातभर जिंदगी अम्हाला जाळत आहे!

अलीकडे मी कमीच केले पुस्तकवाचन!
आताशा चेहरे मानवी वाचत आहे!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भीती आम्हाला कुठली, सरणावर जळण्याची?>>>
२ मात्रा जास्तय्त
<<<<<<<<<भीती आम्हा कुठली, सरणावर जळण्याची............असे करा

गझल आवडली एक दोन शेर जरा कमी आवडले

देवाचा आवाज हरेकामध्ये असतो!
कुणी दाबतो तर कोणी तो ऐकत आहे!!>>>>

या बद्दल कही मनातले............

मझ्या ताज्या गझलेत काल एक शेर सुचला होता तो असा होता(तसे ४ /५ पर्यय आहेत त्यतला एकच देतोय जो तुमच्या शेरास "टकरानेवाला" वाटतो आहे )

मी स्वतःशी बोलल्यागत बोलतो आता
आतला आवाज माझा ऐकला आहे

पण का कुणास ठावुक तो बदलावासा वाटला अन् आता असा केलाय...........

मी स्वतःशी बोलताना शब्द देशिल का
आतला आवाज माझा गोठला आहे

काही सान्गाल का सर या बाबत के असे का होते ? याचा अर्थ काय असतो ??

ठीकठाक, पण तोचतोचपणा येत आहे विचारांमध्ये! एक टाईम गॅप आवश्यक आहे अश्या वेळी. थोडे थांबून सखोल चिंतन करून मग लिहावे. घाई काहीच नाही आहे. गझल म्हणजे नुसते परिस्थितीचे वर्णन नाही हे ध्यानात घ्यायला हवे. तूर्त थांबतो.

कळावे

गंभीर समीक्षक

छान