कंगवे शोधता तरी तिन्ही सांज झाली

Submitted by योग on 4 December, 2012 - 06:51

"येतो"! निरोप घेता ओठांची गाठ झाली
पावलात सावल्यांची मिठी लांब झाली..

गुंतण्याएव्हडे आता शिल्लक ना डोक्यावर
कंगवे शोधता तरी तिन्ही सांज झाली..

"आय" च्या खेळण्यांनी बाजार रंगला
"हाय" ना कुणाची गर्दीस ऐकू आली..

'विबासं' च्या पहाटेस चंद्रास कळाले
चांदणी आपली चकोरा मिळाली..

पुरविता सर्वदा बुडाचे चोचले
राजास (king) 'फिशर' ची आता व्याधी आली..

"गाडी कुठली घ्यावी" मोठाच प्रश्ण आहे
आपल्यातली अंतरे लाखात झाली..

"लहानपण बरे होते" शेवटास कळाले
डायपर बदलण्यात तहहयात गेली..

'मिडलाईफ क्रायसिस' कारण मिळाले
'अर्धवट' माणसे समाधीस निघाली..

मेकअप खाली बेमालूम लपवलेस पिंपल्स तरिही
तुला "लाईक" करण्याची आता चोरी झाली...

ही सभा ती सभा सगळीकडे सभाच सभा
'सभासद' राहण्याची सभ्य गोची झाली...

(कविता) आवरते घेण्याचे भान पाळले मात्र
निव्वळ योगा'योग' कुजबूज झाली....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>गझल आहे का ही? की मुद्दाम करताय?

आनंदयात्री,
नाहि हो मुद्दामून वगैरे नाही...टेक्निकली गझल नाही(च) हे माहित आहे.. पण फॉर्मॅट गझलेचा वाटला (मला) म्हणून ईथे टाकलिये..
कुठेही "हलवली" तरी चालेल. Happy

काही काही शेर मात्र वरकरणी विनोदी दिसले तरी मनापासून/सिरीयसली लिहीलेत बर का.. त्याचा गांभीर्याने विचार व्हावा.. म्हणजे मी केला आहे वाचकांनी करावा.. Happy

गझलेत सर्व शेर एकाच थिम वर नसतात हे माझ्या (अजूनही) पचनी पडत नाही... जसे कविता कशी एकच मुद्दा लावून धरते तसे! म्हणून मुद्दामून असे वेगवगेळे थिम असलेले शेर एकत्र करून लिहून पाहिले... ईतकच.
गझलकारांमध्ये वगैरे मी वा माझी गझल बसत नाही हे मला ठाऊक आहे.. तेव्हा सांभाळून घ्या!

गझलेत सर्व शेर एकाच थिम वर नसतात हे माझ्या (अजूनही) पचनी पडत नाही...
>>
अगदी अगदी
हजार मोदक!
पण ही गझल मलाही नाही वाटतेय (गझलेतलं काहीही कळत नसूनही Proud )

रिया बरोबरय् तुझं !! १००% सहमत

रियाची "रीsss ओढत" नसून माझ्यामनातली वाक्ये ती बोलली म्हणून सहमत झालो आहे कृ गै न Proud

मला दुसरा, पाचवा आणि शेवटून तिसरा आवडला, मिसरा छानच आहे.

एकावेळी एकच कंगवा लागतो त्यामूळे कंगवे च्या जागी कंगवा चालले असते, मात्रा बदलल्या नसत्या.

तरिही मधला ही अनावश्यक वाटतोय.

बुडाचे चोचले, जरा ग्राम्य वाटतेय.

बिबासं रात्रीच होते हि जरा अतिश्ययोक्ती वाटली, पण चंद्र दिवसाही असतोच, त्यामूळे त्याला ते दिवसा कळू शकते.

थोडी अपूर्ण वाटतेय.. हुद्दा / पेशा / पत्ता / फोन नंबर आवश्यक आहे..

( बर्‍याच दिवसांची एखाद्या गझलेला प्रतिसाद द्यावा, अशी भावना होती. आज धन्य झालो. म्हणून धन्स. )

>>थोडी अपूर्ण वाटतेय.. हुद्दा / पेशा / पत्ता / फोन नंबर आवश्यक आहे..
Happy

>>एकावेळी एकच कंगवा लागतो त्यामूळे कंगवे च्या जागी कंगवा चालले असते
करेक्ट! तरिहि अनेक कंगवे शोधले यातून मुळ विरोधाभस अधिक अधोरेखित करायचा होता..

वैकु, रीया,
हरकत नाही... कविता म्हणून वाचा Happy

अहो वैभव मला काय कळणार त्या गझल हझलेतलं? मूळात कविताच कळत नाहीत, तर गझल काय कळणार डोंबलं?:फिदी:

पण मला शब्द भावतात, आवडतात, रचना डोक्यावरुन गेली तरी. आणी तुम्ही, देवपूरकर सर, बेफिकीरजी आणी काही नामवंत गझलकार यांच्या गझला आवडल्या, तरी मी प्रतीसाद देतेच असे नाही, नाहीतर उद्या मला कुणी आशय विचारला तर काय सांगणार?

योगना मी जुन्या माबोपासुन ओळखते(वैयक्तीक नाही) त्यामुळे त्यांचे विनोदी लिखाण पण वाचले आहे.