मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी

Submitted by उदयन. on 20 January, 2011 - 00:00

आज पासुन देशात मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी लागु झाली आहे..........

इथे आपण जर मोबाइल नंबर बदलणार असाल तर कोणत्या नेटवर्क मधुन कोणत्या नेटवर्क मधे जावु इच्छीता......आणि कोणत्या कारणास्तव............?????? हे कृपया इथे लिहावे.....जेणे करुन त्या नेटवर्क वाल्यानां कळेल........त्यांची चुक काय आहे ते.........

मी.........reliance GSM TO vodafone or airtel होणार आहे.............reliance चे नेट्वर्क फार खराब आहे......त्याच प्रमाणे त्यांचे कस्ट्मर केअर पण काही उपयोगाचे नाही.......आणि कधी हि कोणत्या ही कारणाने कुठ्ल्या ही सेवेचे पैसे कापुन घेतात जी आपण कधी घेतली हि नसते..........

आपण....................

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

MNP टेक्निकली कसे चालते कुणाला माहिती आहे का? सध्या प्रत्येक ऑपरेटर ला नंबर्स चा ब्लॉक अलोकेट केलेला असतो आणि त्यातल्या पहिल्या काही डीजीट्स वरुन कॉल स्विचिंग होते.
MNP नंतर जेव्हा नंबर्स ची सरमिसळ होईल तेव्हा कॉल स्विचिंग कशाच्या आधारवर होईल आणि कसे?

बाळू जोशी,
तूम्ही रिलायन्स च्या पुणे सर्कल मध्ये आहात म्हणुन ! अन्यथा रिलायन्स ची ही सगळीकडे बोम्बच आहे !
आणि एक गोष्ट सगळ्यांनी नोट करा की जर तूम्ही 3-G Facilities घेत असाल तरच MNP तुम्हाला थोडे फार ऊपयोगाला येईल (DOCOMO, Airtel यांचे 3G plans चांगले आहेत), अन्यथा Uhoh

प्राची,
अनुमोदन ! BSNL ची सेल फोन सेवा खरच छान आहे, GPRS पण अगदी झकास चालते! नेटवर्क कव्हरेज ही चांगले असते! मुंबई - पुण्याच्या व्यतिरिक्त (तिथे MTNL असते) सगळी कडे BSNL हा सर्वात चांगला पर्याय आहे !

bsnl चे फोन.................जेव्हा हि लावा कायम एन्गेज येत असतात.....

मुंबई - पुण्याच्या व्यतिरिक्त (तिथे MTNL असते) >>>> पुण्यात BSNL आहे .MTNL मुम्बई आणि दिल्लीत असते

bsnl चे फोन.................जेव्हा हि लावा कायम एन्गेज येत असतात.....
>>> उत्तम सेवॅमुळे लोक बोलतच राहतात. बिलेही अगदी कमी येतात.
.

मी पुण्यात बीएसएनेल, व्होडाफोन, एअरटेल, आयडिया इ. सारे वापरून बघितले आहेत. सगळ्या ऑपरेटर्सची थोड्याफार फरकाने सारखीच लायकी आहे. जोवर फक्त तुंबड्या भरण्यासाठी कपॅसिटीपेक्षा जास्त कनेक्शन्स वाटले जाऊन लोकांच्या माथी नेटवर्क कंजेशन मारले जाते आहे, तोवर पोर्टेबिलिटीसारख्या योजनांचा शून्य उपयोग. ऑपरेटर बदलण्याचा उपद्व्याप म्हणाजे फक्त आगीतून फुफाट्यात.

कोणी एअरटेलचा ४ जणांच्या परिवारासाठी चांगला प्लॅन सुचवू शकेल का ?
३ जण पुण्यात आणि एकजण कायम रोमिन्ग मधे असणार आहे.
प्रीपेड किंवा पोस्टपेड काय योग्य राहील ?

