शब्द असा पाळलास!!!

Submitted by मुग्धमानसी on 12 December, 2012 - 02:47

आज तुला भेटण्याची
पुन्हा लागलीसे आस,
आज पुन्हा बिछान्यात
फक्त तुझे भास भास!!

किती प्रहर लोटले
गेला उलटून दिस,
माझ्या भरल्या डोळ्यांना
कुठे दिसला नाहीस...

नको इतक्यात अशी
इथे फिरवूस पाठ,
रात्र अजून चांदणी
उष्ण अजूनही श्वास...

किती बोलले बोलले
चार भिंतींनी ऐकले,
मला कळलेच नाही
कधी उठुन गेलास...

तुला समजले नाही
काळवेळाचे संकेत,
अवेळीच असा कधी
काय बरसे पाऊस...

आता माझ्या ओटिपोटी
तुझा हुंकार घुमतो,
मला सोबत देण्याचा
शब्द असा पाळलास!!!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बापरे काय लिहिलय्त तुम्ही!......... आपबीती नाहीये ना ..,,,स्वानुभव ? होप्स...... फक्त काव्यानुभवच असावा !!
जबरदस्त चटका लावलात ............

कवितेस _/\_!!

@ वैभवः स्वानुभव? इतका नका हो विचार करु.... कविता आवडली ना? असेच प्रोत्साहन देत रहा... गरज आहे. Happy

@ निंबुडा: पोतडीत बरंच काही आहे. आजवर एवढे प्रामाणिक (आणि सहनशिल Happy ) श्रोते मिळाले नव्हते. आता काढते एकेक बाहेर...

@ भारती व पाटीलः धन्यवाद!!!

Happy