मुलांच्या उच्चशिक्षणासाठी पैशाचे नियोजन

Submitted by स्वाती२ on 17 February, 2011 - 17:23

दिवसेंदिवस भारतात उच्चशिक्षणाचा खर्च वाढत चाललाय. अगदी मेरीटवर अ‍ॅडमिशन मिळाली तरी फी, होस्टेलचे राहाणे वगैरे धरुन बराच खर्च येतो. हा वाढता खर्च भागवण्यासाठी नियोजन आवश्यक. त्या दृष्टीने मला माझ्या नात्यातील मुलीसाठी पैसे गुंतवायचेत. खास शैक्षणीक खर्चासाठी म्हणुन भारतात काही स्किम्स वगैरे असतील तर मला माहिती हवी आहे. इथे मुद्दाम विचारतेय कारण मायबोलीकर पालकांचे अनुभवाचे बोल एजंटच्या सल्ल्यापेक्षा अधिक महत्वाचे. माझ्या नात्यातील मुलगी साडेतीन वर्षांची आहे.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यूटीआय बाँड फ़ंड ३०.११.१९९८ रोजी गुंतवलेल्या रु.१०,००० चे आज होतात रु. ३१,४५९.२३
यूटीआय मास्टरशेअर १.७.१९९४ रोजी घेतलेल्या १५ रुपयाच्या एका युनिटवर आजपर्यंत मिळालेला डिव्हिडंड :रु. ४०.६० + आजची NAV रु.३४.५५ (बोनस धरून). एकूण रु. ७५.१५ लाभांश दरवर्षीमिळालेला आहे, त्यावर कमावता आलेले व्याज हिशेबात धरलेले नाही. तसे धरून IRR = 16.63%

काही म्युचल फ़ंड योजनांचे योजना सुरू झाल्यापासून आजच्या तारखेपर्यंतचे annualised return
यूटीआय मास्टर प्लस १९९१ : १३.०६%
युटीआय इक्विटी (आधीची मास्टरग्रोथ १९९२) : ११.८१%
HDFC Equity (Dec 94) : 20.53%
HDFC MIP Long Term (Dec 2003) : 11.20%

(Last 4 figures from ValueResearchonline.com)

<< <कारण हि सगळी 'पेपर गुंतवणूक' आहे आणि मलातरी त्याचा काही भरवसा वाटत नाही> आँ? का बरे?
तोळा तोळा सोन्यापेक्षा गोल्ड फंड केव्हाही बिनधोक (चोरीचा, शुद्धतेचा प्रश्न नाही).
गोल्ड इटीएफमध्ये तसेच काही फंडांच्या ओपन एण्ड गोल्ड फंडमध्येही सिप करता येते. >>

फंडचे दिवाळे निघणारच नाही किंवा फंड वाली कंपनी घोटाळा करणारच नाही ह्याची काही खात्री देता येते का ? मला असे म्हणायचे आहे कि ह्या सगळ्या कंपन्या (फंड, बॉंड , वगैरे वगैरे ...) " liability ऑफ loss " घेतात का? जर कंपनीचे दिवाळे निघाले (उदा. AIG ,USA ) तर आपले सरकार त्यांना severance package देईल काय? अशा परिस्थितीत तुमचे सगळे पोलीसीचे फायदे तुम्हाला मिळतील काय? म्हणून मी म्हंटले होते कि "जर हि योजना पटत नसेल तर काही प्रमाणात सोने आणि काही प्रमाणात इतर गुंतवणूक करण्यास हरकत नाही."
एक लक्षात घ्या कि, जो पर्यंत तुमचे पैसे तुमच्या हातात नाहीत तो पर्यंत त्या पैशाला गृहीत धरू नये. शेवटी काय आहे, सगळ्या कंपन्या माणसेच चालवतात आणि कुणाचे डोके कधी फिरेल हे सांगता येत नाही. म्हणून आपली रिस्क diversify करावी .

