मुलांच्या उच्चशिक्षणासाठी पैशाचे नियोजन

Submitted by स्वाती२ on 17 February, 2011 - 17:23

दिवसेंदिवस भारतात उच्चशिक्षणाचा खर्च वाढत चाललाय. अगदी मेरीटवर अ‍ॅडमिशन मिळाली तरी फी, होस्टेलचे राहाणे वगैरे धरुन बराच खर्च येतो. हा वाढता खर्च भागवण्यासाठी नियोजन आवश्यक. त्या दृष्टीने मला माझ्या नात्यातील मुलीसाठी पैसे गुंतवायचेत. खास शैक्षणीक खर्चासाठी म्हणुन भारतात काही स्किम्स वगैरे असतील तर मला माहिती हवी आहे. इथे मुद्दाम विचारतेय कारण मायबोलीकर पालकांचे अनुभवाचे बोल एजंटच्या सल्ल्यापेक्षा अधिक महत्वाचे. माझ्या नात्यातील मुलगी साडेतीन वर्षांची आहे.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चिमे दरवर्षी किमान ५०० तरी भरावे लागतात. नाहितर दंड आहे माफक. पुढल्या वर्शी तू आदल्या वर्षीचा दंड प्लस रक्क्म टाकू शकतेस. गुंतवणूक कमी जास्त करता येते.

मला पण एक प्रश्न विचारायचा आहे पीपीफ पोस्टात काढणे बेटर की बँकेत? आणी जर समजा पोस्टात काढले ( मला आता पोस्ट जवळ आहे बँकेपेक्षा..) तर काही वर्षांनंतर घर बदलले तर नवीन ठिकाणी असलेल्या पोस्टात खाते ट्रान्सफर करुन घेऊ शकतो का?

आत्ताच ebay च्या पार्टनर्सकडून एक इमेल आली. चाइल्ड प्लानमध्ये दर महिन्याला ६३०० रु. गुंतवून रु.३३ लाख मिळवा.
तिथे क्लिक केले तर हे पान उघडले.
तिथे दिलेल्या गृहितकांत वडिलांचे वय १८ वर्षे आणि पाल्याचे वय ३ महिने आहे. Lol

मला पण एक प्रश्न विचारायचा आहे पीपीफ पोस्टात काढणे बेटर की बँकेत? आणी जर समजा पोस्टात काढले ( मला आता पोस्ट जवळ आहे बँकेपेक्षा..) तर काही वर्षांनंतर घर बदलले तर नवीन ठिकाणी असलेल्या पोस्टात खाते ट्रान्सफर करुन घेऊ शकतो का?>>>

पोस्टाचा कोअर बिझनेस गुंतवणुक हा नाही. हा त्यांचा अलाईड बिझनेस आहे. पोस्टातले गैर व्यवहार आपण नेहेमीच ऐकत असतो. आर्थेक व्यवहार हा बँकांचा "कोअर " बेझनेस आहे. सहाजिकच त्यांच्या सुविधा ह्या पोस्टा पेक्षा चांगल्या असणारच. मला तरी अत्ता पर्यंत बँकांचा अनुभव चांगला आहे. पोस्टात मेजर ब्लंडर होताना पाहिले आहे.

तिथे दिलेल्या गृहितकांत वडिलांचे वय १८ वर्षे आणि पाल्याचे वय ३ महिने आहे.>> Rofl

दिपाली बॅन्केत काढ.
ऑनलाइन ट्रान्स्फर वै बरे पडेल.
शिवाय भारतात / भारताबाहेर कुठेही गेलीस तरी ऑपेरेट करता येइल.
हे अकाउन्ट फक्त एस बी आय मधुनच निघतं.
मी पोस्टात काढलय. ते हाताने लिहुन देतात साध्या बुकात. Sad

हे अकाउन्ट फक्त एस बी आय मधुनच निघतं.>>>>

माझं तर बँक ऑफ इंडियात आहे. बहुतेक मोठ्या बँकां मधे पीपीएफ स्कीम असतेच.

जे कोणी सश्याच्या ऋद्याचे आहेत त्यांचा व इतरांसाठी सुद्धा ..

तुम्ही कोणी VPF मध्ये किंवा NPS मध्ये गुंतवत नाहीत का?

VPF हा प्रकार म्हणजे व्हॉलंटरी पि एफ. ह्यावर व्याज देखील पि एफ एवढेच मिळते.

मॅजिक ऑफ कम्पाउंडींग

दर महिन्यात समजा तुम्ही २०००० ( हे समजा आहे, माझा पगार कमी आहे,मी २०००० कसे भरू अश्या पोस्ट नका टाकू Happy ) हे २० वर्षांसाठी भरले. तर तुमच्याकडे टॅक्स फ्री रक्कम साधारण 11,530,665 एवढी रक्कम ते ही केवळ ७ टक्के दराने असेल. आणि सध्याच्या व्याज दर हा ८.५ टक्के आहे. मग विचार करा, तुमच्याकडे साधारण दिड करोड रू असतील. आणी ते हे टॅक्स फ्री !

शिवाय ह्या गुंतवणूकी वर तुम्ही ८० कलमान्वये भरावयाच्या रकमेच्या १ लाखापर्यंत टॅक्स वाचवू शकता. (टॅक्स मॅ़क्स ३०००० ने कमी होईल, दरवर्षी. म्हणजे ६००,००० वेगळेच !)

VPF चा फायदा असा की ही रक्कम तुमच्या हातातच येत नाही परस्पर कापली जाते.

NPS वर मी इथेच एका बाफवर विस्तृत लिहिले आहे. NPS मार्केट ड्रिव्हन आहे. त्यामुळे परतावा कमी जास्त होतो, पण गुंतवणूक कालावधी जर १५ वर्षे असेल तर, मार्केट सायकल्स मुळे ६ ते ७ टक्के रिटर्न पकडून चालावे. बरीच रक्कम हातात येईल. खरे तर जास्तच परतावा मिळतो पण उदाहरणासाठी सर्व गुंतवणूक कंपन्या ६ टक्के वापरतात. तीन एक वर्षांपूर्वी अगदी २० टक्के देखील वापरायचे पण नंतर खोटे स्वप्न दाखविल्यामुळे सेबीने नवीन रेग्युलेशन्स आणले.

मार्केट मध्ये जे यायला घाबरतात, त्यांनी माझे येथील मार्केट वरचे बाफ सहज डोळ्याखालून घालावेत. एवढे घाबरन्यासारखे अजिबात नाही ! मार्केट मध्ये पैसे ठेवण्याला (शेअर्स, इटिएफ इ इ) दुसरा काही पर्याय नाही! इग्नोर करन्यापेक्षा ते शिकून घ्यावे. फायदा होईल.

प्रत्येक मुलासाठी वेगळा अकाउंट ठरवून घ्यावा. आणि यातले पैसे अन्य कारणासाठी उचलण्याचा मोह कटाक्षाने टाळावा.

जोरदार अनुमोदन !

आपण राहिलो अथवा नाही तरीही मुलांच्या उच्चशिक्षणात आर्थिक व्यत्यय येता कामा नये !

मोकीमी, केदार उत्तम माहीती.
भारताबाहेर असताना VPF/ ppf असे कश्यामध्ये गुंतवता येतात का? म्हणजे मी ईकडुन गुंतवणुक चालु करु शकते का? असेल तर कोणत्या बॅंकेतुन चालू करता येईल?

आपण राहिलो अथवा नाही तरीही मुलांच्या उच्चशिक्षणात आर्थिक व्यत्यय येता कामा नये >>

अकाउंट वेगळे असण्यापेक्षाही ..

ह्या साठी १ करोड किंवा जास्त रकमेचे फक्त लाईफ कव्हर घ्यावे. साधारण आपल्या सध्याच्या वार्षिक पगाराच्या ५ पट कव्हर घेणे संयुक्तीक ठरेल. पण १ करोडचा वार्षिक प्रिमियम पण साधारण ३० ते ३५००० होईल. जो आज बहुतेक लोक ह्या ना त्या कारनाने LIC किंवा तत्सम लोकांना देतातच. प्रत्येक पगारी व्यक्तीने हे करायलाच हवे.

