त्रिपुरी पौर्णिमेला बहुतेक मंदीरात दीपोत्सव करतात. काल मी असाच एका मंदिरातला दीपोत्सव पाहिला. तो म्हणजे, शिवतीर्थनगर गणेश मंदीर येथील. तिथे एक छान चित्र काढलं आहे, ते आहे महिषासूरमर्दिनीचं. अंदाजे १५ फूट लांबीच हे चित्र आहे. सोमवार पासून हे चित्र काढायला सुरुवात झाली. मंगळवारी दुपारपासून रात्री १ वाजेपर्यंत चित्र रंगवणे चालू होते. आणि बुधवारी फुलांच्या पाकळ्यांची सजावट करून, संध्याकाळी ७ वाजता, दीपोत्सव करण्यात आला. मी काही फोटो आधीच काढून घेतले.
१. फोटो खूप मोठा आणि माझा कॅमेरा छोटा, त्यामुळे आणि फोटो नीट काढाता येत नसल्यामुळे हा नीट दिसत नाही. त्याबद्दल क्षमस्व.
****. कुणाला पहायचं असेल हे चित्र तर अजूनही ते तसच ठेवल आहे.
हे तास् न तास बसून चित्र काढणे, रंगवणे, आणि फुलांच्या पाकळ्यांची सजावट करणे हे सर्व एका उत्साही तरूणाने केले आहे. ज्यांचे वय आहे फक्त ७१ वर्षे. आणि त्यांचे नाव आहे, श्री. गोरे काका. त्यांनी हेच चित्र १९६७ साली काढले होते व रंगवले होते, त्याचा फोटो मी मंगळवारी पाहिला. त्यात देवी उभी आहे. पण इथे जागेअभावी त्यानी तिला सिंहावर बसवले.
५. हेच ते सदा हसतमुख असणारे आमचे गोरे काका.
हे दर वर्षी, येथे चित्र काढतात आणि रंगवतात. त्यांनी गेल्या वर्षी, संत तुकारामांचे चित्र काढले होते.
हे पहा.
छानच आहे चित्र. श्री. गोरे
छानच आहे चित्र. श्री. गोरे काका दिसले हे पण छानच.. अशी एखादा ध्यास घेतलेली माणसे खरेच असतात, यावर विश्वास ठेवावाच लागतो.
सुरेख ! प्रसन्न वाटले बघुन.
सुरेख ! प्रसन्न वाटले बघुन. श्री. गोरेकाकांचे अभिनंदन. या वयातही किती मनमोकळा उत्साह आणी काय कला दिलीय ईश्वराने.
दिनेशदा, या वयात, सोमवार
दिनेशदा, या वयात, सोमवार पासून इतके कष्ट करून सुद्धा ते इतर कार्यक्रमांना हजेरी लावत होते. इथे आल्यानंतर त्याना अजून एका कार्यक्रमाला जायच होतं. तरी किती प्रसन्न आहेत बघा.
नाही तर मी. मंगळवारी तासभर बस स्टॉपवर उभी राहून, भरलेली बस मिळाली. म्हणून खूप चिड चिड झाली माझी. पण मंदिरात या काकांचा कामाचा उरक बघून आणि ते चित्र बघून माझा राग पळून गेला. कारण मलाच माझी लाज वाटली.
मस्त आहे............... किमान
मस्त आहे...............
किमान १०-१५ फुट तरी असेलच ना
.
सुंदर आहेत
व्वा अप्रतिम.... चिडकी शोभी
व्वा अप्रतिम....
चिडकी शोभी चिड चिड करते म्हणुन प्रसन्न राहत नाही तु...
स्मिते, लहानानी असं बोलू नये.
स्मिते, लहानानी असं बोलू नये. शहाणे, एक तास, आलेली बस आपलीच आहे अस समजून बसची वाट पहात बसणे, म्हणजे काय ते तुला नाही कळणार.
प्रसन्न राहत नाही तु...
प्रसन्न राहत नाही तु... >>>>>>>>.मी प्रस्न्न आहे की नाही ते कधी पाहिल तू? आधी भेट मग बोल.
मस्तच गं शोभे प्रत्यक्ष
मस्तच गं शोभे
प्रत्यक्ष बघायला अजून छान वाटले असेल ना!
प्रत्यक्ष बघायला अजून छान
प्रत्यक्ष बघायला अजून छान वाटले असेल ना!>>>>>>.हो. अग खूप छान दिसतय. जमल तर बघच.
जमल तर बघच.>>> कुठेशीक आहे गं
जमल तर बघच.>>> कुठेशीक आहे गं नक्की???
शोभा... मस्त आलाय फोटो, एकदम
शोभा... मस्त आलाय फोटो, एकदम क्लिअर!!!!
काय सुरेख चित्रं काढलीयेत.. अप्रतिम..
आणी गोरे काकांपासून शिकण्यासारखं किती सापडलं....
त्यांची आणी त्यांच्या कलाकृतींची ओळख करून दिल्याबद्दल धन्स तुला...
सर्वाना धन्यवाद! कुठेशीक आहे
सर्वाना धन्यवाद!
कुठेशीक आहे गं नक्की???>>>>>>>>>पौड रोडवर आहे, शिवतीर्थ नगर. तिथे आहे गणपती मंदीर, त्यात आहे चित्र.
शोभा, छान आलेत फोटो.
शोभा, छान आलेत फोटो. आणि....
एक तास, आलेली बस आपलीच आहे अस समजून बसची वाट पहात बसणे, म्हणजे काय ते तुला नाही कळणार. >>>> या करता तुला _____/\_____
धन्यवाद स्निग्धा. या करता
धन्यवाद स्निग्धा.
या करता तुला _____/\_____>>>>.तुच मा.ख मै.
अप्रतिम
अप्रतिम
शोभा फारच छान सजावट आहे ग.
शोभा फारच छान सजावट आहे ग. खुप मेहनतीचे काम. तू आता एक चांगला कॅमेरा घेच.
मस्त
मस्त
फारच छान ! गोरे काकांना
फारच छान !
गोरे काकांना नमस्कार. इतके मोठे चित्र काढणे सोपे काम नाही.
गोरे काका खरेच ग्रेट आहेत,
गोरे काका खरेच ग्रेट आहेत, आणि धन्स ग शोभा तुलापण हे आमच्यापर्यंत पोहचवल्या बद्दल
खुपच सुरेख गोरे काका खरेच
खुपच सुरेख
गोरे काका खरेच ग्रेट आहेत, आणि धन्स ग शोभा तुलापण हे आमच्यापर्यंत पोहचवल्या बद्दल स्मित>>>>+१
मस्त. सगळ्या रंगोळ्या मस्तच
मस्त. सगळ्या रंगोळ्या मस्तच आहेत. पण त्या तुकाराम महाराजांच्या रांगोळीखालचे अक्षर प्रचंड सुंदर आहे.
छान प्रसन्न आहे. माधवला
छान प्रसन्न आहे.
माधवला अनुमोदन.
surekh
surekh
सुंदर!! प्रसन्न वाटले बघुन.
सुंदर!!
प्रसन्न वाटले बघुन.
अश्विनी, जागू, पल्लवी,
अश्विनी, जागू, पल्लवी, डॅफोडिल्स, शेवगा, जिप्सी, माधव,मार्को पोलो, भुंगा, विजय, धन्यवाद!
सुंदर कलाकृती
सुंदर कलाकृती
सुंदर आहे.
सुंदर आहे.
अप्रतिम. एक कळले नाही,
अप्रतिम. एक कळले नाही, चित्राच्या मध्ये पणती कशी काय लावतात चित्र न विस्कटता?
इंद्रा, नंदिनी, झंपी,
इंद्रा, नंदिनी, झंपी, धन्यवाद!.
एक कळले नाही, चित्राच्या मध्ये पणती कशी काय लावतात चित्र न विस्कटता?>>>>.जिथे चित्र रंगवले आहे, तिथे अर्थात, देवीच्या रंगावर नाही. इतर ठिकाणी अलगद पाय ठेवून.
आता गोरेकाकांना नक्कीच सांग,
आता गोरेकाकांना नक्कीच सांग, आमच्या माबोकरांना रांगोळी फार आवडली म्हणून
Pages