म्हणून मी म्हंटले होते कि "जर हि योजना पटत नसेल तर काही प्रमाणात सोने आणि काही प्रमाणात इतर गुंतवणूक करण्यास हरकत नाही." : रिस्क डायव्हर्सिफिकेशन हा गुंतवणुकीतला महत्त्वाचा नियम आहेच. सगळा पैसा एकाच फंड हाउसकडे,एकाच योजनेत, एकाच प्रकारच्या असेटमध्ये गुंतवू नये.
असेट निवडताना तुम्हाला कितपत रिस्क (आर्थिक+मानसिक) दृष्ट्या पेलवते याचा विचार करावाच लागतो. जितकी तुमची रिस्क घ्यायची क्षमता कमी, तितके कमी रिटर्न्स तुम्हाला मिळतील.
सिस्टमिक रिस्कच्या नियमनाबद्दलची खात्री ही दुसर्‍याने देऊन भागत नाही. त्यामुळे याबद्दल काही बोलण्यासारखे नाही.

लोक्स गैरसमज नसावा पण स्वतःच्या मुलांसाठी कुठलीही इन्व्हेस्टमेंट करत असलात तरी मॅच्युरिटीवेळी ते पैसे तुमच्याच हातात यावेत. म्हणजे तुमच्या नावेच इन्व्हेस्ट करावे असं मला वाटतं. पुढचं कुणी पाहीलय. आपलीच मुलं आहेत, आपले संस्कारही आहेत सगळं मान्य आणि तरीही पैसे आपल्याच हाती यावे मग आपण ते मुलांना द्यावे किंवा त्यांच्या शिक्षणासाठी वापरावे.

भरलं ताट दुसर्‍याला द्यावं पण आपला पाट देऊ नये असं काहीसं वाक्य नटसम्राट मधलं एकदम घट्ट बसलय डोक्यात. घरच्या जेष्ठांनाही हेच सांगितलय.

बाकी मीपण सशाच्या काळजाची! पोस्ट, PPF आणि स्टेट ब्यांक जिंदाबाद. नाही म्हणायला SBI च्या गोल्ड फंडात मंथली भरायला सुरवात केलीय.

मला SBI च्या गोल्ड फंडचा फंडा कोणी सांगेल का? लिंक नको प्लीज. आधी इथे कुठे त्यावर लिहिलं गेलं असेल तर त्याची लिंक चालेल..

श्रुती....

"....तरीही पैसे आपल्याच हाती यावे मग आपण ते मुलांना द्यावे....."

~ प्रचंड सहमत....आणि त्यातही विशेष म्हणजे एका स्त्रीने हे मत मांडणे विशेष वाटत आहे. मी अशी कैक उदाहरणे पाहिली आहेत माझ्याच सहकार्‍यांच्या संदर्भात.... ज्यानी 'पुत्रप्रेमापोटी' जवळपासची पूंजी एक रकमेने देऊन मग लग्न झाल्यापासून मुलगा पाहात नाही आता, असे कसे झाले, का व्हावे ?... असे भजन म्हणत नशिबाला दोष देत देत टाळ कुटणारे.

"मोलकरीण' चित्रपटातील सुलोचना आणि परशुराम सामंतच जणू.....सारे कष्ट आणि पैसा मुलावर खर्च केला.....आणि तो मुलगा कलेक्टर झाला, पण आता फाटक्या धोतर उपरण्यातील बापाला बाप म्हणून ओळख न दाखविणारा... तर पुढे त्याच्याच घरात आईला मोलकरीण म्हणून नोकरी. छे !!

गुंतवणूकीचे पैसे नक्कीच आपल्याच हाती यावेत, त्यावर 'व्यवहार' नामक शेंदूर थापावा व मगच पुढच्या पिढीच्या कल्याणाची चिंता करावी.

छान मत, श्रुती.

