हैद्राबादमध्ये खरेदीविषयी माहीती हवी आहे.

Submitted by सारीका on 20 December, 2012 - 01:03

हैद्राबादमधे साड्यांची लेस चांगली मिळते असे ऐकले होते याबाबत कोणास काही कल्पना आहे का? तसेच लाख आणि मीनावर्कच्या बांगड्याही छान मिळतात याची दुकानं माहीत आहे का? इमिटेशन ज्वेलरी मधे खड्यांचे दागिने कुठे चांगले मिळतात? साउथ सिल्कचे ड्रेस मटेरीयलची दुकानं कोणी सुचवाल का?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सारीका, जुन्या मायबोलीमध्ये दिपांजलीने संपुर्ण हैद्राबाद शॉपींगची लिस्ट दिली आहे, ती एकदा पहा. वरती हितगुज टॅबमधून जुन्या मायबोलीत जाता येते. Happy

सारीका,
हे पहा. मी 'हैद्राबाद shopping' असे टाकून सर्च केले.

http://www.maayboli.com/hitguj/messages/644/106058.html?1144032658

हे सुद्धा पहा

http://www.maayboli.com/node/29635.

नव्या मायबोलीमध्ये शोध असा ऑप्शन आहे, तीथे 'हैद्राबाद' लिहीले की बरेच ऑप्शन्स येतात. Happy

सारीका, कलानिकेतन वेडींग हॉल - सोमाजीगुडा (माझ आवडत ठिकाण), पटेलमार्केटमध्ये व्हरायटि स्टोअर्स (डिझाईनर साडयांसाठी), पॅटनी सेंटरला आणि अजून बरीच सिल्क साडीज ची लाईनने दुकान आहेत तिथे. नल्लीज (माझ्या घरासमोर :)).
सध्या शिल्पाराममला exhibition चालू आहे. नक्की पहा. खूप छान आहे. पुढच्या महिन्यात येणार असाल तर ईकडे ऑल इंडिया exhibition असत नामपल्लीला तिथे पण खूप छान शॉपिंग करता येते. कराचीचे ड्रेसमटेरीयल्स असतात.
चारमिनारला रमझानच्या वेळेस आपली पर्स सांभाळून जायच. खूप नविन व्हरायटी मिळतात. गुल़झार हाऊसला मोत्यांची दुकान आहेत. क्ल्लोराम ज्वेलर्स आमच्या ओळखीचे आहेत त्यांच्याकडूनच मोत्यांची शॉपिंग होते.
फक्त लाड बजार फिरायला एक पूर्ण दिवस कमी पडतो. Happy