पोर माहेरास आली सासरी सोडून दे

Submitted by बेफ़िकीर on 1 December, 2012 - 00:50

पोर माहेरास आली सासरी सोडून दे
चल मला मद्यालया माझ्या घरी सोडून दे

मी तुझा कोणीच नसणेही तुझा असणेच मी
शक्य झाले तर मला माझ्यावरी सोडून दे

लांबुनी घालून वळसा भेटता येईल की
एकमेकातील दुर्दैवी दरी सोडून दे

एक तर दिसतेस तू वरती बरी दिसतेस तू
हे तरी सोडून दे वा ते तरी सोडून दे

श्रावणाची ही दिरंगाई नको झेलूस तू
वेळच्यावेळी न आलेल्या सरी सोडून दे

बोलणे राहून जाते पाहण्यामध्ये तुला
कारणावाचून नटणे भरजरी सोडून दे

एक म्हातारी मुलाला विनवताना पाहिली
भाकरी आहे इथेही चाकरी सोडून दे

कान राधेचे कुठे पळतात का खोटारड्या
धर्म दे स्थापून आता बासरी सोडून दे

अर्ज दरवर्षी कराया लोक नेती पालख्या
विठ्ठलाला सांगती की पंढरी सोडून दे

नोकरी गेलीच आहे वेळ लावू कारणी
कर जरा गंभीर कविता मस्करी सोडून दे

आज शेवटचा दिवस खुर्चीतला... रडतोस का?
'बेफिकिर' आहेस दाखव... नोकरी सोडून दे

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी तुझा कोणीच नसणेही तुझा असणेच मी
शक्य झाले तर मला माझ्यावरी सोडून दे

बोलणे राहून जाते पाहण्यामध्ये तुला
कारणावाचून नटणे भरजरी सोडून दे

आज शेवटचा दिवस खुर्चीतला... रडतोस का?
'बेफिकिर' आहेस दाखव... नोकरी सोडून दे

हे तिन्ही शेर खूप आवडले.

ह्या गझलेखाली नाव लिहीले नाही,तरी ही '' बेफिकीर'' बाजाची गझल आहे,हे लक्षात येत आहे.

लांबुनी घालून वळसा भेटता येईल की
एकमेकातील दुर्दैवी दरी सोडून दे

श्रावणाची ही दिरंगाई नको झेलूस तू
वेळच्यावेळी न आलेल्या सरी सोडून दे

कान राधेचे कुठे पळतात का खोटारड्या
धर्म दे स्थापून आता बासरी सोडून दे

अर्ज दरवर्षी कराया लोक नेती पालख्या
विठ्ठलाला सांगती की पंढरी सोडून दे

>> फार आवडले!

ह्या गझलेखाली नाव लिहीले नाही,तरी ही '' बेफिकीर'' बाजाची गझल आहे,हे लक्षात येत आहे.>>>>>+१

अगदी खरे!! इतके खरे बोललात डॉ.साहेब की विठ्ठलाचा शेर वाचून देखील वैवकुची जराही आठवण झाली नाही मलातरी !!!

चल मला मद्यालया माझ्या घरी सोडून दे
शक्य झाले तर मला माझ्यावरी सोडून दे
श्रावणाची ही दिरंगाई नको झेलूस तू

वरील मिसरे अप्रतिम....

मक्ता शेर खूप खास...

व्वा भूषण जी !!

मी तुझा कोणीच नसणेही तुझा असणेच मी
शक्य झाले तर मला माझ्यावरी सोडून दे

लांबुनी घालून वळसा भेटता येईल की
एकमेकातील दुर्दैवी दरी सोडून दे

एक तर दिसतेस तू वरती बरी दिसतेस तू
हे तरी सोडून दे वा ते तरी सोडून दे

श्रावणाची ही दिरंगाई नको झेलूस तू
वेळच्यावेळी न आलेल्या सरी सोडून दे

कान राधेचे कुठे पळतात का खोटारड्या
धर्म दे स्थापून आता बासरी सोडून दे

>>>>>>>>>>>>>>>>>>>

सुंदर........

डॉ़क म्हणतात तसं काही शेर डोळे झाकून सांगता येतं की बेफीचे आहेत... !

बहोत खुब!!!