अरे हा धागा आजच पाहिला. इकडचे प्रतिसाद वाचल्यावर बरेच गैर समज दिसले. माझ्या कडुन थोडे अर्ध्य

१. पीपीएफ मधली गुंतवणुक सुरक्षित खरी. फक्त त्यात लॉक इन आहे.
२. गोल्ड बाँड मधे गुंतवणुक करणे हे प्रत्यक्ष सोने खरेदी पेक्षा कधीही चांगले. प्रत्यक्ष सोने घेण्यात अनेक अडचणी येवु शकतात जश्या:- सुरक्षितता, गुणवत्ता, कीती साठवणार ह्या वर मर्यादा आहेत.
३. अनेक नॅश्नलाइज्ड बँक्स गोल्ड बाँड्स वितरीत करतात त्यातली गुंतवणुक सेफ असते.
४. गुंतवणूक नेहेमी बॅलन्स्ड असावी. ( नॉट टु कीप ऑल एग्ज इन वन बास्केट)
५. मुलांच्या शिक्षणासाठी काही रक्कम उत्तम म्युचल फंड, गोल्ड फंड, बँकांच्या एफडी, सोने, चांदी च्या वीटा,ह्या सगळ्यात विखरुन ठेवावी.
६. झापड लावुन दर वर्षी विशेष्ठ गुंतवणुक करावीच.
७. सोन्या बरोबरच प्रत्यक्ष चांदी खरेदी हा ही उत्तम गुंतवणूकीचा पर्याय आहे. ( गेल्या २-३ वर्षात सोन्या पेक्षा चांदी ची वाढ खुपच लक्षणीय आहे. चांदी ची खरेदी करताना नाणी किंवा भांड्यां पेक्षा शुध्द चांदीच्या विटा खरेदी कराव्यात. आर्थातच साठवणुकीवर मर्यादा आहेत)

चिमुरी...

कुठलाही गोल्ड फंड हा खालील फंड्यावर चालतो
१. तुम्ही जेंव्हा गुंतवणुक करता त्या दिवशी गोल्ड फंड चा जो पब्लीश रेट असतो त्या नुसार तुम्हाला तेवढे युनीट्स मिळतात. म्हणजेच जर आजचा १० ग्रॅमचा पब्लीश रेट ३३००० आहे म्हणजे एका ग्रॅमचे म्हणजेच एका उनीटचा रेट ३३०० झाला. तुम्हाला जर ५०,००० गुंतवायचे असतिल तर १५.१५ युनीट्स (ग्रॅम) मिळतिल.
२. जसा जसा रेट वाढत जाईल तशी तशी तुमची गुंतवणुक वाढत जाईल.
३. तुम्हाला दर वर्षी ( किंवा कंपनी तत्वा नुसार) डिव्हीडंड म्हणुन अजुन युनीट्स मिळत जातिल.
४. हा सगळा डिव्हीडंड टॅक्स फ्री ( अत्ता तरी) आहे
५. विकायला जाल तेंव्हा जेवढे युनीट्स तेवढे पैसे
हेच जर तुम्ही प्रत्यक्ष सोने घेतले, तर विकायला जाल तेंव्हा त्यात घट ही घेतातच. परत शुध्दतेची खात्री नसते.

कोणतीही गुंतवणुक तुम्ही मायनर च्या नावाने केली तरी ती गुंतवणुक करणार्‍या पालकाच्या सोर्स मधुन धरली जाते. त्या मुळे त्या वरील परतावा हा त्या पालकाचे इन्कम धरले जाते. म्हणुनच टॅक्स ही पालकालाच भरावा लागतो.

इंशुरन्स हा इन्शुरन्स म्हणुनच पहावा. तो आणि इन्व्हेस्ट्मेंट ह्यांची गल्लत करु नये. खुप लोकांना तोंडघशी पडताना पाहिले आहे.

