दीपोत्सव : त्रिपुरी पौर्णिमा

Submitted by शोभा१ on 29 November, 2012 - 05:29

त्रिपुरी पौर्णिमेला बहुतेक मंदीरात दीपोत्सव करतात. काल मी असाच एका मंदिरातला दीपोत्सव पाहिला. तो म्हणजे, शिवतीर्थनगर गणेश मंदीर येथील. तिथे एक छान चित्र काढलं आहे, ते आहे महिषासूरमर्दिनीचं. अंदाजे १५ फूट लांबीच हे चित्र आहे. सोमवार पासून हे चित्र काढायला सुरुवात झाली. मंगळवारी दुपारपासून रात्री १ वाजेपर्यंत चित्र रंगवणे चालू होते. आणि बुधवारी फुलांच्या पाकळ्यांची सजावट करून, संध्याकाळी ७ वाजता, दीपोत्सव करण्यात आला. मी काही फोटो आधीच काढून घेतले. Happy
१. फोटो खूप मोठा आणि माझा कॅमेरा छोटा, त्यामुळे आणि फोटो नीट काढाता येत नसल्यामुळे हा नीट दिसत नाही. त्याबद्दल क्षमस्व.
DSCN4695

२.हा जरा जवळून काढला.
DSCN4696

३.दीपोत्सव केल्यानंतर.
DSCN4716

४.DSCN4714

****. कुणाला पहायचं असेल हे चित्र तर अजूनही ते तसच ठेवल आहे. Happy

हे तास् न तास बसून चित्र काढणे, रंगवणे, आणि फुलांच्या पाकळ्यांची सजावट करणे हे सर्व एका उत्साही तरूणाने केले आहे. ज्यांचे वय आहे फक्त ७१ वर्षे. Happy आणि त्यांचे नाव आहे, श्री. गोरे काका. त्यांनी हेच चित्र १९६७ साली काढले होते व रंगवले होते, त्याचा फोटो मी मंगळवारी पाहिला. त्यात देवी उभी आहे. पण इथे जागेअभावी त्यानी तिला सिंहावर बसवले. Proud

५. हेच ते सदा हसतमुख असणारे आमचे गोरे काका.
DSCN4713

हे दर वर्षी, येथे चित्र काढतात आणि रंगवतात. त्यांनी गेल्या वर्षी, संत तुकारामांचे चित्र काढले होते.
हे पहा.

६.DSCN1312

७.DSCN1309

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छानच आहे चित्र. श्री. गोरे काका दिसले हे पण छानच.. अशी एखादा ध्यास घेतलेली माणसे खरेच असतात, यावर विश्वास ठेवावाच लागतो.

सुरेख ! प्रसन्न वाटले बघुन. श्री. गोरेकाकांचे अभिनंदन. या वयातही किती मनमोकळा उत्साह आणी काय कला दिलीय ईश्वराने.

दिनेशदा, या वयात, सोमवार पासून इतके कष्ट करून सुद्धा ते इतर कार्यक्रमांना हजेरी लावत होते. इथे आल्यानंतर त्याना अजून एका कार्यक्रमाला जायच होतं. तरी किती प्रसन्न आहेत बघा. Happy
नाही तर मी. मंगळवारी तासभर बस स्टॉपवर उभी राहून, भरलेली बस मिळाली. म्हणून खूप चिड चिड झाली माझी. पण मंदिरात या काकांचा कामाचा उरक बघून आणि ते चित्र बघून माझा राग पळून गेला. कारण मलाच माझी लाज वाटली. Proud

स्मिते, लहानानी असं बोलू नये. Wink शहाणे, एक तास, आलेली बस आपलीच आहे अस समजून बसची वाट पहात बसणे, म्हणजे काय ते तुला नाही कळणार. Uhoh

प्रसन्न राहत नाही तु... >>>>>>>>.मी प्रस्न्न आहे की नाही ते कधी पाहिल तू? आधी भेट मग बोल. Lol

शोभा... मस्त आलाय फोटो, एकदम क्लिअर!!!!
काय सुरेख चित्रं काढलीयेत.. अप्रतिम..
आणी गोरे काकांपासून शिकण्यासारखं किती सापडलं....
त्यांची आणी त्यांच्या कलाकृतींची ओळख करून दिल्याबद्दल धन्स तुला...

सर्वाना धन्यवाद! Happy
कुठेशीक आहे गं नक्की???>>>>>>>>>पौड रोडवर आहे, शिवतीर्थ नगर. तिथे आहे गणपती मंदीर, त्यात आहे चित्र. Lol

शोभा, छान आलेत फोटो. आणि....
एक तास, आलेली बस आपलीच आहे अस समजून बसची वाट पहात बसणे, म्हणजे काय ते तुला नाही कळणार. >>>> या करता तुला _____/\_____

खुपच सुरेख Happy

गोरे काका खरेच ग्रेट आहेत, आणि धन्स ग शोभा तुलापण हे आमच्यापर्यंत पोहचवल्या बद्दल स्मित>>>>+१

surekh

अश्विनी, जागू, पल्लवी, डॅफोडिल्स, शेवगा, जिप्सी, माधव,मार्को पोलो, भुंगा, विजय, धन्यवाद! Happy

अप्रतिम. एक कळले नाही, चित्राच्या मध्ये पणती कशी काय लावतात चित्र न विस्कटता?

इंद्रा, नंदिनी, झंपी, धन्यवाद!. Happy
एक कळले नाही, चित्राच्या मध्ये पणती कशी काय लावतात चित्र न विस्कटता?>>>>.जिथे चित्र रंगवले आहे, तिथे अर्थात, देवीच्या रंगावर नाही. इतर ठिकाणी अलगद पाय ठेवून. Happy

Pages