दशभुजा

Submitted by Prajakta C. Kulkarni on 30 November, 2012 - 00:56

|| श्री ||

दशभुजा

रात्री दहाचा सुमार होता.जयदेव तोफखाने यांचे घर.स्वंयपाकघरात त्यांच्या बायकोची वसुधंराची आवराआवर सुरु होती.त्यांचे आई -वडिल सुमती बाई -माधवराव टी व्ही बघत होते.आणि त्यांच्या घरातली तरुण पिढी त्यात त्यांचा मोठा मुलगा अनिरुद्ध त्याची बायको रेवती ,धाकटा मुलगा कौस्तुभ घराच्या गच्ची वर बसुन काहीतरी ठरवत होती.जेवण झाल्यावर जयदेव कौस्तुभ च्या खोली त जातात.तिथे टेबल वर पड्लेली अस्ताव्यस्त वर्तमानपत्रे पाहुन
चिड्तात.

"हा मुलगा एक काम वेळे वर करेल तर, वसु ए वसु कौस्तुभ ने अजुन ही रद्दी उचलली नाही त्याला सांगितलेले एक ही
काम तो वेळे वर करत नाही " जयदेव ओरड्तात.

वर्तमानपत्रे नीट लावता लावता त्यांना कौस्तुभ ने लिह्लेला एक लेख सापड्तो , "दशभुजा" नावाचा आणि जयदेव तो लेख वाचत बसतात.आणि एकदम वसुला हाक मारतात,
"वसु अगं लेखकाने किती छान लिह्लय?"

जयदेव कौस्तुभला कधी कधी लेखक म्हणायचे.

"काय म्हणतोय लेखक?" वसु आतुनच विचारते
"आई -बाबा तुम्ही पण या ,वसु तु पण ये इकडे त्याने काय लिहले आहे ते ऐकायला"

तसे सगळेजण येतात.

प्रिय आईस

परवा तु वेतागुन आम्हाला म्हणालीस ,परवा म्हणजे अगदी परवा असे नाही त्याला झाले सात-आठ महिने.तर तु काय म्हणालीस "मला दोनच हात आहेत ,दहा नाहीत".पण खरे सांगायचे तर आई तुला दोन हात असुन सुद्ध्हा तु दशभुजा आहेस. एकाच वेळी दहा कामे कराणारी .दिवसातुन कधी ही बघा तु कायमच कामाला तयार असतेस कमरेला पदर खोचुन.कंटाळा म्हणुन कधी नाहीच

तुझे अस्तीत्व मला आपल्या घरात जागोजागी जाणवते.अगदी अंगणातल्या रांगोळी असो वा स्वंयपाकघरातला मिठाचा ड्बा किंवा तु केलेले काचेच्य भांड्यांचे कलेक्शन असो,आरशावर चिट्कवलेले गोल लाल
टिकल्या,तुझ्याकडे असलेल्य वेगवेग्ळ्या प्रकारच्या साड्या, वास्तुशांतीच्या वेळी उमट्लेले ह्ळ्दी-कुंकवाचे तुझ्या हाताचे
ठ्से. आई तु ऑलराऊडर आहेस्,तुला जागतिक मंदीपासुन ते बसमधील महिला आरक्षणापर्य्ण्त सगळे विषय माहिती असतात .तु काळानुसार बद्लत राहिलीस, तु जाणुन घेतेस तुझ्या मुलांचे मित्र कोण आहेत मेत्रीणी कोण
आहेत.

आम्हाला वाट्ते की तु तुझ्या सासुला म्ह्णणजे आमच्या आजीला अजुन घाबरतेस ,पण ते घाबरणे आमच्या
द्रूष्टीकोनातुन असते,तुझ्या द्रुष्टीने तो आदर आहे सासुबद्द्लचा.इतके दिवस तु सुन होतीस आता जस्त सासु झालीस तरीसुद्धा पुर्वीसारखीच स्वंयपाकघरात राबतेस ,राबतेस म्हणण्या ऐवजी रमतेस म्हणायला मला जास्त आवडेल.तुला
मुलगी नाही म्ह्णुन तु तुझ्या सुनेत रेवती वहिनीत मुलीला पाहतेस आणि तिचे कौतुक करतेस.अर्थात ती सुद्धा तुझ्या आईला पाह्ते,

तु स्वंयपाकघराची राणी आहेस्,त्यात तुझी मजल चायनीज -मंच्यारिअन पर्यंत गेली.आमच्या साठी तु वेगवेगळी पदार्थ करायली शिकलीस्,त्यादिवशी तुझे एक वाक्य ऐकले आणि पट्ले देखील .पोळ्याला बाई लावण्या बाबत
तर तु म्ह्णणालीस
"मला माझ्या स्वंयपाकघरात इतर दुसर्य बाईची लुड्बुड चालणार नाही ,ती उगीच इकड्चे -ति़कडे करणार ,मला नाही आवड्णार ते "

जयदेव वाचता वाचता थांबतात

" आईचे फारच कौतुक चाललय ,बघतेच सकाळी कौस्तुभला " सुमती बाई मध्ये च बोलतात.
"आई पुढे ऐक" जयदेव पुन्हा वाचु लागतात.