अनेक रेप्युटेड कंपन्या जश्या टाटा मोटर्स, ज्या टाइम डिपॉझीट्स घेतात. तिकडे गुंतवणुक ही चांगली आहे, कारण ह्या कंपन्या चांगल्या रेटींग च्या असतात ( ए. , ए+) त्यांचा परतावा चांगला असतो. ही डिपॉझीट्स इन्शुअर्ड असतात.

मुलांच्या नावार डायरेक्ट गुंतवणुक करु नये. त्यांचे नाव सेकंड ठेवावे किंवा नॉमिनी बनवावे.

जी काही गुंतवणुक करणार त्यांच्या झेरॉक्स कॉपीज काढुन शक्यतो स्कॅन करुन ठेवा. स्कॅनर नसेल तर नीदान मोबाइल किंवा कॅमेर्‍यात फोटो काढुन ठेवा. सगळ्या स्कॅन कॉपीज २-३ पेन ड्राइव्ह किंवा सीडी वर कॉपी करुन सुरक्षित ठीकाणी ठेवा. जर खरी कागद्पत्र गहाळ झाली तरी नीदान त्याच्या कॉपीज असतिल.

मो कि मी उत्तम पोस्ट.

चांदी बद्दल प्रथमच ऐकतेय..त्याबद्दल आणखी लिहाल ़का? खरेदी व साठवणुक दोन्हिंबद्दल

वेका,
चांदी सुमारे ३०-३२ हजार रुपये प्रतिकिलोपासून सुरु होऊन सध्या ६३ हजारावर आहे. ६ महिन्यापूर्वी चांदी ५३ होती Wink
शुद्ध चांदीच्या विटा १-१ किलोच्या मिळतात. चांदीला कमर्शियल वापर जास्त आहे. आपण चांदीचे दागिने सहसा वापरत नाही (फक्त पैंजण जोडवी इ.) व ताट्/वाटी/तांब्या/पेला वै. पण चांदी ही सर्किट्बोर्ड्स व केबल्स मधे अत्यंत उपयोगी आहे, व तिथे टनावारी वापरली जाते. सबब, तिचे मार्केट हलते रहाते. घेणे-विकणे असा खेळ करायचा असेल तर चांदी चांगली.

इब्लिस ...

करेक्ट...

चांदी ही एक अनेक उद्योगात वापरली जाणारी कमॉडिटी आहे. त्या मुळे तिची किंमत सारखी हलती असते. वर इब्लिस म्हणाले तसं, गेल्या २ वर्षात चांदी दुप्पट झाली.

चांदीच्या १ किलो च्या वीटा सोनारांकडे उपलब्ध असतात. तसेच बरेच जण त्याची सर्टिफिकेट पण देतात. विटा विकताना घट ही मामुली येते. ( दागीने किंवा भांड्यां पेक्षा) ( ३ टक्के साधारण). पण चांदी विकत घेतल्यावर एक नजर त्याच्या किंमतीकडे मात्र ठेवावी लागते. पण एक दोन वर्षात हमखास ३० ते ४० टक्क्यां पर्यंत अ‍ॅव्हरेज लाभ होतोच.

मोकीमी, धन्स... Happy

म्हणजे गोल्ड फंड मधे पैसे गुंतवल्यावर शेवटी त्यांच्याकडुन सोनं घ्यावं लागत नाही तर.. आपण ते युनिट्स तसेच विकु शकतो ना?

चिमुरी माझ्या माहीतीप्रमाणे गोल्ड फंडात खर्‍याखुर्‍या सोन्याचा अ‍ॅज सच काही संबंध नसतो त्याच्या किंमती असतो. उदा,
तुम्ही दर महिन्याला जी रक्कम भरता त्याच्या किंमतीइतकी सोन्याची युनिट्स तुम्हाला (पेपरवर) मिळतात. असं करत समजा २ वर्षात तुमच्याकडे ५० युनिट्स जमा झाली (मध्यमवर्गिय उदाहरण याची पूर्ण जाणिव आहे! Happy ) आणि तुम्ही ही इन्व्हेस्टमेंट बंद करायचं ठरवलं तर तुम्हाला ५० युनिट्स * त्यावेळेच्या सोन्याचा भाव इतके पैसे मिळतील.