जर एकजण कायम रोमिंगत असेल तर एस्टीडी स्वस्त असलेला प्लॅन पहा. माझ्या मते तुम्ही सांगितलेल्या सिच्युएशन मधे प्रीपेड योग्य राहील. कारण प्रीपेडात हवं तसं रीचार्ज केलं की काम भागतं. पोस्ट्पेड ला कमीतकमी २४ तास लागतात कुठलीही वॉईस सर्वीस चालू व्हायला.
एक उदा-
४ एका घरातले लोक. १ नेहेमी रोमिंग. = ३ लोक लोकल.
वर दिल्याप्रमाणे असेल तर फक्त १कानी स्वस्त एस्टीडी घ्यावा. त्याच नंबरनी भरपूर वेळ बोलावं; सगळ्यानी मिळून. बाकी लोकांनी अगदीच गरज असेल तरच दुसर्या नंबर वरून फोन/एसएमएस करावा...

जर सगळ्यांकडे डेटा एनेबल्ड फोन्स असतील तर ३जी वरून सरळ स्काईप, फेसटाईम वा अन्य अ‍ॅप वापरून डेटा कॉल करावेत. बरंच स्वस्त पडतं. + घरी जर वायफाय असेल तर सेल्यूलर डेटा पण कमी लागेल.

योगेश, धन्यवाद,
खरेतर ३जी चा पर्याय योग्य आहे पण त्यासाठी घरी पण एक ३जी एनेबल्ड फोन घ्यावा लागेल, तसेच घरात असताना वायफायचा वापर होईल पण बाहेर असताना नाही.
रोमिन्गचे दर हे प्रीपेड किंवा पोस्टपेड दोन्हीला सारखेच असतात का ? की प्लॅन्सप्रमाणे बदलतात.
असा कोणताच प्लॅन नाहीये का की ज्यामधे दोन नंबर्स एकमेकात फ्री (किंवा अगदी कमी दरात (रोमिन्गमधे असुन देखील)) बोलू शकतील.

रोमिन्गचे दर हे प्रीपेड किंवा पोस्टपेड दोन्हीला सारखेच असतात का? >> जनरली हो... पोस्ट्पेड ला रेट्स जरी कमी वाटले तरी तुम्ही रेण्ट्ल भरताच की!

असा कोणताच प्लॅन नाहीये का की ज्यामधे दोन नंबर्स एकमेकात फ्री (किंवा अगदी कमी दरात (रोमिन्गमधे असुन देखील)) बोलू शकतील>> असे प्लॅन्स आहेत. बहुतेक सगळ्यांच ऑपरेटर्स कडे आहेत.

एअरसेल चा सिंग्नल चांगला मिळत असेल तर साधे इंटरनेट वापरुन सुध्दा व्हॉटसअ‍ॅप वगैरे....निम्बज सारखे अप्लिकेशन वापरुन बोलता येते.......... १०० रुपये महिना फक्त Wink

जनरली सगळ्यांच ऑपरेटर्स चे २जी प्लॅन्स १००/- प्रतीमाह = १ ते १.५ जीबी डेटा पर्यंत आहेत. आणि सगळ्यांच ऑपरेटर्सचे ३जी प्लॅन्स २५०/- प्रतीमाह = १ ते १.३ जीबी डेटा पर्यंत आहेत.

उदयन, अनलिमिटेड असले तरी स्पीड ३जी नसेल,
कारण तसे तर एअरसेल व्यतिरिक्त इतर ऑपरेटर्सचे प्लॅन पण अनलिमिटेडच असतात,
उदा. २५० रू. मधे १ जीबी (१ महिन्यासाठी)
जर १ महिना पुर्ण होण्याच्या आधी १ जीबी संपले तरी सर्विस वापरू शकता, त्याचे दर वापराप्रमाणे (१० पैसे प्रत्येक ३० केबीसाठी) असतात आणि स्पीड २ जी मिळतो.
एअरसेल मधे याहून वेगळे काही आहे का ?

उदा. २५० रू. मधे १ जीबी (१ महिन्यासाठी)
जर १ महिना पुर्ण होण्याच्या आधी १ जीबी संपले तरी सर्विस वापरू शकता, त्याचे दर वापराप्रमाणे (१० पैसे प्रत्येक ३० केबीसाठी) असतात आणि स्पीड २ जी मिळतो.>>> नाही स्पीड ३जी चीच अस्ते मात्र पैसे जबरदस्त लागतात... :ड