मालवणी शिकायचंय? भाग-२

Submitted by नीलू on 27 January, 2009 - 04:31

मालवणी शिकायचंय? थोडं थोडं येतंय पण आठवत नाहीये? इथे विचारा. किंवा तुम्हाला छान बोलता येत असेल तर इतरानाही सांगा.
या अगोदरचं मालवणी भाषेबद्दलचं हितगुज इथे पहा

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोयत्यान रानडुक्कर मारुक जमला नसता. गावात जावान कोणाक बोलावान आणुकय जमलां नसता. सागोतीच्या आशेन तोंडात पाणी इला असला तरी एकट्यान रानडुक्करासमोर जावुच्या कल्पनेन तोंडचा पाणी पळालेलां. शेवटाक धीर करून जीवा फुडे झालो. लपान छपान काय व्हयना तो डुक्कराच्या बरोबर मागे इलो आणि पाठचे दोनव तंगडे उचलान तेणां घट्ट धरल्यान. अचानक झालेल्या हल्यान डुक्कराचा नाक पाण्यात गेला. नाकातोंडात पाणी गेल्यान त्याचो श्वास गुदमरलो असतलो. पुढचे दोन पाय चिखलात असल्याने त्याका कायच करुक येईना.....

डाफल्या, तुझां असा काय? Happy

ह्या मास्तरान लिव्ल्यान हय्सर... माका काय एक कळणा नाय. Lol

डाफल्या .... अगो मालवणी पध्द्त... माका इनको नायतर इनलो, भावाशीक इवलो नायतर इवको अशेच हाक मारीत लोक....

इनलो..

Lol

झाड हलवल्यावर रातांबे फटाफट खाली पडू लागले. लाल पिवळ्या रातांब्यांचा सडाच पडला. हातातली काठी बाजूला ठेऊन त्याने बायकोला हाक मारली. टोपली घेऊन ती लगेच पुढे झाली. आता दुपारपर्यंत सगळा वेळ रातांबे वेचण्यात जाणार होता. सकाळीच भाकरी खाऊन ते निघाले असले तरी दुपारच्या जेवणाची सोय करायलाच हवी होती. हातातले काम टाकून घरी जाणे शक्य नव्हते.

'धनी, तो फणस पिकलेला दिसतोय. जरा ढकलून टाकलात, तर दुपारचे जेवण इथेच होईल," ती म्हणाली.

झाड हलवल्यावर रातांबे फटाफट खाली पडूक लागले. लाल पिवळ्या रातांब्यांचा सडोच पडलो. हातातली काठी बाजूस ठेऊन त्याने बायलेक साद घातली. टोपली घेऊन ती बेगीना पुढे झाली. आता दोंपारापातुर सगळो येळ रातांबे वेचुक जातलो. सकाळीच भाकरी खाऊन ते निघाले असले तरी दोंपारच्या जेवुची सोय करुकच हवी होती. हातातला काम टाकून घरी जावुचा शक्य नव्हता.

'धनी, तो फणास पिकलेलो दिसता. जरा ढकलून टाकलात, तर दोंपाराचा जेवण हयसरच होतला," ती म्हणाली.

===================
माझ्या तुमच्या जुळता तारा
मधुर सुरांच्या बरसती धारा

लाल पिवळ्या रातांब्यांचो सडोच पडलो.

बाकी सेमच सतिशाक कॉपी करतंय. Happy

अहो एकाच भागात खूप धडे झाले मालवणीचे. अशाने नवीन शिकणार्‍याला अवघड जाईल. नवीन धागा उघडून नवीन धडा (भाग -३) सुरु करा.

बरं झालं अ‍ॅडमिन आज तुम्हीच आलात इन्स्पेक्शन ला...:अओ:
कुणि शिकवतच नाहिये.. एकच मास्तर बिचारे.. सारखे भाषांतर करूक सांगतंत आमका कंटाळो येता मगे..

पांशासु :मिया आजच हयसर लिवणार होतंय..
आमचो शब्द संग्रह वाढवा..म्हण्ये वाक्प्रचार शिकवा..मालवणीचे व्याकरण शिकवा.. झालंच तर प्रांताप्रमाणे भाषेत होणारे बदल सांगा... आणि अजुन बरंच काही...पाशास.

एक ((अती))आगाउ विद्यार्थीनी Happy

चला आजपासून मास्तर निवॄत्त.... Sad

( विद्यार्थानी मास्तराक Dismiss करून टाकल्यानी ...)

विनय Happy

काय ह्या मास्तरानु? डिसमिस ? शाळा कशी चालतली मगे?
आमका शिकवा .. आमका शिकुचा हा Happy

>>>>पयली समजावणी.........
मालवणी हि मराठीचीच धाकटी भयण. फक्त कांय शब्द गावधाटणीचे, कांय शब्द मराठीतले पण तेंची रूपा थोडी येगळी ह>>>>>>> हे बाकी बरा लिवला. भाषा संवादाचे साधन असा हे विसरुन मारामारी चे साधन होऊ घातलाव आजकाल.

मला पण शिकायचे आहे. आज पासून जॉइन होणार. त्याबदल्यात मी तुम्हाला हैद्राबादी हिंदी शिकवेन
क्या बोल्ते बेगमों नवाबों? सुकूनसे जवाबां देना. मै इदरीच बैठेसो हूं.

अरे वा मामी तुमका पण मालवणी शि़कीनसा वाट्ला Happy येवा येवा शाळेच्या भायेर कित्या बसलास आत येवा Happy
गजालीवर नेहमी येशात तर उजळणी पण जायत.
त्या बदल्यात हैद्राबादी हिंदी बोलेनुकु नक्की आवडेंगा Proud

हयसर मालवणी शिका . हैद्राबादीसाठी येगळो बाफ करुया सगळ्यांसाठी , कसा ?

Pages