नाळ...(भाग २)

Submitted by स्मिता द on 12 May, 2009 - 07:04

चार महिन्यासाठी गेलेल्या परागचे अजुन चार महिने ,अजुन चार असे करत करत दोन वर्षांसाठी येणे लांबले. मग प्राचीलाच त्याने तिकडे बोलावुन घेतले. आत तर प्राची ही गेली घर अगदी खायला उठायचे सुधाला. घरात दोघेच सुरेश अणि सुधा. सुरेशचे रुटिन नेहमीप्रमाणेच चालु होते , एकटी पडली होती ती सुधा. पुर्वी प्राची मुळे रोज परागची खबर तरी मिळायची.हल्ली येतो फोन पण चार पाच दिवसात.त्यालाही काम फार असतं म्हणे अणि परत वेळा जुळायला हव्यात ना.
"कसे आहेत दोघ ही कोण जाणे.ईथे होती तेव्हाही फारस बोलायचीच नाही सतत तिच्या गोतावळ्यात, त्या मैत्रीणी, आई आणि दादा. एका घरात राहुन फार बोलायच नाही? परागला सांगायची तर सोयच नव्हती ..एकतर तिकडे ईतक्या लांब आणि त्यातुन हल्ली त्याला हि तीचाच पुळका फार..आत्ता आलेली बायको प्रिय, जन्मापासुनची आई विसरायची" सुधा मनातल्या मनात हजारदा हे बोलायची
आज प्राचीचा फोन आल्याआसुन सुधाला काय करु आणी काय नको असे झाले होते. प्राची आई होणार होती. तिच्या परागच्या बाळाची आई.. सुधा आजी ..काय सुखद बातमी होती ती. आ़ज ईथे असायला हवी होती जवळ.
सुरेशला सुधाने सांगीतल्यावर सुरेश हसत म्हणाला," काय मग आज्जी बाई..खुष ना आता?बरं झाल आता आम्हालाही एका आज्जींची सोबत मिळणार"
यावरसुधा हसुन म्हणाली, " हो तर आजोबांना आता आजीचीच सोबत लागणार."
किती दिवसांनी अगदी मस्त आनंदात होती सुधा, तिला आ़ज प्रकर्षाने वाटले कि जावे त्यांच्या कडे ऊडत. दिवस मग असेच पंख लावुन उडायला लागले. रोज प्राचीची चौकशी करणे..तिला काय हव नको ते विचारणे, ईथुन ते पाठवता येत का ते बघणे हा रोजच आवडता उद्योगच झाला सुधाचा.प्राची कधी स्वत:हुन काही सांगायची नाहीच, विचारल तर म्हणायची आईला सांगीतले ती म्हणाली पाठवते. का असं करते ही मुलगी ?सुधाला कायम प्रश्न पडायचा. मी परकी का आहे?प्राचीचे डोहाळे ऐकले कि तिला परागच्या वेळेची तिला लागलेल्या डोहाळ्यांची आठवण व्हायची.. आणि मग ते कसे पुरवता येतील याच्या धडपडीत सुधाचे दिवस मस्त जायला लागले. प्राचीची आई जाणार होती तिच्या कडे बाळंतपणा साठी. सुधाला आतुन खुप वाटत होते कि आपल्याला पण बोलवावे पराग ने पण तो काही बोललाच नाही. "बायकोची आई हवी स्वत:ची नको असते या मुलांना. जाउ देत.."अस मनाशी म्हणुन सुधाने सगळ आतल्या आत गिळल. प्राचीची तारीख जशी जवळ जवळ यायला लागली तसा एक एक दिवस सुधा नुसता मोजुन काढत होती..अखेर आला परागचा फोन "आई..मुलगा झालाय.तु आज्जी..." पुढच काही ऐकुच नव्हत येत सुधाला. आनंदाने डोळे भरून वहायला लागले.
सुरेश ने ते बघुन विचारले" अगं काय झालय काय उभी आहेस आणि फोन नुसती घेउन ? बघु दे ईकडे" सुरेश ने बातमी एकुन अगदि हसत हसत फोन ठेवला आणि म्हणाला" अहो आजी बाई पेढे द्या आता.. सुधा ,परागच्या वेळेस झाला त्यापेक्षा आ़ज मला जास्त आनंद झालाय..आपला नातु आलाय या जगात..व्वा"
सुधाने सगळीकडे पेढे वाटले. परागने काही फोटो पाठवले बाळाचे. मग एक नविन चाळाच सुरु झाला सुधाचा रोज आपले ते फोटो बघत बसायचे आणि अगदि परागसारखा दिसतो नाही असे एकदा तरी म्हणायचे.... गप्पांना विषय पण बाळच.
एक दिवस बोलत बोलत सुधा म्हणाली, " त्याचे नाव काय ठेवावे हो?"
