पेन्सिल स्केचेस संबंधी माहिती हवी आहे.

Submitted by चीकू on 16 December, 2012 - 09:28

नमस्कार. मला portrait sketches मधे रस आहे. खूप वर्शांपूर्वी केलेही होते पण आता पुन्हा सुरु करायचे आहे. portrait sketches म्हणजे व्यक्तीच्या फोटोवरून काढलेले पेन्सिल मधले रेखाटन. तर मग कुठल्या प्रकारच्या पेन्सिली वापराव्यात (HB, 2B वगैरे). तसेच कशा प्रकारचा कागद वापरावा? मला वाटतं मी मागे acid free कागद वापरला होता. यासंबंधी जाणकारांचे काही मार्गदर्शन मिळाल्यास खूप उपयोग होईल. शक्यतो अमेरिकेत उपलब्ध असणारी साधने सांगितल्यास बरे होईल. धन्यवाद!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा ! अभिनंदन आणि शुभेच्छा !

आता चांगले स्केचेस पहायला मुळू देत. या क्षेत्रातले पाटील आणि आणखी काही तज्ञ ( त्या एक बाई आहेत ज्यांचा आयडी लक्षात राहत नाही पण चित्रं राहतात. अपूर्वा कि असंच काही तरी नाव आहे आयडीचं ) चांगले मार्गदर्शन करतीलच.

माझाही तोच विचार आहे. मी ८ वर्षांपुर्वी स्केचेस काढायचे. आता पुन्हा सुरु करणार.
चीकू, तू अमेरिकेत आहेस तर पब्लिक लायब्ररीत जा. तिथे sketching/drawing साठी चांगली पुस्तके मिळतील.

Michaels मध्ये हव्या त्या वस्तू मिळतील.

वर्षा, कंसराज आणि अभिप्रा या आयडींचे पेन्सिल स्केचेस पहा. आवर्जून बघण्यासारखे आहेत. तुम्हाला करायचे आहे ते portrait sketches हा प्रकार अभिप्राने केलेले खासच आहेत. तुम्हाला पाहिजे ती माहिती त्यांना विपू करुन विचारु शकता.

चीकू,

हॉबी लॉबी आणी Michaels मधे तूम्हाला सगळी साधने मिळतील, पेन्सील सोडून. खालील वस्तू वापरून पहा.

पॅड - Strathmore® 400 Series Drawing Pads ( अ‍ॅसीड फ्री )
पेन्सील - Staedtler Mars Lumograph Pencil ( h, 2h, hb, b, 2b, 4b, 6b)
नीडेड इरेजर

मायकल्स, ए सी मूरची ४०%-५०% सवलतीची कुपन्स कायम असतात. एखादा पेन्सिल सेट घ्या, बारीक काम करायला mechanical पेन्सिल (3B) वापरावी . ही एक साईट आहे http://www.fivepencilmethod.com/ इथे अजून चांगले मार्गदर्शन मिळेल, ट्युटोरिअलपण घेता येईल, youtube वर पण बरेच video आहेत, त्यांचा लाभ घ्या. सुधारणेला अंत नाही, जितके जास्त काम कराल तितका हात चांगला होत जाईल. kneaded eraser नक्की घ्या. बेसिक रेखाटन अचूक होणे फार मह्त्वाचे.