विमला ठकार

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 12 December, 2012 - 14:05

ज्ञानेश्वरानंतर मी प्रेम केले
ते विमालाजींच्या शब्दावर
हृदयात ते कोरून ठेवले
पुन:पुन्हा मस्तकी धरले
अर्थातच त्यांना ते
कधीच आवडले नसते
हे मला पक्के ठावूक आहे
तेवढे मी त्यांना जाणले आहे.

त्यांचे शब्द धारधार
जातात अगदी खोलवर
चिरत अंतकरण आत
उकलत जन्मांचे संस्कार
अमाप प्रेम, अपार करुणा
ओतप्रोत भरलेली त्यात
वाचता वाचता डोळ्यात
कितीदा आसवे ओघळतात
मेंदूत भूकंप होतात
प्रतिमा तुटून जातात
ती आसवे सुखाची असतात
आणि सुटकेचीही असतात
हरपलेले श्रेय सापडल्यामुळे
झालेल्या आनंदाची असतात .

काहीही अधिकार न गाजवता
मैत्रीचा ,स्नेहाचा स्पर्श न सोडता
आधार देतात प्रत्येकवेळेला
नाकारत आश्रय उदात्त
सांगतात उभे राहायला .

असे निर्मळ नम्र सशक्त
अव्यक्ताच्या दाराशी
नेवून ठेवणारे शब्द
ज्ञानरायांशी नाते सांगणारे
संतावर प्रेम करणारे
खडसावून कान धरणारे
मायेने पोटाशी धरणारे
या शब्दांवर प्रेम न करणे
हा करंटेपणा नाहीतर काय
इतकी ओजस्वी,
इतकी स्नेहल ,
इतकी स्पष्ट हि वाणी
जीवनात ध्यानाचे वरदान
घेवून न आली तर
अगा तू वाचलेस नाही
असे म्हणावे लागेल

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझी हि कविता वाचून जर कुणाला विमला ठकारांची पुस्तके वाचायची इच्छा झाली तर प्रभुकृपा झाली म्हणावे लागेल.नेट वर त्यांचे काही इंग्रजी साहित्य आहे, पण ते खूप कमी आहे. ढवळे प्रकाशनने त्यांची बरीच पुस्तके छापली आहेत . काही इरसाल आणि अतिशय बुद्धिवान मित्रांना विनंती आधी विमालाजींचे एखादे पुस्तक वाचावे मग प्रतिक्रिया द्यावी.( कृपया प्रभूकृपेची ग्यारंटी मागू नये )

क्षमस्व.!!! आपण लिहिले आहे त्या व्यक्तीचे फक्त नाव ऐकल्या ऐकल्यासारखे वाटते अहे पण अधिक माहीती नाही
त्यामुळे आशय-विषयासोबत रीलेट न करू शकल्याने कविता या नात्याने रचना नाही अवडली पण जे लिहिलेत ते अगदी अंतःकरणापासून आहे हे जाणवते आहे

धन्यवाद

माझा वरील प्रतिसाद लिहिणे चालू असताना आपला प्रतिसाद आला होता आत्ता पाहिला
दोन्ही प्रतिसाद असंबद्ध वाटू नयेत म्हणून हा आत्ताचा लिहीत आहे
माहीतीसाठी धन्स

वैभव ,महेश, शशांक,,धन्यवाद .
कविता या नात्याने रचना नाही आवडली.>>>>>>>>>>>>शक्य आहे ,कारण लिहतांना ते भान नव्हते .
पण जे लिहिलेत ते अगदी अंतःकरणापासून आहे हे जाणवते आहे >>>>>>>>>> यासाठीच !
कोण आहेत विमला ठकार>>>>>...यांचे आत्मोल्लास पुस्तक मिळाले तर पहा .गुगल मध्ये vimala thakar टाईप केल्यावर खूप माहिती मिळेल पण इथे जरूर पहा http://www.enlightennext.org/magazine/j19/vimala.asp मला त्यांचे लेखन आवडले ते वैज्ञानिक पातळीवर आहे हे जाणवल्यामुळे .अर्थात भावणे हे हि महत्वाचे .

मला वाटतं, विमला ठकार आपल्याला विचार करुन आपले उत्तर आपल्यालाच शोधायला प्रवृत्त करतात. साध्या सुध्या जगण्यामध्येही अध्यात्म कसं बाणवता येईल आणि त्यातुन समाधान कस मिळवता येईल हे सहज कळेल असं सांगणं हे त्यांच मोठेपण आहे. मला वाटतं ह्या शब्दांवर प्रेम करण्यापेक्षा ते समजण्याचा प्रयत्न करणं ( सोपं वाटलं तरी ते पुर्णपणे समजणं आणि अंगीकारणं , मला तरी अवघड, - अशक्य नाही - वाटतं) हे कुठे तरी कवितेत यावं असं वाटलं.
अर्थातच हे माझं अज्ञान्याचं मत आहे, राग मानू नये.
त्यांचं " जगावेगळं अध्यात्म" सर्वांनीच जरुर वाचावं.

चाऊ,एकदम बरोबर,,तुम्ही ते वाचाले म्हणूनच हे लिहू शकला .माझे हे प्रेमाचे बडबडणेही विमालाजींना आवडले नसते .पण काय करावे ...लिहीतच गेलो.काही कविता ठरवून लिहणे अवघडच.