ही एकच (लाईफ कव्हर ) पॉलिसी घ्यावी. इतर कुठल्याही सेंव्हिग्स पॉलिसी अजिबात न घेता दर महिन्याला वेगळ्या बचतीची सवय लावली तर जास्त परतावा मिळेल.

ह्या साठी १ करोड किंवा जास्त रकमेचे फक्त लाईफ कव्हर घ्यावे. साधारण आपल्या सध्याच्या वार्षिक पगाराच्या ५ पट कव्हर घेणे संयुक्तीक ठरेल. पण १ करोडचा वार्षिक प्रिमियम पण साधारण ३० ते ३५००० होईल. जो आज बहुतेक लोक ह्या ना त्या कारनाने LIC किंवा तत्सम लोकांना देतातच. प्रत्येक पगारी व्यक्तीने हे करायलाच हवे. >>>>>>>>>>>
फक्त लाईफ कव्हर म्हणजे टर्म ईंश्युरन्स ना ?

NPS म्हणजे New Pension scheme का ? जरा विस्तृत पणे माहिती देता का ?

५२९ बद्दल कोणी सांगेल का please . आम्ही h1 वर आहोत .आमच्या मुलींसाठी आम्ही ५२९ घेऊ शकतो का ? ५२९ कसे काम करते ?

rakheesiji: Before investing in 529 plans make sure you understand the restrictions associated with it. Along with tax benefits you are required to use those funds ONLY for college/education related expenses. Since you are on H1B and in an event if you plan to go back for good then you will incur penalty along with taxes.

This might provide more information.

धन्यवाद योगीबेअर..
बॅन्केत चौकशी केल्यावर कळले होते की ग्रीन कार्ड वगैरे अजून नसल्यामुळे ५२९ मधे पैसे टाकता नाही आले तर त्याच्याऐवजी utma मधे टाकता येतात, म्हणून विचार्ले होते.

Sneha1: UTMA may provide a better option than 529 but depending on your future situation in terms of GC and citizenship and continuing to stay here permanently might have specific impacts.

1. In an event you consider to stay here for "good" then UTMA can have adverse effect on financial aids eligibility of your child.
2. Some serious legal implication in an event your child decides to act on their "rights", a rare phenomenon but we should be aware.
3. You cannot simply move money from UTMA as it belongs to your child and you are simply a custodian and this ties back to #2 above.

Its better to understand legal implications in an event they are ever exercised.

You can find more information here.

भारताबाहेर असताना VPF/ ppf असे कश्यामध्ये गुंतवता येतात का? म्हणजे मी ईकडुन गुंतवणुक चालु करु शकते का? असेल तर कोणत्या बॅंकेतुन चालू करता येईल?>>>>>मी exactly हाच प्रश्ण विचारायला log in झालो......please कोणी सागेल का??......मला BoM सोयीची आहे...

Looking for information on 2 things

Any information on investing in e-gold or e-silver through National Spot exchange?

Any long term investment option, which will give better returns, security. My PPF account has completed 15 years. I want to invest this money for long term, instead of continuing the PPF for additional 5 years blocks.

Thanks,
Ketumi

सॉरी yogibear, हे बघायला उशीर झाला.आणि धन्यवाद, सध्या तरी मी UTMA चा विचार सोडला आहे, ही पोस्ट बघूनच... Happy

भारताबाहेर असताना VPF/ ppf असे कश्यामध्ये गुंतवता येतात का? म्हणजे मी ईकडुन गुंतवणुक चालु करु शकते का? असेल तर कोणत्या बॅंकेतुन चालू करता येईल?
अनिवासी भारतीयाना पीपीएफ मधे नव्याने खाते उघडता येत नाही. निवासी असताना उघडलेले खाते १५ वर्षे मुदत संपल्यानन्तर बन्द करावे लागते. व्हीपीएफ भारतात नोकरीत आहेत त्यांच्याकरता आहे. दीर्घ मुदतीकरता इक्विटी किंवा बॅलन्स प्रकारातले म्युच्युअल फंड चांगले आहेत. १० % ते १२ % एवढा वार्षिक परतावा गृहीत धरता येईल. म्युच्युअल फंड बॅक ठेवीइतका सुरक्षित नाही. पण जोखीम नाही तर वृद्धी नाही!!

Pages