मागे एकदा कपाट आवरताना तुझ्या शाळेची सर्टीफिकेट स सापड्ली.त्यावर तुझे नाव रोहिणी सरनोबत होते .आणि आता वसुंधरा जयदेव तोफखाने आहे.नाव बद्लले,आड्नाव बद्लले ,ओळ्ख बद्लली पत्ता देखील बद्लला
माणसागणिक भुमिका बद्लली.कसा ग तुम्ही बायका एवढा मोठा बद्ल अचानक स्वीकारता. अचानक बद्ललेल्य
नावाला पट्कन कशी ओ देता.फक्त तुच नव्हे जगातली प्रत्येक स्री हा बदल कसा स्वीकारते

"जयदेव ,कौस्तुभकडे लेखनाचा वारसा कोठुन आला रे?" माधव राव विचारतात.
"वसु कडुन आला बाबा,तिचे वडिल लिहायचे ना" जयदेव
"हो हो ,मनोहरपंत लिहायचे" माधव राव
"पुढे वाच" वसु

आई आता पन्नाशीला आलीस तरीसुद्धा अधुन मधुन डोकावणारा एखादा पांढरा केस तु ह्ळुच लपवतेस्,मला माहिती आहे हे तुला पट्णार नाही

"हे मात्र काहीही लिह्ले आहे ,मी काय पन्नास वर्षाची आहे का?" वसु मध्येच

मागे एकदा मी तुला विचारले की आई तुझे एवढे शिक्षण Msc.chemistry झालय.मग तुला कधी नोकरी करावी
असे वाट्ले नाही,करिअर करावे असे वाट्ले नाही.यावर तुझे उत्तर नाही असे होते.पण "का नाही" चे उत्तर मात्र तुझ्याकडे नव्हते.कारण तु कधी तसा विचार च केला नाहीस

"खरच रे जयदेव मी हा विचार कधी केलाच नाही" वसु
"आता कर मग" जयदेव
"चिरंजीव पुढे वाचा" माधव राव

पण सध्या तुझी ही ग्रुहिणीपदाची ड्युटी आहे ना त्याला मात्र तोड नाही.गेली पंचवीस वर्षे तुझा हा job अव्याहत पणे चालु आहे.सकाळी साडेपाच ते रात्री साडे अकरा.आपल्या घरातली most wanted व्यकी तु आहेस.दिवसभर आपलया घरात तुझ्या नावाचा जप सुरु असतो ,वसु वसु.मला माहिती आपल्या घरातल्या सग्ळ्याच्या आवडी-निवडी तु जपतेस ,पण तुझ्या आवडी-निवडी चे काय?
आमचे वाढदिवस तु साजरे करतेस पण तुझ्या वाढदिवसचे काय?

"वसु कधी आहे तुझा वाढदिवस" जयदेव एकदम विचारतात
"अ उद्या आहे" वसु सांगते
"वा वा" माधव राव

आज वसुचा वाढदिवस होता.अनिरुद्ध सोडुन सगळे जण वसुला शुभेच्छा देतात.तिला वाट्ते की कामाच्या
नादात विसरला असेल.तिची घरातली नेहमीची कामे झाल्यावर ती तिच्या खोलीत जाते.तिथे निशीगंधाची फुले तिची
वाट बघत होती .रेवतीने तिच्या आवडीची फुले फुलदाणीत ठेवली होती.तिला खुप प्रसन्न वाट्ते.
मग तिची नजर समोरच्या टेबलकडे जाते त्यावर बरीच पुस्तके अस्ताव्यस्त पसरुन ठेवली होती.ती पुस्तके उचलु लागते.पण ती सगळी पुस्तके तिच्या आवडीच्या लेखकांची नवीकोरी पुस्तके होती.त्यातले एखादे ती उघडुन बघते.
पहिल्या पानावर लिहले होते

"आई ,
वाढ्दिवसाच्या खुप खुप शुभेच्छा

अनिरुद्ध "

आत्ता तिच्या लक्षात येते अनिरुद्ध ने सकाळी शुभेच्छा का दिल्या नाहीत ते.पण याला कसे समजले
माझ्या आवडीचे लेखक कोणते ,याला तर वाचना चा अजिबत नाद नाही.