दरवर्षी वेवढे भरतो त्याच्या ३१ पट १५ वर्षानंतर मिळतात.>>>

हे एक मीथ आहे. कारण पीपीएफ मधे पहिल्या वर्षी जेवढे भरता त्याच्या ३१ पट मिळु शकतिल, प्रोव्हायडेड इंटरेस्ट रेट ८.५% कायम राहिला तर आणि तरच. दर वर्षी जेवढे भरता त्याच्या प्रमाणात मिलत जातिल. उदा. २ र्‍या वर्षी टोटल गुंतवणुक १४ वर्षेच होइल, ३र्‍या वर्षा करीता १३ .. अशा उतरत्या क्रमाने इन्व्हेस्टमेंट चा काळ कमी कमी होत जाईल. त्या मुळे सर सकट पैसे १५ वर्षांनी ३१ पट नाही होणार. तसेच १५ वर्षांनी मिळणार्‍या पैश्या ची पी.व्ही. म्हणजे प्रेझेंट व्हॅल्यु काढली तर परतावा कुठल्याही परिस्थीतित ७ ते ८ टक्क्यां पेक्षा जास्त होत नाही.

आज जमिन, फ्लॅट्स ( काही काही शहरात), सोने , चांदी व शेअर्स ( ह्यात मुचल्फंड, इक्वीटी सगळे आले) हे सोडले तर कोणत्याही गुंतवणुकीत ८ ते ९ टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळत नाही.

फ्लॅट्स मधे ही जर तुम्ही बँक लोन काढुन घर घेणार असाल तर परतावा नक्कीच कमी होतो. परत मेंटेनन्स आहेच. प्रोपर्टी टॅक्स, सर्व्हीस टॅक्स, पार्किंग, मेंटेनन्स, व्हॅट, हे सगळे जमेस धरुनच कॅल्क्युलेशन्स करावी. मोठ्या शहरां मधले काही भाग सोडले तर घरे भाड्यानेही जात नाहीत किंवा तुमच्या महिन्याच्या हप्त्या येवढे भाडेही मिळत नाही ( गेले ते दिवस).

१९७१ ते २००४ या काळात सोन्याची डॉलर्मधली किंमत आणि रुपयामधली किंमत याची तुलना केली तर हा चार्ट एकदम बोलका आहे.

monthly_dollar.gifmonthly_rupee.gif

मी इपीएफ मधे पण बेसिक पगाराच्या ८८% गुंतवणुकीचा पर्याय घेतला आहे. ते पैसे पण टॅक्स फ्री असतात. इपीएफ बद्दल कोणी जास्त माहीती देवू शकेल का?

त्रिशंकू, त्या दोन चार्ट्सबरोबरच डॉलर -रुपी एक्स्चेंज रेटचा चार्टही टाकायला हवा ना?
इथे मिळालेल्या माहितीनुसार १९७० सालात १ डॉलर = ७.५६ रुपये, तर २००५ सालात १ डॉलर = ४४.०९ रुपये होते.

मोकीमी अत्यंत उपयोगी पोस्ट.

चांदीत गुंतवणूक करावी असे कधी लक्षातच आले नव्हते.

दुबईच्या सोन्याबद्ल कोणाला काही माहित आहे का? इथले आणि आबुधाबीचे सोने खुप शुध्द असते भारतापेक्षा हे खरे आहे का? इथले सराफी असच सांगतात आणि देशातले सांगतात सगळीकडचे सोने सारखेच असते (शुध्द्) .खर काय ते कळतच नाही. एवढ नक्की की इथे फसवणूक नाही.

