पकडता येतात कोठे सावल्या ?

Submitted by सुप्रिया जाधव. on 1 December, 2012 - 07:02

ना जरी शब्दातुनी डोकावल्या
भावना डोळ्यात होत्या वाचल्या

तू असा माझ्याकडे पाहू नको
शेकडो संवेदना झंकारल्या !

ये पुन्हा, अथवा नको येवू कधी
पकडता येतात कोठे सावल्या ?

तो असा अन ती तशी का वागते
बेगड्या चालीरिती जोपासल्या !

वागण्याचा अर्थ तेव्हा लागतो
वागणे वेळेत स्मरता फावल्या

याचसाठी फक्त हा आटापिटा
निस्तरु अवघ्या चुकाही मागल्या

वेदना हुश्शार माझ्या केवढ्या !
ना कधी भांबावल्या, कंटाळल्या

-सुप्रिया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तो असा अन ती तशी का वागते
बेगड्या चालीरिती जोपासल्या !

<<<

छान!

शब्दातुनी हवे बहुधा

तो असा अन ती तशी का वागते
बेगड्या चालीरिती जोपासल्या !

वागण्याचा अर्थ तेव्हा लागतो
वागणे वेळेत स्मरता फावल्या

>> दोन्हीतले खयाल आवडले.

वागण्याचा अर्थ तेव्हा लागतो
वागणे वेळेत स्मरता फावल्या

वा वा..!

आवडली.

तुमच्या गझला तशा सरळ असतात नेहमी....

अप्रतिम गं सुप्रिया..
रिग्रेट, भारतभेटीत तुझी भेट झाली नाही!!!

मस्त आहे गझल..

तू असा माझ्याकडे पाहू नको
शेकडो संवेदना झंकारल्या !
सुंदर..

वागण्याचा अर्थ तेव्हा लागतो
वागणे वेळेत स्मरता फावल्या

अप्रतिम...

पुलेशु.

वैभव, बिनधास्त धन्यवाद!

<<<तुमच्या गझला तशा सरळ असतात नेहमी....>>>

Happy

वर्षू Sad (टांगारु झाल्याबद्दल पेनॉल्टी देईन गं पुढच्या भेटीत.)

-सुप्रिया.