संध्याकाळी अनिरुद्ध- रेवती घरी येतात.आल्या आल्या अनिरुद्ध विचारतो

"आई पुस्तके आवड्ली का?"
"आवड्ली. पण तुला माझ्या आवडीची पुस्तके कोणती हे कसे कळले?" वसु
"तु काय वाचतेस ह्याकडे माझे लक्ष नव्हते,पण वाच तेस हे माहिती होते.म्ह्णुन तुझ्या लायब्ररी त गेलो रजिस्ट्र चेक केले
आणि परवाच ही पुस्तके आणली" अनिरुद्ध
"वा अनिरुद्ध.भेट द्यावी तर अशी दयावी" जयदेव
"सकाळी मुद्दामच तुला शुभेच्छा दिल्या नाहित्,म्हणुन तुझ्या टेबल वर ही पुस्तके पसरवुन ठेवली होती,तुझ्याशिवाय तो टेबल कोणी आवरत नाही हे ही माहिती होते" अनिरुद्ध
"आता रेवती तु काय देणार वसुला ? " जयदेव
" बाबा आमच्या ऑफिस तर्फे मला बेल्जिअम ला जाण्याची संधी मिळाली आहे"रेवती सांगते
"वा वा रेवती मजा आहे.ही फार चांगली गोष्ट आहे " जयदेव
"किती दिवसांसाठी?" सुमती बाई विचारतात
"एका महिन्या साठी पण मी अजुन हो म्हणुन सांगितले नाही" रेवती
"का गं?" वसु
"आई तुमची परवानगी नको का?" रेवती
"आमची काय परवानगी घ्यायची,काय रे जयदेव .भरारी मारण्याचे हेच दिवस आहेत ,जा बिनधास्त." वसु
"हो हो तु जा .आमची काही हरकत नाही".
"अरे हा कौस्तुभ कधी येणार आहे?" माधव राव
" आजोबा तो केक घेवुन येतोय" अनिरुद्ध

वसुचे बोलणे ऐकुन सुमतीबाईना उगीच वाटते की आपण आपल्या ह्ट्टासाठी वसुला कधी नोकरी
करुन दिली नाही.तिला कधी भरारी मारण्याची संधी दिली नाही.आणि त्या वसुला हाक मारतात.
"वसु"
"काय आई?" वसु
" मी कधी तुला भरारी मारण्याची संधी दिली नाही ना.तु एवढी शिकलेली पण मी तुला घराच्या चार भिंतीतच कोंड्ले,माझच चुकले " सुमती बाई
"असु द्या हो आई .मी भरारी मारली नाही म्हणुन माझे कधी काही अड्ले का?" वसु

"एवढे सगळे असुन ही वसु मला एका शब्दाने कधी उलटे बोलली नाही" सुमती बाई
"आज आपल्या घरी काय चाललय ,कळ्तच नाही" अनिरुद्ध

तेवढ्यात कौस्तुभ केक घेऊन येतो.
" वहिनी हा केक घे,आणि आई आता मी तुला एक गोष्ट वाचा यला देणार आहे.माझ्या लेखाची पहिली वाचक तु आहेस्,चल बस इथे " अस बड्बड्त कौस्तुभ आत त्याच्य खोलीत जातो,त्याचा "दशभुजा " लेख घेऊन येतो

"अरे तुझा हा लेख आम्ही सगळ्यांनी कालच वाचला आहे "जयदेव सागतात
"बाबा खोटे बोले नका" कौस्तुभ
"नाही अरे खरेच वसुला विचार" जयदेव
"मला वाट्लेच होते बाबा तुम्ही असे काही करणार म्हणुन ,शिवाय एकटयाने वाचला नसेल अख्या घरादाराला एकत्र
बोलावुन मोठयांदा वाचला असेल्,का हो असे करता?" कौस्तुभ
"हो त्याने मोठयांदा वाचला ,पण तु किती छान लिहला आहेस "माधव राव

-----समाप्त-----------

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Prajakta C. Kulkarni,

कथा चांगली आहे. आजून खुलवता आली असती. एक सूचना : कथेच्या शेवटी समाप्त असे लिहावे. परिच्छेद एकसारख्या पद्धतीने पाडले नसल्याने कथा चुकून अर्धीच प्रकाशित झाली की काय असं वाटून गेलं.

आ.न.,
-गा.पै.

छान आहे