सुरेश म्हणाला'" ठरवुयात आपण सगळे मिळुन. ती दोघ काय म्हणतात ते बघायला हवे. शेवटी बाळ त्या दोघांचे न"
" हो पण बाळाचे नाव मीच ठेवणार. आजच विचारते परागला नावाचे येउ देत फोन त्याचा"
दुसर्‍या दिवशी परागचा फोन आला तेव्हा सुधा म्हणालीच त्याला, " काय रे नाव काय ठेवायचे"
" अगं आई प्राची म्हणतेय केविन ठेवुयात. कसे वातते. मला तर आवडले आणि हो एक व्हीडीयो क्लिप पाठवतोय मी त्याची ती बघ"
"हं ..छान आहे" म्हणुन सुधा गप्प बसली पण अजुन एक ओरखडा उठला गेलाच मनावर..
" मी तर त्याला श्रीरंगच म्हणणार कोणी काही म्हणो "असे मनोमन ठरवुन सुधा कामाला लागली.
पण केविनच्या त्या व्हीडियो क्लिपच जणु वेडच लागले सुधाला सारखी बघत बसायची. अगदी भुतकाळात जावुन पोहोचायची सुधा. परागच जणु परत लहान झालाय असे वाटायचे तिला. गुलाम दिसायचाही अगदी पराग सारखा, हसायचाही तसाच ईवली जिवणी रुंदावुन. कधी बघायला मिळतोय आता कोण जाणे. आत सुधाच परगल एकच प्रश्न सुरु झाला कधी येताय आता? एक दिवस परागने सांगीतले " आई पुढल्या महिन्यात येतोय" सुधाला अगदी आकाश ठेंगण झाल. माझा पराग येणार , केविन येणार. काय काय करायचे आणि काय नाही. बारस कधी ठरवायच? कोणा कोणाला बोलवायच एक न दोन..बाळाने परत सुधाला जणु तरूणपणात नेल होत..परागच्या बाळलीलांची अनुभुती मिळत होती तिला परत नव्याने केविनच्या त्या व्हिडियो क्लिप बघुन.
पण या उत्साहात मधेच चाटुन जायचा विचार मनात" मला पहिल्यांदाच बघतोय केविन. आता ओळखायला लागला असेल माणसे मला कसा काय ओळखणार? नाही आला माझ्याजवळ तर..आता त्याच्या सवयीची ती आजी असेल. "
मग हळुहळु घरच केल त्या गोष्टीने मानात सुधाच्या कि मुलगा दुरावलाच आता नातु नातु म्हणतेय मी ईतकी पण येतोय की नाही माझ्याजवळ कोण जाणे? कधी बघीतलीच नाही ही आजी तर काय. आणि प्राचीने थोडेच माझे फोटो दाखवुन ही पण तुझी आजी असे सांगीतले असेल त्या जीवाला. त्याला काय अजाण जीव आई सांगेल ते कळणार त्याला."
अखेर सुधाने ही भिती सुरेशला पण बोलावुन दाखवली " अहो मी ईतकी नाचतेय पण बाळ येईल का हो माझ्याकडे?"
"अगं काय हे. का नाही येणार? फार तर पहिल्यांदा बघतोय म्हणुन लगेच नाही येणार. काही ही विचार करत बसतेस झाल"
पण सुधाच्या मनातुन काही तो विचार जात नव्ह्ता. विचारांचा भुंगा तिला सतत पोखरत होता. मुलगा नाही राहिल माझा, आता नातु पण माझा नाही. " येणार त्याआधीची रात्र सुधाने काहीशी या विचाराने धास्तावुनच जागवली.
परागला आणायला सुरेश गेला होता. सुधाची नजर सारखी फाटकाकडे ..खूट आवाज झाला तरी धावत जायची दरवाज्यात. आणि खरोखर हार्न वाजला गाडीचा. " अगं बाई आला पराग" म्हणत सुधा लगबगीने त्यांच्यावरून तुकडा ओवाळुन टाकण्यसाठी धावली. प्राचीला गाडीतुन उतरताना पाहीले.." ओ हो अगदि परागच दुसरा..किती गोड दिसतोय" अस म्हणत सुधा पुढे झाली. डोळ्यातल्या पाण्यात सगळ पुसट पुसट व्हायला लागले. लटपटत गेली सुधा जवळ आणि बघितले केविन कडे... ती हसली तशी केविन ने गळामिठी घातली तिला..."ओ...माझा सोन्या "'तो म्हणत सुधाने त्याला कवटाळले. पराग, प्राची आणि सुरेश तो आनंदसोहळा हसत बघत होते..
केविनला घेउन पराग प्राची जवळ जात सुधा मनाशी पुटपुटली " नाळ अशी तुटत नसते"

