या हृदयातच तो असे सतत! पण, मजला कळावे कसे?

Submitted by सतीश देवपूरकर on 29 September, 2012 - 06:05

गझल (तरही)
या हृदयातच तो असे सतत! पण, मजला कळावे कसे?
देव्हा-यात बसून तो ठरवतो, की, मी जगावे कसे?

रंगीबेरंगी जगास कुठला, गंधामधे गोडवा?
या नकली दुनियेस काय कळते की, दरवळावे कसे?

लावावी ठिगळे तरी कितिक मी, धरणीस या फाटक्या?
आताशा आभाळही उसवते, तेही शिवावे कसे?

ता-यांचा दिसतो नभात कशिदा, तो कोण रे काढतो?
तो धरणीला या असेल शिकवत, शेले विणावे कसे?

टाळाटाळ कशास रोज मरणा, करतोस तू यायला?
इतके कर उपकार सांग मजला, हे श्वास घ्यावे कसे?

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

टाळाटाळ कशास रोज मरणा, करतोस तू यायला?
इतके कर उपकार सांग मजला, हे श्वास घ्यावे कसे?<< व्वा

याशिवाय, अनेक ओळी आवडल्या पण शेर म्हणून आवडले की नाही आणखीन एक दोनदा वाचून सांगतोच

त्या ओळी:

या नकली दुनियेस काय कळते की, दरवळावे कसे?

लावावी ठिगळे तरी कितिक मी, धरणीस या फाटक्या?

ता-यांचा दिसतो नभात कशिदा, तो कोण रे काढतो? (सुंदर)

पण प्रोफेसर साहेब काही ठिकाणी दोन लघुंचे गुरू झाल्यासारखे वाटले बरं का?

खयाल तुमच्या नेहमीच्या खयलापेक्षा हटके अन् भाषाशैलीही अमळ प्रवाहीपणे उतरली आहे आज
वृत्तामुळे असे झाले असावे बहुधा

ता-यांचा कशिदा ही कल्पना बेहद आवडली इतकी की काही वेळात मी तिच्या प्रेमात -बिमातच पडेन अगदी!!चेष्टा नाही सर रियली आय अ‍ॅम लव्हिन्ग इट!!!

गागागाललगालगालललगा । गागालगागालगा

ठळ्क जागी लल चे गा केले तर मजाच बिघडते लयीची ..शा.वि. वृत्ताचे असेच आहे
आपल्या रचनेत असे झाले आहे ते टाळता आले असते
एखाद्या जागी गा चे लल झाले तर चालले असते तेही ओळीच्या अखेरी अखेरीस मग फारसे खटकत नाही असा माझा वैयक्तिक अनुभव आहे
पण एक मात्र नक्की जितके काटेकोरपणे आपण शा.वि. पाळू तितके जास्त मस्त वाटते वाचताना /म्हणतना !!

धन्यवाद भूषणराव!
पण प्रोफेसर साहेब काही ठिकाणी दोन लघुंचे गुरू झाल्यासारखे वाटले बरं का!
<<<< असे चालत नाही का? तसे असल्यास त्या त्या जागा कळवाल का, म्हणजे ते दोष काढण्याचा प्रयत्न करू!

पण शेर म्हणून आवडले की नाही, आणखीन एक दोनदा वाचून सांगतोच<<<<<
म्हणजे काय भूषणराव? शेर व्हायला काय काय लागते द्विपदीमध्ये?

कोणत्या निकषांवर कोणत्या द्विपद्या शेर होतात/नाही होत हे कळवाल का, म्हणजे त्वरीत सुधारीत द्विपद्या (शेर) लिहिण्याचा प्रयास करू.

टीप: आम्ही आपल्या तरहीवर सविस्तर प्रतिसाद दिला होता. दोन प्रतिसाद. एक छोटा व एक सविस्तर! आपण काहीच त्यावर लिहिले नाही. आमचे काही चुकले काय?
इतरही अनेक धाग्यांवर प्रतिसाद काल लिहिले होते. त्यांच्यावरीलही आपले म्हणणे वाचण्यासाठी उत्सुक आहोत!
कालचा पूर्ण दिवस आमचा प्रतिसादातच गेला. पण आम्ही जाम enjoy केला कालचा दिवस! पोटभरून शिकायला मिळाले! झोपताना गझलेचा, प्रतिसादांचा ढेकर देवूनच झोपलो. आज महाविद्यालयाला सुट्टी आहे. त्यामुळे नेटवर सरस लावूनच बसलो आहोत! सकाळी सकाळीच रणजीतच्या गझलेवरील प्रतिसाद लिहून काढला व पोस्ट केला!
मी एक तरहीसाठी ओळ सुचवली होती, त्यावर आपण काहीच बोलला नाहीत.
>‘आले रडू तरीही रडता मला न आले!’
असो.
थांबतो! जरा इतरांकडे कटाक्ष टाकून येतो!
..........प्रा.सतीश देवपूरकर

सावधान!! थाम्बा बेफीजी !!! आधी हमीपत्र लिहून घ्या सरान्कडून की मागल्याबारी आपण लोकानी धाडस केले तेन्व्हा देवसरानी जे केले तसे आता करणार नाहीत म्हणून !!

...............मग काय आम्हीही रचना करूच
..........देवसरानी आम्हाला आज्ञा केली नसली तरी काय आम्ही 'एकलव्य' आहोत त्यान्चे!! आम्ही इथे घरी बसून गझलेचा स्वाभ्यास करतो तेव्हा गुरूला स्मरूनच आमचे काम भागते !!प्रत्येक वेळी अनुमती घेत बसत नाही आम्ही !!;)