मी तुझा कोणीच नसणेही तुझा असणेच मी
शक्य झाले तर मला माझ्यावरी सोडून दे

लांबुनी घालून वळसा भेटता येईल की
एकमेकातील दुर्दैवी दरी सोडून दे

एक तर दिसतेस तू वरती बरी दिसतेस तू
हे तरी सोडून दे वा ते तरी सोडून दे

हे खास आवडले Happy

मी तुझा कोणीच नसणेही तुझा असणेच मी
शक्य झाले तर मला माझ्यावरी सोडून दे

लांबुनी घालून वळसा भेटता येईल की
एकमेकातील दुर्दैवी दरी सोडून दे

एक तर दिसतेस तू वरती बरी दिसतेस तू
हे तरी सोडून दे वा ते तरी सोडून दे

श्रावणाची ही दिरंगाई नको झेलूस तू
वेळच्यावेळी न आलेल्या सरी सोडून दे

बोलणे राहून जाते पाहण्यामध्ये तुला
कारणावाचून नटणे भरजरी सोडून दे

चढत्या भाजणीचे शेर !..... वा वा वा !

एक तर दिसतेस तू वरती बरी दिसतेस तू
हे तरी सोडून दे वा ते तरी सोडून दे

श्रावणाची ही दिरंगाई नको झेलूस तू
वेळच्यावेळी न आलेल्या सरी सोडून दे

बोलणे राहून जाते पाहण्यामध्ये तुला
कारणावाचून नटणे भरजरी सोडून दे

एक म्हातारी मुलाला विनवताना पाहिली
भाकरी आहे इथेही चाकरी सोडून दे

अर्ज दरवर्षी कराया लोक नेती पालख्या
विठ्ठलाला सांगती की पंढरी सोडून दे

>>>> व्वा व्वा!! खूप आवडले हे शेर..

>>हे तरी सोडून दे वा ते तरी सोडून दे<< कसलं सहज ! क्या बात !

Mast gazal, faar aawadalee.

Ranjitshee sahamat~ befikiranchee khaasiyat aslelaa misra aahe to

=========
Marathi typing na kelyamule kshamaswa!

बहारदार गझल..
कर जरा गंभीर कविता मस्करी सोडून दे.
खरेय.पण ठीकच आहे मस्करीही !

मी तुझा कोणीच नसणेही तुझा असणेच मी
शक्य झाले तर मला माझ्यावरी सोडून दे
लांबुनी घालून वळसा भेटता येईल की
एकमेकातील दुर्दैवी दरी सोडून दे
श्रावणाची ही दिरंगाई नको झेलूस तू
वेळच्यावेळी न आलेल्या सरी सोडून दे..
कान राधेचे कुठे पळतात का खोटारड्या
धर्म दे स्थापून आता बासरी सोडून दे
इथे गवसतेय ती गंभीर कविता.

बहारदार गझल..
कर जरा गंभीर कविता मस्करी सोडून दे.
खरेय.पण ठीकच आहे मस्करीही !

मी तुझा कोणीच नसणेही तुझा असणेच मी
शक्य झाले तर मला माझ्यावरी सोडून दे
लांबुनी घालून वळसा भेटता येईल की
एकमेकातील दुर्दैवी दरी सोडून दे
श्रावणाची ही दिरंगाई नको झेलूस तू
वेळच्यावेळी न आलेल्या सरी सोडून दे..
कान राधेचे कुठे पळतात का खोटारड्या
धर्म दे स्थापून आता बासरी सोडून दे
इथे गवसतेय ती गंभीर कविता.

मस्त मस्त.......आवडेश Happy
म्हातार्‍या आईचा शेर तर अगदी पोचलाच !!
"हे तरी सोडून दे......... जबरी !!

मी तुझा कोणीच नसणेही तुझा असणेच मी
शक्य झाले तर मला माझ्यावरी सोडून दे हा शेर छान.

श्रावणाची ही दिरंगाई नको झेलूस तू
वेळच्यावेळी न आलेल्या सरी सोडून दे हाही.... सुंदर..!

बोलणे राहून जाते पाहण्यामध्ये तुला
कारणावाचून नटणे भरजरी सोडून दे हं....

हे शेर सोडल्यास मला ही गझल आवडली नाही.

तुम्ही कोणत्या मनस्थितीत आहात माहीत नाही.

एक तर दिसतेस तू वरती बरी दिसतेस तू
हे तरी सोडून दे वा ते तरी सोडून दे>>>> मस्त!!!

लांबुनी घालून वळसा भेटता येईल की
एकमेकातील दुर्दैवी दरी सोडून दे >>>> ह शेरही फार आवडला.

नोकरी गेलीच आहे वेळ लावू कारणी
कर जरा गंभीर कविता मस्करी सोडून दे

आज शेवटचा दिवस खुर्चीतला... रडतोस का?
'बेफिकिर' आहेस दाखव... नोकरी सोडून दे

अस्वस्थ केले ह्या शेरांनी.

vva khup aavadli
कान राधेचे कुठे पळतात का खोटारड्या
धर्म दे स्थापून आता बासरी सोडून द
ha farach aavadla ..