गुलमोहर: 

गोष्ट आवडलि....
आजि होण्यचा आनन्द छान लिहिल आहे...

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आयुष्य सुन्दर आहे, त्याला आणखि सुन्दर बनवुया....!!!!!
Donate Eye - Bring Light to Blind...!!!

हा भाग मला जरा घाई गडबडीत उरकल्यासारखा वाटला.

दुधापेक्षा सायीवर जास्त प्रेम यामुळेच असतं...... कथा आवडली..... कल्पना

छान कथावस्तू. पण थोडी घाई झाल्यासारखं मलाही वाटलं. सुरेख फुलवता आली असती असं वाटतयं.
.........................................................................................................................

http://kautukaachebol.blogspot.com/

धन्यवाद कनु, सायोनारा, कल्पना, अर्चना, कौतुक..:)

कल्पना कौतुक..कथ मी घाईत उरकली नव्ह्ती पण वाटतेय का तशी? पहिल्या व्भागात सुधेचे अंतरंग स्प्ष्ट झाले होते आणि सुने बद्दल असणारी अढी, त्तिने आपला मुलगा आपल्या पासुन दुर नेला, नाळ तुटली गेली असा एक ग्रह केल होता अणि मला वातत बहुसंख्या सासवांचा होत असाव..आपला मुलगा नविन आलेल्या सुनेचे ऐकतो..म्हणजे आपल्या हातातुन गेला अस एक किल्मिष असते मनात त्यंच्या पण जेव्ह नातु येतो तेव्ह ही सगळी पुर्वग्रह दुषीत मतं गळुन पडतात आणि नातवाच्या ओढीने जाणवते कि अरे नाळ अशी सहजा सहजी तुटत नसते...

अर्थात घाई झाल्या सारखे वाटत असेल तर अजुन फुलवायचा प्रयत्न करुन बघेल.

छान आहे कथा...:-) ..पहिला भाग अपूर्ण वाटत होता..दुसरा भाग टाकल्यामुळे मस्त वाटते कथा.

----------------------------------------------------
If you follow all the rules, you miss all the fun!
http://www.mokaat.blogspot.com/

कथा एका आईचे अंतरंग सांगते, छान आहे. पण केविन काय??? असं नाव का? हसु आलं.

बासुरी मस्त मस्त झालेय गोष्ट! तिची अस्वस्थता... तंतोतंत उभी केलेस... आणि शेवटचा भाग थोडासा घाईत उरकल्यासारखा मलाही वाटला पण बाकी कथा उत्तम!