चर्चा वाचली. नुकतीच ह्याबाबतीत ओळखीतल्या एकाशी चर्चा केली होती. त्यांच्या मते शिक्षणाच्या 'किंमतीत' गेल्या पाच वर्षात २४ % वाढ झालेली आहे. त्यामुळे मुलांच्या शिक्षणासाठीची तरतुद जितकी लवकर सुरु कराल तितकं चांगलं. त्यांनी सांगितलेले काही मुद्दे :
१. जी काय गुंतवणूक कराल ती पालकांनी आपल्याच नावावर ठेवावी. मायनरच्या नावावर ठेऊ नये.
२. पीपीएफ हा गुंतवणूकीचा सगळ्यात उत्तम पर्याय आहे कारण त्याचे रिटर्न्स टॅक्स फ्री असतात. १ लाख वर्षाला भरता येतात आणि ती रक्कम भरावीच.
३. एनएससी मध्ये शक्यतो गुंतवू नये कारण परत मिळणार्‍या रक्कमेच्या तुलनेत टॅक्स खूप जास्त जातो.
४. आपल्या सेव्हिंग अकाऊंट आणि फिक्स्ड डिपॉझिट ह्यामध्ये जास्तित जास्त किती पैसे ठेवायचे ह्याची मर्यादा ठरवून ठेवावी. त्याच्यावर पैसे असतील तर ते गुंतवावे.
५. LIC पीलिसी ह्या नवरा बायबो दोघांनी काँबिनेशक करून काढाव्यात. ह्यात अनेक पर्यात उपलब्धा आहेत जे ठराविक काळाने तसेच शेवटी चांगला परतावा देतात.
६. इतर सर्व इंश्युरन्स कंपन्यांपेक्षा LIC सगळ्यात भरोसा ठेवण्याजोगं आहे.
७. प्रत्येक मिळवत्या माणसाने एका वेळी एकतरी रिकरिंग डिपॉझिट सुरु ठेवावे, जेणेकरून थोडी थोडी रक्कम बाजूल पडत रहाते. जी वर्षा/मुदती अखेरी गुंतवता येते किंवा काही कामासाठी वापरता येते.
८. मुलांच्या शिक्षणासाठी करायची गुंतवणूक शक्यतो शेरमार्केटमध्ये वगैरे करू नये.

सेव्हिंग्ज याबाबतीत मी प्रचंड अज्ञानी आहे. सध्या तरी फक्त एफ डी, रिकरिंग, आणि प्रत्यक्षात सोनं घेणे इ. च प्रकार केलेले आहेत.

माहिती असावं म्हणुन विचारतेय की पी पी एफ मधे ठरवलेली रक्कम दर वर्षी भरावीच लागते का? ही रक्कम आपल्या सोयीने कमी जास्त करता येते का? म्हणजे पहिल्या वर्षी ५००००, दुसर्‍या वर्षी ७००००, तिसर्‍या वर्षी समजा नाही जमले पैसे टाकायला, अन चौथ्या वर्षी परत ५०००० असं काही करता येतं का?

सेव्हिंग्ज याबाबतीत मी प्रचंड अज्ञानी आहे. सध्या तरी फक्त एफ डी, रिकरिंग, आणि प्रत्यक्षात सोनं घेणे इ. च प्रकार केलेले आहेत.>> मी पण ..
माहिती असावं म्हणुन विचारतेय की पी पी एफ मधे ठरवलेली रक्कम दर वर्षी भरावीच लागते का? ही रक्कम आपल्या सोयीने कमी जास्त करता येते का? म्हणजे पहिल्या वर्षी ५००००, दुसर्‍या वर्षी ७००००, तिसर्‍या वर्षी समजा नाही जमले पैसे टाकायला, अन चौथ्या वर्षी परत ५०००० असं काही करता येतं का?>> हो चिमुरी वेरीएबल अमाउंट टाकता येते पीपीफ ला.. फक्त लिमीट आहे वर्षाला १ लाख.

Pages