भानगड चक्क वाजवी होती

Submitted by कौतुक शिरोडकर on 16 November, 2012 - 03:16

(सुज्ञ वाचकांनी या हझलेच्या मालकाला ओळखले असेलच. ते परममित्र असल्याने त्याची माफी वगैरे मागत नाही. त्यांनी तशी मागणी नोंदवली तर नक्कीच मागितली जाईल. या गझलेतील सर्व शेर आत्मिक अनुभुतीत आलेले असल्याने त्यात कोणी सात्विक बदल सुचवू नयेत. त्यापेक्षा नवी हझल पोस्टावी. पुढे नवीन शेर सुचल्यास, माझ्या उपलब्ध वेळेप्रमाणे, ही शेपटी वाढत जाण्याची संभावना आहे. वाचकांनी क्रमशः असल्याने उगाच धिंगाणा घालू नये.)

भानगड चक्क वाजवी होती
चोविसातील... आठवी होती

त्यातली आपली असो कोणी
सावजे सर्व लाघवी होती

गावभर बोंब.. ती कशी दिसते ?
ढेप की गोड काकवी होती ?

रोज आहे जुनीच लफडी पण
कालची प्रेरणा नवी होती

छापला काळजानेच अलबम
रोज डोळ्यात नव छवी होती

उचलली तेवढी कटाक्षाने
ज्या सुराहीत शांभवी होती

काल कोणी घरी कळविले ते
भांडणे मग अवास्तवी होती

लग्न सुरुवात फक्त शोकाची
लावता सूर...... यादवी होती

सात जन्मे म्हणे हवी सोबत
मागणी ती अवाजवी होती

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सात जन्मे म्हणे हवी सोबत
मागणी ती अवाजवी होती<<< Proud

भानगड चक्क वाजवी होती
चोविसातील... आठवी होती<<< Biggrin

रोज आहे जुनीच लफडी पण
कालची प्रेरणा नवी होती<<< Lol

उचलली तेवढी कटाक्षाने
ज्या सुराहीत शांभवी होती<< वा!

गावभर चर्चा.. ती कशी दिसते ?
ढेप की गोड काकवी होती ?

गावभर बोंब असं वगैरे करा.... चर्चा हे वृत्तात बसत नाही.

>>>>
पुढे नवीन शेर सुचल्यास, माझ्या उपलब्ध वेळेप्रमाणे, ही शेपटी वाढत जाण्याची संभावना आहे.
<<<< Lol

उपलब्ध वेळेनुसार प्रतिक्रिया मिळतीलच.... Lol

कौ.शि.,

क्रमश: केलंत ते ठीकाय, पण एके दिवशी अशी पाळी येईल :

विश्वास ना बसे तपकिरी पाहुनी -
ती पाने एके काळी हिरवी होती!
Wink

आगळीक झाली असल्यास क्षमा असावी!

आ.न.,
-गा.पै.

::हहगलो: